Posts

Showing posts from February, 2021

ख्वाबिदा

Image
  ख्वाबिदा - माझ्या मनात   डोक्यात केव्हाही , कधीही येणारे विचार , त्या क्षणी जरी मला ते रँडम वाटले तरी मलाही माहितेय त्यांचा कुठे तरी माझ्या भूत , वर्तमान यांच्याशी संबंध असतोच. कोणताच विचार हा आभाळातून पडल्यासारखा किंवा कुत्र्याच्या छत्रीसारखा उगवत नक्कीच नाही. मग कां येतात ते मनात ? मांडावेसे , सांगावेसे वाटतात   म्हणजे तरी काय ? कोणीही लिहते , बोलते म्हणजे तरी नक्की काय करते ? प्रत्येक विचारातली , लिखाणातली पात्रे , प्रसंग काल्पनिक म्हणजे तरी काय ? १००% कल्पना असे काही असते कां ? पण १००% सत्य हे तरी असते कां ? आपले विचार सत्य आणि कल्पना या तळ्यात मळ्यात सदैव वावरत असतात. एखाद्या क्षणी हि रेषा धूसर होते आणि मग उमटतो तो आपल्या मनाचा प्रवास. सत्य , असत्य , कल्पना , वास्तव या पलीकडचा. रिपोर्ताज लिहणारे वास्तव मांडतात. पण ते तरी वास्तव कुठे असते ? ते त्यांच्या मनाला पटलेले विचारांनी दाखविलेले वास्तव असूच शकते. माणसे वेगळी मने वेगळी वास्तव वेगळे. सत्य आणि कल्पना या दोघांच्या मिश्रणातून आपल्याच मनात आपले एक जग असते. ते प्रत्येक व्यक्तीकडे घटनेकडे वेगळ्याच दृष्टिकोनातून बघत राहते , मते

चष्मा

Image
  कालपासून पाऊस रिमझिम रिमझिम पडतोच आहे , थोडे उघडल्यावर बाहेर पडलेतर पाच वाजताच आभाळ दाटून आंधारले होते. पावसाचे पाणी पडलेल्या चष्म्यातून ढग अजूनच राखाडी दिसत होते. रोजचाच तो समुद्रकिनारा पण आज ढगाळलेला , पाणी गढूळलेले आणि रोजची गर्दीही (तशी एरवीही ती तुरळकच असते.) न्हवती. एक सर येऊन गेली आणि आभाळ मोकळे झाले. दिवस मावळू लागल्याने तसाही प्रकाश कमीच झाला होता. अचानक मला चष्म्यावरच्या पाण्याच्या थेंबांची जाणीव झाली ते पुसले आणि माझ्या दृष्टीवरचे मळभही क्षणात दूर झाले. बुडणाऱ्या सूर्याने राखाडी ढगांची किनार सोनेरी केली होती. उथळ जागेत समुद्राचा तळ नितळ पाण्यातून दिसू लागला , लांबवर चालणारी दोन-चार डोकीही दिसली. माझ्याही पावलांना गती आली… एका छोट्याशा कृतीने माझाच रोजचा चष्मा स्वच्छ पुसल्याने , तेच दृश्य एकदम सुस्पष्ट झाले. बारकावे दिसले आणि विचारही बदलले. मनात आले या दोन काचांनी गेली अनेक वर्षे किती प्रामाणिक साथ दिलीय. आता तर मी चष्म्याशिवाय माझा विचारच करू शकत नाही इतका तो माझा अविभाज्य भाग झालाय. सवयीने नाकाला चष्म्याचे ओझे नाही जाणवत आता. चष्म्याची चेहऱ्याला आणि माझ्या चष्म्यासकटच्य

साम्य

Image
खाराच्या मिरच्या घातल्या , दोन दिवसांपुर्वी ; चक्क मोठी बरणी भरून आणि मग जेवणाच्या आधी एका छान वाडग्यात काढून फोडणी घालतांना मला एकदम माझी आई झाल्यासारखं वाटले. जेवायला वाढायच्या आधी वेगवेगळ्या चटण्या , लोणची , कोशिंबिरी सारखी करणारी , फोडण्या धालणारी आई कायम मनात मेंदूत कोरली गेलेली. अचानक मी ती असल्यासारखं वाटले आणि... दिल गार्डन गार्डन हो गया! त्याचवेळी पटकन आठवली ती तात्तोचान ( Tetsuko Kuroyanagi या जपानी लेखिेकेचे पुस्तक) मधली छोटीशी तात्तोचान. कॅंपला गेल्यावर सुप मधली गरम पळी ढवळून पोळल्याचे नाटक करित कानाच्या पाळीला हात लावून ‘सस्स’ करणारी... हे पाहून तिच्याच वर्गातला दुसरा छोटा मुलगा कारण विचारतो तेंव्हा आई हे असे करते आणि हे करायचे मी ठरवलेच होते हे मोठ्या कौतुकाने सांगते. कां वाटते असे करावे ? Follow करण्याची इच्छा येते कुठून ? आपण आई/ बाबा/ बहीण/ भाऊ यांच्यासारखे दिसतो , असे कुणी म्हटल्यावर उगीचच बरे तरी कां वाटते ? कितीतरी मित्र मैत्रिणीं असतांना काहीतरी common thread असणार्यांशीच मैत्री कां होते ? साम्य शोधत राहतो आपण कायम या सगळ्यात. वेगळेपणाचे attraction असतेच.

सवय

Image
' मागून तिसऱ्या लाल झाकणाच्या बरणीत बघ ' किंवा ' दुसऱ्या ड्रॉवरच्या डाव्या कोपऱ्यात वरून दुसरा ' हे असे direction सांगणारे संवाद बऱ्याचदा आमच्या घरात चालू असतात. आणि मग माझ्या डोळ्याला चष्म्यात लेसर स्कॅन बसवलाय का हे चेक होते. हा सवयीचा परिणाम का दुष्परिणाम कोण जाणे. त्याच वस्तू तीच ठिकाणे , वारंवार ठेवणारा तोच हात सगळे सवयीने होऊन जाते. सवयीने सगळे सोपे होते. हातांना डोळे फुटतात असे वाटते. एक comfort zone निर्माण होतो. एका डब्याची जागा बदलली तरी वैतागणारे अनेक जण असतात आणि रोज उठून वस्तूंच्या जागा बदलणारे पण. सवयीच्या वस्तू , सवयीचे रस्ते , जागा , काम आणि मुख्य म्हणजे सवयीची माणसे. खूप वेळा माणसांची , त्यांच्या वागण्याबोलण्याची न्हवे असण्याचीच इतकी सवय होते कि त्यांची जाणीव होणेच बंद होते. मग सवयीनेच त्यांचे महत्वहि कमी होते. साखरेचा डब्बा रोज तिथेच आहे हे माहित असल्यावर त्याचे असणे जाणवणे थांबते तसे. पण अचानक गोष्टी जागा बदलतात. रस्ता चुकतो , काम बदलते आणि कधी कधी माणसेही दूर होतात. आपण चाचपडतो , धडपडतो , नाराज होतो पण मग हळूहळू त्याचीही सवय लागते. नवीन वस्तू , ग