Posts

Showing posts from June, 2021

Selective Memory.

Image
  घरातून निघताना केलेली ग्रोसरी लिस्ट चुकून घरीच राहीली , पण परत आल्यावर पाहिले तर प्रत्येक गोष्ट व्यवस्थित आणली गेली होती. पटकन स्वतःच्या बुद्धीला , स्मरणशक्तीला शाबासकी दिली आणि पाच मिनिटात भ्रमाचा भोपळा फुटला. कशाचा तरी दोन दिवसांपूर्वीच बदललेला पासवर्ड जाम आठवत नव्हता दोन्हीही मीच होते , दिवसही तोच होता , मेंदू ही तोच ; पण लक्षात काही राहिलं.काही नाही.अशा कितीतरी गोष्टी नकळत पक्क्या लक्षात राहतात पण कितीतरी लक्षात ठेवूया ठेवूया म्हणूनही विसरल्या जातात. कॉलेजमध्ये असताना , टीव्ही पुढे बसून जर्नल्स लिहिणे हा माझा आवडता उद्योग होता. झी सिनेमा वर बच्चन चे सिनेमे आणि असंख्य गाणी लागायची. फिजिक्स , स्टॅटिस्टिक्स जर्नल मध्ये काय लिहिले ते आज मुळीच आठवत नाही पण आजही ती नाईन्टीज मधली गाणी , काही तर टुकार म्हणावी अशीच असलेली शब्दनशब्द डोक्यात बसलीत. एक डायलॉग ऐकला की , पुढचा आठवावा इतके ते सिनेमे देखील लक्षात राहिलेत. काहीवेळा एखादी घटना , प्रसंग , पार डिटेल मध्ये आठवतो. त्यावेळी आजूबाजूला असणारी माणसे , त्यांचे कपडे , घरदार सगळ्या सकट!   पण कधीकधी त्याच लोकांना समोर बघूनही त्यांची साधी

जरा उशीरच झाला!

Image
  काल शुक्रवार , ख्वाबिदा लिहिण्याचा वार.पण लिहून , ब्लॉगवर टाकता टाकता शनिवार उजाडला. कारण काहीही असो जरा उशीरच झाला.मनाशी हे म्हटले आणि दचकायलाच झाले. किती वेळा येते हे वाक्य मनात.तरीही मी दिलेल्या वेळा पाळणारी आहे.’फॅशनेबल लेट‘ जाण्यावरही माझा विश्वास नाही मग तरीही घड्याळाच्या काट्यांच्या उशिरा बरोबरच इतरही बरेच उशीर होतातच की. आज करू , उद्या करू , म्हणून टाळलेले फोन हे तर अगदी परवलीचे उदाहरण आहे. थोड्यावेळाने मेसेज करू,म्हणता म्हणता खुशाली विचारायची राहूनच जाते आणि कधी कधी खूप उशीर झालेला असतो. दर शनिवारी/ रविवारी आईशी बोलले , की या आठवड्यात दोन-तीनदा बोलू म्हणता म्हणता, शुक्रवार रात्र उजाडते आणि फोन लावला कि , पहिले वाक्य येते, “उशीर झाला मला फोन करायला पण …” अमुक आणि ढमुक. मग येणारा स्वतःचाच राग , निष्काळजीपणाची भावना, एखाद आठवडा वेळेवर फोन करते आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या! माझी एक मैत्रीण तीन-चार दिवस हाय हॅलो नाही झाले की ‘ऑल गुड ?’ विचारते. मला दोन दिवसांनी जाणवते; आता ही विचारणार , त्याआधी बोलूया. पण उशीरच होतो आणि तिचाच मेसेज येतो. कधी कुणाचे तरी काहीतरी खटकलेले

वेल

Image
  हवेत गारवा जाणवायला लागलाय आणि बागेत पानांचा कचरा साठायला लागलाय. मग ती पाने गोळा करणे , फांद्या कापणे , कुठेतरी उकराउकरी करणे , खतपाणी घालणे अशी पन्नास कामे वीकेंडला आवासून समोर उभी राहतात. झाडांना पाणी घालायला गेले आणि एका छोट्याश्या वेलाला धुमारे फुटलेले दिसले. मनात आले आता ह्याला टेकू द्यावा लागणार , दोरी बांधून खांबावर , भिंतीवर चढवावा लागणार. थोडक्यात त्याला आधार द्यावा लागणार तरच तो वाढणार , फुलणार. त्याचे खोड नाजूक , म्हणून वाढ होण्यासाठी ते कोणाची तरी मदत घेणार. आणि तो खांब , ती दोरी त्याला आधार देता देता आपल्याच दिशेला घेऊन जाणार आपल्याला पाहिजे तिकडे वळवणार. वेलाला वाटतेय मला मोठे व्हायचेय , वर चढायचेय म्हणून मी आधार घेतला , दोरीला वाटतेय मला या वेलीला जिथे न्यायचेय तिथे नेण्यासाठी मी हात धरला. नक्की घडले काय ? वेलीला आधार मिळतो , वेल वाढते , दोरी , काठीच्या आधाराने मोठी होत जाते. होता होता एक दिवस आधाराची गरजच लागणार नाही इतकी बळकट होते. पण ती आधाराला सोडत नाहीच तर बाजूलाच फुटलेल्या नव्या अंकुराचा , दोरीच्या , काठीच्या मदतीने स्वतःच नवा आधार बनत जाते. त्यांना आपल्य

मैत्रीण

Image
  खुप दिवसांनी आम्हा चार पाच मैत्रिणींचे भेटायचे ठरले. तुला जमेल का , मला जमेल का करत एकदाचे ठरले. भेटून महिना दीड महिनाच जेमतेम झालेला पण सगळ्यांना भेटून गप्पा मारायच्या होत्या. त्या तर तशाही फोनवर मारतच होतो की , zoom वर एकमेकींना पाहतही होतोच. मग काय होते भेटायचे एवढे ? ठरले आणि सगळ्या तयारीला लागल्या. आमच्यातली एक लोणचे queen आहे. तिने तिच्या नव्या लोणच्याच्या बरण्या भरल्या. एकीची चटणी फेमस आहे तिला ऑर्डरी गेल्या. कुणी कुणाला कुठल्या झाडाच्या बिया फांद्या द्यायच्या त्याचे मेसेज झाले. जेवायला काय यावर एकमोट्ठे चर्चासत्र घडले आणि फायनली सगळ्या भेटल्या. गप्पागोष्टी , हसणेखिदळणे , खाणेपिणे सगळ्यानंतर निघताना खाऊचे डबे भरले गेले. वस्तू दिल्याघेतल्या आणि जाताना नेलेल्या पिशव्या रिकाम्या न होता अजूनच फुगून घरी परतल्या. काय मिळाले आम्हाला त्या चटण्या लोणच्याच्या बरण्यातून ? सगळ्या तर घरी रोज तेच करत होतो. त्या बिया Bunnings मध्ये मिळत होत्याच की. मग का धडपडलो त्या साठी ? जेवायचे ठरवतानाही मी हे करून आणू का ? पेक्षाही हे आणशील का तुझ्या हातचे या वर भर होता. घरातले सगळे करून , कामाच्या वेळ