Posts

Showing posts from December, 2020
Image
  रोज संध्याकाळी फिरायला जाताना बऱ्याच घरांमधून स्वयंपाकाचे वास येत असतात. आपले जेवण घरी तयार असले तरी हा वास कोणत्या पदार्थाचा हा guessing game मेंदू खेळतच राहतो. काही काही पदार्थांचे , वस्तूंचे गंध मनातल्या असंख्य तारा छेडून जातात. नाकाला जाणवणारे हे वास मनाला वेगळ्याच जगात transport करतात. सकाळी सकाळी कॅफे समोरून नुसते चालत गेले तरी खडबडून जाग येते , पोटात कॉफी न जाता देखील. पहिल्या पावसाचा सुगंध प्रत्येकाला आवडतो. कवीला कविता सुचवतो तर तुम्हा आम्हाला वेध लावतो तेलात चुर्रर्र आवाज करत तळल्या जाणाऱ्या डाळीच्या पिठाचे. खरपूस भाजली गेलेली माती आणि त्यावर पडलेले पाण्याचे चार थेंब! त्यामागून मनात यायला लागतो तो रस्ताभर सडा पडलेल्या गगनजाईच्या फुलांचा सुवास. या सुवासांना जोड मिळते या पावसाळी वातावरणात येणाऱ्या सणावारातील फुले पाने ,  उदबत्ती ,  कपूर याच्याबरोबर येणाऱ्या नैवैद्यातल्या पदार्थांची. एकदा कोणताही सणवार नाहीच हे माहित असताना देखील आमच्या घरी जेवायला आलेल्या पाहुण्याला सत्यनारायण आठवलेला. कारण फक्त अळूवडी आणि उदबत्ती यांचा एकत्रित वास. समुद्राच्या जवळ पोचायला लागलो हि जाणीव

कॅलेंडर

Image
नोव्हेंबर शेवटाला आला कि वेध लागतात कॅलेंडरचे , आणि मग हातात येते नवे कॅलेंडर. कधी छान चित्रासाठी घेतलेले तर कधी त्यातील अधिक माहितीसाठी. कॅलेंडर हाती आले कि काही गोष्टी पटकन बघितल्या जातात. वाढदिवस कोणत्यावारी येतोय ? गणपती केव्हा आहेत ? दिवाळीत भाकड तिथी आलीय का ? जोडून सुट्ट्या किती आल्यात ? ह्यातले काहीच न बघणारा विरळाच. काही कॅलेंडरच्या मागील भाग वाचनीय असतो मग निवांत पणे तो वाचणे हे ओघानेच आले. शनिवार , रविवारची वर्तमानपत्राची पुरवणी वाचल्याचे फीलिंग येते त्याने. पाककृती , भविष्य ते रेल्वे टाईमटेबल वाट्टेल ते सापडते त्यात. महिना संपल्यावर , पान उलटल्यावर त्या पानांचे विविध उपयोग सुरु होतात. लहानपणी पुस्तकांना कव्हर घालायला आणि मोठे आकडे असले कि ते कापून रोल नंबर तयार करायला हि पाने मी आणि माझ्या आसपासचे वय असणाऱ्या बऱ्याच जणांनी वापरली असणार नक्की. काही कॅलेंडर फार देखणी असायची. एकच मोठे चित्र आणि फाडून टाकायच्या महिन्याच्या पट्ट्या. कधी कधी त्या तारखांच्या पण असत. रोज ती तारीख फाडायला काय गम्मत यायची. बहुतेकवेळा किराणावला असले कॅलेंडर द्यायचा आणि हमखास त्यात जाडपुठ्यावर छापले

शिंपला

Image
  मी आणि माझ्या दोन मैत्रिणी समुद्राकाठी चालत होतो. सुदैवाने आम्ही तीन आणि तो अक्खा किनारा , या व्यतिरिक्त कोणीच न्हवते. अचानक माझी नजर एका उघडलेल्या शिंपल्याच्या पेटीकडे गेली. आवासून उघडा पण तरीही दुसऱ्या भागाशी जोडला असलेला शिंपला उन , पाणी , वाळू , यात चमकत होता. न रहावून मी तो उचलला आणि झिप बॅग मध्ये लॉक केला. आणि मग त्या शिंपल्याने मन जणू अनलॉक केले , तिघीनांही नादच लागला. शंख , शिंपले , गोगलगाई , खेकड्यांची घरे , समुद्रीफेसाचे दगड बघता बघता स्थळ काळ वेळेचे भान हरवून बसलो... हे म्हणणे किती सोपे आहे कि भान हरपले पण खरंच तसे होते कां ? नक्कीच आम्ही रोजच्या धकाधकीतून , व्यापातून बाहेर पडलो होतो. समुद्र , लाटा , वाळू , झाडे , दगड अन धोंडे सगळ्यात रमलो होतो. गप्पांमध्येही रोजच्या उरलो न्हवतो. पण मेंदूचा एक कप्पा रोजचीच कामे करत होता. Ferry च्या वेळेकडे घड्याळाचे लक्ष होते , ठराविक अंतरापासून परत फिरायचे हि टिकटिक डोक्यात वाजत होती. चांगली जागा सापडली कि बसून थोडे खाऊया याची जाणीव पोटातली गुरगुर करून देत होतीच. तरीही हे आमच्या वागण्या बोलण्यात कुठंच न्हवते. तिथे उरल्या होत्या शंख शिं

चहा

Image
“ आज आपण खरा चहा पिऊया का ?” या वाक्याने शनिवारची सकाळ उजाडली आणि पाचच मिनिटात उकळणाऱ्या चहाचा सुगंध घरभर पसरला. आता प्रश्न पडेल कि खरा चहा हा काय प्रकार ?   तर खरा म्हणजे आपला नेहमीचा भारतीय उकळलेला , साखर घातलेला , झाकण ठेवून मुरात ठेवलेला , माफक दुधाचा चहा. एरव्ही सत्राशेसाठ flavour चे , थंड , गरम , दूधविरहित , डीपडीपचे , व्हेंडिंग मशीनचे असे सगळे झाले कि आठवण येते अमृततुल्य कटेल चहाची. मला खात्री आहे आपल्या सगळ्यांच्या असंख्य आठवणी असणार त्याच्याशी जोडलेल्या. ज्या त्या पदार्थात कांदा , लसूण , टोमॅटो , टाकल्यासारखे रोज चहात आले , गवतीचहा , वेलदोडा , मसाला टाकला कि त्या वाफाळणाऱ्या चहावर अन्याय होतो. हा सगळा मेकअप एखाद्या special पावसाळी , धुक्याच्या दिवशी. घरी कोणी आले कि पाच मिनिटात आधण ठेवल्याचा आवाज आला कि त्या घरातल्या लोकांशी मनातून आपोआप नाते जुळते. “ चहा ला या एकदा ” मधली आपुलकी अस्सल चहाबाजलाच कळते. नाजूक नक्षीच्या कपातून काय किंवा काचेच्या ग्लासातून काय वेळेला चहा मिळाला कि बाकीच्या गोष्टी नगण्य ठरतात. मी आणि माझी एक मैत्रीण चहा टाक आलेच म्हणून चहाला भेटायचो आणि कप व