Posts

Showing posts from July, 2021

संवाद

Image
  काल रात्री एक forward आलेला , एक लोकसंगीत गाणारी गायिका अतिशय सुंदर आवाजात काहीतरी गात होती. गंभीर सूर , पार्श्वभूमीला एकच वाद्य आणि कुठेतरी डोंगराच्या कड्यावर बसून एकटीच स्वतःत हरवून ती गात होती. जेमतेम पाच मिनिटांचा विडिओ पण सगळ्याचा विसर पडला. स्थळकाळाचे भान हरपणे म्हणजे काय ते हेच असते का ? असाही प्रश्न पडला. ती काय गात होती त्यातले एक अक्षरही कळले न्हवते. भाषा ओळखीची अजिबातच न्हवती. आशयाची सुताराम कल्पना न्हवती. ऐकणारी त्यावेळी मी एकटीच होते त्यामुळे मी माझ्या मनानेच अर्थ लावला पण चार जण असते तर प्रत्येकाचा वेगळा अर्थ समोर आला असता हे नक्की. म्हणावे तर ती स्वतःसाठी गात होती , स्वतःत हरवून आपल्याशीच बोलत होती पण तिच्याही आणि माझ्याही नकळत ती माझ्याशी संवाद साधत होती. ज्यात न्हवती कोणतीच समान भाषा , न्हवता समान विषयाचा पार्श्वभूमीचा धागा. पण काहीतरी सांगितले जात होते. काहीतरी उमजत , उकलत , उलगडत होते. शब्दावाचून भावना कळणे हे ऐकून माहित होतेच , इथे शब्द होते , सूर होता , भावनाही होतीच पण तिची आणि माझी भाषा वेगवेगळी असूनही एक संवाद होता आणि तो नक्कीच सुसंवाद होता. संवादाला भाषा

गुरुतत्वाच्या शोधात

Image
  आज गुरुपौर्णिमा , सगळीकडे गुरुभक्तीचे , गुरुपुजेचे वारे वाहत आहेत. मान वी रूपातले , अज्ञातशक्तीच्या स्वरूपातले , निसर्गातले , पंचमहाभूतांच्या रुपातले असे अनेक गुरु आपण मानतो , पुजतो आणि मनापासून त्यांना follow करतो. यातल्या प्रत्येक गुरुस्वरूपातून काहीतरी शिकण्यासाठी , त्यापासून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आपली धडपड चालू असते. ' गुरुवीण कोण दाखवील वाट ' हे म्हणत प्रत्येक जण वेगळ्यास्वरूपातील गुरु आणि आपापली वेगळी वाट चोखाळत असतो. मग आपले गुरु कोण ? कसे कळते , कधी भेटणार ?   सगळ्यातुनच जर आपण शिकत असतो , तर ठराविक व्यक्ती , घटना , तत्व यांना का गुरु मानतो ? काय सांगते आपल्याला त्यांना गुरु मानायला ? आणि शिष्याची भूमिका घ्यायला ? ज्या व्यक्तीच्या , विचारांच्या सान्निध्यात मनःशांती मिळते ते आपले गुरु. कदाचित वेळोवेळी , परिस्थितीने व्यक्ती विविध असू शकतीलच. अस्तित्व वेगवेगळे , माध्यम वेगवेगळे कारण त्या क्षणी त्यात असते गुरुतत्व आपल्याला मार्गदर्शन करणारे. सर्वत्र व्यापून असणारे हे गुरुतत्व. विविध रूपात सामोरे येणारे.शिष्यत्व स्वीकारायची तयारी असली कि सर्वत्र सापडणारे. आपल्या स्वत

न लिहलेले पत्र!

Image
  काल कशासाठीतरी एक जुने खोके बाहेर निघाले. मजेमजेशीर गोष्टी सापडल्या त्यात. कधीच्या काळचे एकच उरलेले कानातले , एक पावती , कुठलेतरी जुने पुराणे पेपर कटिंग आणि एक अंतर्देशीय पत्र! उघडून पहिले तर काहीच न लिहलेले. सतरा वर्षांपूर्वीची तारीख होती टाकलेली बाकी काहीच नाही. आठवूनही सुचेना नक्की कोणासाठी होते ते आणले ? मग लिहिलेच कां न्हवते ? आणि मग हे कोरे पत्र ठेवले तरी कशाला आहे जपून ? मेंदूला ताण देऊन उपयोग न्हवता. या बाबतीत त्याने असहकार पुकारला होता. मनाला विचारले तर त्याने एवढेच सांगितले , असेल काहीतरी महत्वाचे , आठवेल कधीतरी. आणि मग त्या निमित्ताने मनात इतकी पत्रे आठवू लागली कि , गेल्या काही वर्षात आपण पत्र लिहिलेच नाही हे आठवून उगीचच खंत वाटली. फोन शेकडो केले , मेसेजचा तर काउंटच नाही , पण पत्र कधी लिहले शेवटचे छानसा मायना लिहून , खाडाखोड न करता कोरीव अक्षर काढून ? फार फार वर्षे झाली. पार मागे वळून पाहताना चौथी पाचवीत असतांना मी आणि माझी मैत्रीण पंधरा पैशाच्या पोस्टकार्डावर चित्र काढून दिवाळीचे आणि वाढदिवसाचे ग्रीटिंग पाठवायचो गावातल्या गावात. ते पोस्टकार्ड आजही आहे माझ्याकडे , अर

'वाजती पांयजणां’

Image
काल बाकीबाब बोरकरांची पुण्यतिथी होती. या पूर्वी ती कधी माहितीही न्हवती. सोशल मीडियामुळे काल अनेक कवितांच्या रूपात ती सामोरी आली. त्यातूनच कळले , कि ती सदतिसावी पुण्यतिथी! म्हणजे मला कविता या शब्दाचा अर्थ कळायला लागला त्याच्या आसपासच ते गेले. त्यावेळी अर्थातच बोरकर या शब्दाचे गारुड मनावर न्हवतेच मग आज इतक्या वर्षांनी त्यांनी स्वानंदासाठी लिहलेल्या कविता माझ्या मनात गर्दी का करत होत्या ? बरं त्या नुसत्याच आठवत न्हवत्या ; ' वाजती पैंजणा ' वाचताना दूरदर्शनच्या कृपेने पाहिलेल्या विडिओ मधले शाल पांघरलेले बोरकर आणि त्या शब्द-सुरांवर डोलणारे पुलं. त्याबरोबरच कानात ऐकू येणारा , अगदी स्पष्ट ऐकू येणारा पुलंचा तीच कविता म्हणणारा आवाज सगळेच कसे मी समोर बसून ऐकल्यासारखे. आणि मग दिवसभर चळच लागला , मनातल्या प्रत्येक आनंदाचा उद्गम शोधण्याचा. दिवा लावताना कधी न्हवे तो ' एडिसन ' आठवला. घराचे दार उघडताना बाकी सगळ्यांपेक्षा ' राईट बंधू ' नसते तर ? हा विचार चमकून गेला. हे टाईप करताना ' चार्ल्स बॅबेज ' चा भला मोठा खोलीभर आकाराचा संगणक दिसला. या सगळ्यांनी कुठे माझा विचार कर

सावल्या, मनातल्या.

Image
  हिवाळ्याचे दिवस , अंधार फार पटकन पडतो. काल घरी येता येता थोडा उशीर झाला. दार उघडले तर घर काळोखात बुडालेले. काही सांगण्याबोलण्या आधी प्रतिक्षिप्त क्रियेसारखे दिव्याचे बटण दाबले गेले. पाय धुवून देवापाशी दिवा लावला आणि त्याची नक्षीदार सावली देवघराच्या भिंतीवर पडली. त्या मंद प्रकाशात मघाची काळोखाची काजळी क्षणार्धात दूर झाली. त्या क्षणात नुसता घरातलाच न्हवे तर मनातला काळोख दूर झाला , तो दूर करणारी अज्ञात शक्ती आपल्या आसपास कोणत्या ना कोणत्या रूपात असतेच याची प्रकर्षाने जाणीव झाली. हा मनातला काळोख दूर करणाऱ्या समया लावणाऱ्या अनेक हातांची आठवण मनात गर्दी करू लागली. यातल्या अनेक हातांना तर कधी सांगितलेही न्हवते त्यांनी किती क्षण उजळवले होते. आशा वेळी हे मन मोठा स्ट्रगल करते कसे , कधी , काय बोलू ठरतच नाही. मग काय करायचे ? हे सगळे विचार नुसते साठवूनच ठेवायचे ? ते व्यक्त कसे करायचे ? सदैव भटकणाऱ्या या विचारांची मालकी घ्यायची तरी कशी ? बोलता नाही आले म्हणून त्यांना नाकारणाऱ्या , स्वतःचेच विचार कबूल न   करण्या इतके कमकुवतही ते मन नसते. मग एकच मार्ग असतो व्यक्त होण्याचा. लिहणे ... पांढर्यावर काळ