Posts

Showing posts from November, 2021

शून्य गढ शहर…

Image
सध्या रोज ऊन पावसाचे चक्र चालू आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी असेच ढगाळलेले , टाचणी टोचली तरी धबाधबा  पाऊस पडेल वाली परिस्थिती.  रेडिओवर अगदीच ढणढण पंजाबी गाणी लागले. पाऊस पडायच्या ऐवजी ,   पळून जाईल हीच शक्यता वाटल्याने त्याजागी जमेल ती पहिली प्ले लिस्ट लावली. सुदैवाने पाचव्या सेकंदाला कुमार गंधर्वांच्या आवाजात अवधूता… ऐकू आले आणि हुश्श्य झाले. पावसालाही सुरांची साथ आवडली आणि तो एका लयीत कोसळू लागला.  एक दोन गाणी संपली आणि लागले ‘शून्य गढ शहर’ ... फक्त पावसाचा आणि तंबोर्‍याच्या सूर ,  आणि त्या जादुई स्वरांत  ते निर्गुणी भजन! संत गोरक्षांच्या त्या शब्दांना नुसते ऐकून , पटकन ,  काय तर विचार करूनही लवकर अर्थ लागत नाही. तशीही या निर्गुणी भजनाची गंमतच असते. दोन स्तरांवर चालणारा प्रवाह असतो तो.  शब्द सांगतात त्याला हि सुंदर अर्थ असतो पण त्या पलीकडे साधकासाठी लपलेला अत्यंत गुढ तर्कसंगती च्या कोणत्याही व्याख्येत न बसणारा अर्थाचा खोल डोह असतो.  त्यात बुडी मारली की बाहेर येणे अशक्य. एकेका वाक्याच्या दोह्याच्या, पंक्तीच्या भोवर्यात किती वेळ अडकलात , त्याचा शोध लागत नाही. तसेच काहीसे आजही घडू लागले. आ

Missing Piece

Image
  नेमेची येतो मग पावसाळा , सारखी गणपती , दसर्यानंतर दिवाळी आली. जाहिराती ती जवळ आलीय हे विसरूच देत नाहीत. दिवाळीचे वेध लागायला लागले की भाजणी , पीठं , पोहे हे सगळे पाहीजे तस्से आणायचे तर इथे थोडी fielding लावावी लागते. stock संपायच्या आधी भाजणी , अनारस्याचे पीठ secure करावे लागते. घरी करायचे नसेल तर वेळेत order ही करावे लागतेच. तसे या वर्षीही हे सगळे उद्योग करून झाले. आता सगळी कच्ची तयारी करून झाल्यावर , पुढे काय याची सगळी योजना मनात तयार होती..  पण मनातच तयार होती. चार मैत्रीणींच्या नादी लागून चकली , शेव तयार झाली. आणि बाकीचे पुढे ढकलले जायला लागले. काहीतरी missing होते. कळतय पण हात वळत नव्हते. आता बिना करंज्या अनारस्यांची ही दिवाळी जाते काय ही भिती घरातल्यांना वाटून गेली. आणि अगदी अचानक… Fedex चा msg आला. आज parcel delivery असण्याचा. काय घेतलेय याचा विचार करूनही उत्तर नकारार्थीच होते. दुपारी खोके आले. पुण्याहून पार्सल आले होते. घरून फराळ आला होता. सगळा कंटाळा एका क्षणात गेला. दिवाळी खरच सुरू झाली. मागच्या वर्षीसारखे विचित्र वर्ष आणि एक दोन दु:खद घटना वगळता घरून पार्सल आले नाही असे