साम्य

खाराच्या मिरच्या घातल्या, दोन दिवसांपुर्वी; चक्क मोठी बरणी भरून आणि मग जेवणाच्या आधी एका छान वाडग्यात काढून फोडणी घालतांना मला एकदम माझी आई झाल्यासारखं वाटले. जेवायला वाढायच्या आधी वेगवेगळ्या चटण्या, लोणची, कोशिंबिरी सारखी करणारी, फोडण्या धालणारी आई कायम मनात मेंदूत कोरली गेलेली. अचानक मी ती असल्यासारखं वाटले आणि... दिल गार्डन गार्डन हो गया!

त्याचवेळी पटकन आठवली ती तात्तोचान (Tetsuko Kuroyanagi या जपानी लेखिेकेचे पुस्तक) मधली छोटीशी तात्तोचान. कॅंपला गेल्यावर सुप मधली गरम पळी ढवळून पोळल्याचे नाटक करित कानाच्या पाळीला हात लावून ‘सस्स’ करणारी... हे पाहून तिच्याच वर्गातला दुसरा छोटा मुलगा कारण विचारतो तेंव्हा आई हे असे करते आणि हे करायचे मी ठरवलेच होते हे मोठ्या कौतुकाने सांगते.

कां वाटते असे करावे? Follow करण्याची इच्छा येते कुठून? आपण आई/ बाबा/ बहीण/ भाऊ यांच्यासारखे दिसतो, असे कुणी म्हटल्यावर उगीचच बरे तरी कां वाटते?

कितीतरी मित्र मैत्रिणीं असतांना काहीतरी common thread असणार्यांशीच मैत्री कां होते? साम्य शोधत राहतो आपण कायम या सगळ्यात. वेगळेपणाचे attraction असतेच. Opposite poles do attract, पण सरधोपट आयुष्यात साम्यच शोधतो आपण. Follow करतांनाही काहीतरी पटलेले, आवडलेले, आपल्यातही हे असावे असे वाटणारे असेलतरच ते घडते. ‘हम आपके है कौन’ मधल्या जांभळ्या साड्या गल्ली बोळात विकत मिळू लागल्या आणि शेकड्याने लोकल माधुरी तयार झाल्या, त्या या आपणही तसे असावे या feel good factor मधूनच बहुतेक. Social media वरच्या influencers ना follow करणे, काही गोष्टींचे trend तयार होणे हे ही एखाद्यासारखे वागावे, बोलावे, दिसावे, हसावे असे वाटण्यातूनच. एखाद्याची नक्कल करणे ही त्याच्या कामाला दिलेली सगळ्यात मोठी पावतीच असते.त्यात आनंद मिळतो म्हणून चांगल्या गोष्टीची नक्कल करणे, follow करणे चालूय तोवर ठिक आहे पण त्याची सीमा ओलांडली गेली आणि 'Keeping up with the Joneses' झाले की मग आवघड.

साम्य शोधणे, follow करणे याही पलीकडे जावून एखाद्याची प्रत्येक कृती repeat करणे यात काय मजा? शेवटी नक्कल ती नक्कलच. आई सारखे लोणचे घातले म्हणून मी आई नाही ना होवू शकत. तो प्रयत्न तरी कां? ती ती आहे आणि मी तीचीच मुलगी असले तरी मीच आहे. आवडले ते घ्यावे, तसेच करावे पण त्यातही कणभर माझे मीपण मिसळावे हे भान जोवर आहे तोवरच साम्य शोधण्यात मजा आहे आणि क्षणभर आईसारखे असण्यात मनभरून आनंदही आहे.

 

- श्रुतकिर्ती

१२/०२/२०२१

 


बिंबातून प्रतिबिंब जन्मले

प्रतिबिंबित हे बिंब जाहले,

मोही गुंतून मृगजळा

कवटाळून बसले!

Comments

  1. यातली "Local माधुरी" खूप आवडली. 😃👌. त्यातील compliment कळली, ती जिंकली. कितीही momentary feeling असले तरी त्यातला Win Win factor कायमची positivity देऊन जातो. Loved it. 💜💗💜

    ReplyDelete
    Replies
    1. Momentary feelings can create life time happiness. Local माधुरी गोडच असते😊

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान