Nurturing Soul

डिसेंबर म्हटला की सुट्ट्या आणि सुट्ट्यांमध्ये टीव्ही चे binge watching हे एकत्रितच येते. फूड चॅनल बघणे हा माझा आवडता छंद. एक दिवस एक इटालियन शेफ वाफल्स ची रेसिपि दाखवत होती. ते करण्याकरिता तिच्याकडे एक पारंपरिक वाफल आयर्न होती. लांब लोखंडी दांडा असलेली. तिने त्यात कोरलेले नाव दाखवले तिच्या ग्रेट आंटचे. तिला ती तिच्या बारशाला मिळाली होती आणि त्यात हि वाफल्स करून मुलीला खाऊ घालणार होती, म्हणजे चार पिढ्या त्याच्याशी जोडल्या गेलेल्या होत्या. ते करताना तिचे म्हणणे होते कि हे dessert पोटापेक्षा मनाला जास्त आनंद देते."इट विल नर्चर माय  सोल" मला जाणवले खरंच असे खूप काही आहे जे आपल्या मनाला कळतनकळत समृद्ध करते, nurture करते.

मन समृद्ध होत गेले तरच जगणे monotonous नाही होणार, नाहीतर २०२० काय किंवा २०२१ काय! काल हे वर्ष संपले आणि बरेच देवून आणि घेऊनही गेले. एकनाथांनी म्हटलेय मनाचेही एक मन असते त्याची काळजी घ्यायची असते. या जाणिवेतूनच लक्षात आले आपल्याभोवती घडणाऱ्या असंख्य घटना, गोष्टी, माणसे वस्तू आपल्यासाठी हे nurturing of soul बिनबोभाट करताहेत.

माझी एक मैत्रीण आहेझाडापानात रमणारीब्रिसबेन जवळचे एक टुमदार गाव तिचे देऊळ आहे, मनःशांती देणारे. हा दृष्टिकोन मला मिळाल्यापासून त्या रस्त्याची वारी करताना मन आपोआपच शांत होते, हे खरे नर्चरिंग. अनुभव तिचा फायदा माझा. ज्ञानेश्वरी वाचायची ठरवली पण ग्रंथ न्हवता. एका फोन वर ताईदादांनी आठदिवसात ती पाठवली आणि आता रोज त्यावरून हात फिरवताना त्या मागची आपुलकी मनाला आपलेपणाने भरून टाकते. या अश्या सगळ्यांचे आपल्या आयुष्यात असणेच मनाला आश्वस्त करतेनवी उभारी देते.

आपले बरोबर असताना सोडून देणे जसे स्वतःला समृद्ध करते तसेच माझे बरोबर आहे हे ठामपणे सांगणे देखील. काहीवेळेला प्रियव्यक्तींच्या न आवडणाऱ्या गोष्टी सोडून देण्याने आनंद मिळतो तर कधी काही लोकांना दूर केल्याने आनंद टिकतो. आपण कोण आहोत याची जाणीव मनाला विश्वास देते तर आपल्या जगण्याचा उद्देश कळणे प्रचंड समाधान देते.

कुमार गंधर्वांची निर्गुणी भजने, विंदा करंदीकरांच्या कविताझाडांच्या मधून दिसणारा चंद्र, समुद्राच्या लाटांचा गंभीर नाद, दर्यांमधले धुक्यांचे धबधबे प्रत्येक अनुभव नुसत्या sensory organs ना नाहीतर मनाला सुखावत असतोअनुभवांची भर टाकत असतो. चांगले विचारचांगल्या आठवणीचांगली माणसे मनाच्या झाडाला खत पाण्याचे काम करतात त्याची नीट मशागत करतात आणि बघता बघता फुले वेचिता बहरू कळियासी आला स्थिती होते.

वर्ष सरताना मनाला समृद्ध करणाऱ्या या आठवणींचा उजाळा, या सगळ्याप्रतीची कृतज्ञता, येणाऱ्या नव्या वर्षाची उमेद मनात निर्माण करते आणि हे 'नर्चरिंग ऑफ सोल' अविरत चालूच राहते.



मना तुझे मनोगत 
मला कधी कळेल का 
तुझ्यापरी गूढ-सोपे 
होणे मला जुळेल का?
- सुधीर मोघे. 

- श्रुतकिर्ती 

०१/०१/२०२१

Comments



  1. * मन करा रे प्रसन्न, सुखी !*

    ReplyDelete
  2. Kiti sunder g... tu kuthun survat kartes ani kiti chan firvun antes... ekdam muddesud 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you, keeping fingers crossed 🤞 ते मुद्देसुदच रहावे म्हणून.

      Delete
    2. Thank you, keeping fingers crossed 🤞 ते मुद्देसुदच रहावे म्हणून.

      Delete
  3. श्रुती, नवीन वर्षाची सुरुवात छान केलीस. एखाद्या गोष्टीवर Introspection करताना "was it Nurturing the soul?" or if not, "what did it actually nurture?" हा विचार केला, की रोजचे Introspection सोप्पे व्हावे. दिवसाच्या शेवटी आत्मानंदी समाधानाची जाणीव यातून वाढावी कदाचित, असं काहीसं वाटतंय.
    ह्या लेखाने हळुवार पणे मनात्म्याच्या उंबरठ्यावर आणून बसवलंस. Wishing you a fulfilling new year. ❤️😇

    ReplyDelete
    Replies
    1. Introspection गरजेचे... what did it actually nurture? हे विचारायलाच पाहीजे खरे. You are part of my fulfilling year dear!

      Delete
  4. rojachya jagnyatalyach goshti pan I never thought about it... thank you once again Shruti.

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you, you are part of these good memories!

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान