Posts

Showing posts from November, 2022

दिवस

Image
 " आकाशवाणी पुणे , सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहे." , किंवा ' इति वार्ताः " अशी दिवसाची अनेक वर्षे सुरवात होत असल्याने सकाळी सकाळी गुगल ला काहीतरी वाजवायला लावल्याशिवाय सकाळच्या कामांना गती येत नाही. माझे आणि त्या गूगल काकूंचे फार संख्या नाही. लावायला एक सांगितले कि लागते भलतेच. कुमार गंधर्वांचा , अक्षय कुमार करणारी गूगल मग डोक्यात जाते बऱ्याचदा. चूक तिची नसतेच. एक तर माझा accent तिला कळत  नाही नाहीतर माझी आणि तिची गती मॅच होत नाही. असेच आज सकाळी काहीतरी लावताना तिने अचानक , " बुद्धा वीकली" नावाचा यु ट्यूब चॅनल लावला. वैतागून स्टॉप म्हणायच्या आत एक शांत गंभीर आवाज , 'Chant with us ." म्हणाला आणि मी थबकले , काय म्हणतोय ऐकू या म्हणून ऐकत राहिले. आधी दोन एक मिनिटे काहीतरी माहित सांगत होते पण माझे लक्ष त्यातून उडालेले होते. त्या तिबेटी भिक्कूच्या आवाजामुळे हा आता ' ओम मणी पद्मे हम ' म्हणतो कि काय ? मग त्या वाक्य बरोबर डोळ्यापुढे  आलेली अनेक बुद्ध लेण्यांमधली चित्रे , तिसरी-चौथीमध्ये असतानाची काळ्यापांढर्या दूरदर्शन वरची नेपाळ मधली स्मगल

समज

Image
  “ मी काय सांगितले ते समजले का ?” शेकडो वेळा किती तरी जणांच्या तोंडून हे वाक्य ऐकले असेल. कधी कधी आपणही म्हटले असेल.   पण नक्की काय असते समजणे ?   समजते म्हणजे होते तरी काय ?   मेंदूला म्हणाला काही कळते का ? का ज्या अवयवाकडून एखादी कृती अपेक्षित आहे , ती कशी-कधी -केव्हा- कां करायची याची इन्स्ट्रक्शन कशी द्यावी हे मेंदूला कळते का ? नक्की काय घडते ?   विचार केला तर , असा लख्ख प्रकाश पाडणारा एखादा क्षणच   असतो जो बऱ्याच गोष्टी , न कळणे गटातून कळले गटात टाकून देतो. पण कधी कधी न करण्यातून ,   मला कळले-उमगले- समजले हे कधी घडते तेही तर समजत नाही. मनात , मेंदूत खोलवर कुठेतरी उत्पन्न होणाऱ्या आंतरिक संवेदना ज्यांना आपण समज म्हणतो त्या मनात मेंदूत त्यांची एक सृष्टी निर्माण करत असतात. त्यात असणाऱ्या सगळ्या संवेदना वेळी आवेळी ,   मेंदू/ मन लागेल तशा वापरते आणि आपण समजले किंवा नाही समजले , हा खेळ खेळतो. कधी कधी हा खेळ इतका पटकन घडतो की समजले   कधी हे ही समजतच नाही. मग मन त्याला लेबल लावते ,   उमजले , उमगले ,   नकळत कळले , इत्यादी इत्यादी. या आंतरिक संवेदना किती प्रकारच्या आणि किती गुंतागुंतीच्

कशासाठी? जगण्यासाठी.

Image
  बराच वेळ गाडीत बसायचे असले की रेडिओला पर्याय नसतो. परवा असेच झाले. संध्याकाळी गर्दी असल्याने वेळ वाढतच गेला. त्यातच स्टेशन्स फिरवताना कुठेतरी ‘आईस्क्रीम ब्रेड’ हा शब्द ऐकला आणि कान टवकारले गेले. एबीसी रेडिओ वर आईस्क्रीम ब्रेड टेस्टिंग बद्दल काहीतरी बोलत होते. नेहमीच्या वा वा , छान छान नंतर ही पाककृती ‘डिप्रेशन एरा’ मधील आहे असे काहीतरी म्हटले गेले. कार्यक्रम संपला माझा प्रवासही संपला. पण हा शब्द काही पाठ सोडेना. जरा शोधाशोध केल्यावर खजिनाच   सापडला. अमेरिकेतील शेअर बाजार कोसळल्यावर ,   1929 ते   1939 या काळातल्या अत्यंत आर्थिक मंदीचा हा काळ.   ताज्या अन्नपदार्थांचा तुटवडा ,   आर्थिक चणचण या सगळ्यातूनही सगळ्यांना खाऊ तर घालायचं . मग या बायका , हुशार बायका असे शोध लावायच्या. वितळलेले आईस्क्रीम पीठात मिसळून ते बेक केल्यावर तयार झालेला हा पदार्थ बराच चांगला झाला होता. कारण न मिळणारे दूध , साखर त्यात होते. ज्या कुणी तो शोधला त्याचे कौतुक वाटले.   गरज शोधाची जननी याचे उदाहरणच जणू. जे काही मिळत होते त्यातच कल्पकता दाखविली गेली होती.   जेवायला काय आहे ? या प्रश्नाचे एक मजेशीर उत्तर त्या