Posts

Showing posts from September, 2023

काहीतरी राहिलंय!

Image
गणपती गौरींच्या आधीचा वीकएंड आला आणि हळूहळू चाललेल्या तयारीने वेग घेतला. सगळे बिट्स अँड पिसेस जुळून यायला लागले. घर आवरलेले दिसायला लागले आणि सणाचे वातावरण जाणवायला लागले. तशा याद्या , पुन्हा पुन्हा केलेल्या याद्या , खरेदी हे सगळे बरेच आधी चालू असतेच पण वेग येतो तो दोन दिवस आधीच. मेंदू आणि हात भराभर चालतात आणि to do   लिस्ट टिक ऑफ व्हायला लागते. एकाच्या जागी चार हात उत्साहात कामाला लागतात आणि दमायला न होताच कामाचा उरक पडतो. पण हे सगळे चालू असताना मन मात्र एकीकडे काहीतरी राहिलंय , काहीतरी विसरलंय असे सारखे सांगत असते. मेंदू आठवायचा प्रयत्न कसून करत असतो पण छे! सगळे झालेय , होत आलेय असेच चित्र कागदोपत्री दिसत असते. "तुला शंकाच जास्त " "टेन्शन आलाय का ? म्हणून असे होत असेल" अशी उत्तरे मिळूनही काहीतरी राहिलंय चा भुंगा काही पिच्छा सोडत नाही. मग शेवटचे अस्त्र निघते. पूजा , व्रत-वैकल्ये आपल्या समाधानासाठी असतात. काही राहिले तरी त्याने फार फरक पडत नसतो. भक्तिभाव महत्वाचा. तो गणपती काही हे राहिले ते राहिले असे म्हणणार नाहीय. असे सगळे सल्ले मिळतात. ते मनाला माहित अस

नीलमोहोराचे झाड

Image
फुलांनी बहरलेलं नीलमोहोराचे झाड, जाता येता हसतं ओळखपाळख नसतांनाही, दोन मिनिटे रस्त्यात थांबवतं मी ही शिष्टासारखी,  उगीच थोडीशी हसते त्याचे फुललेले रूप डीपी वर चिकटवून, ओळख साजरी करते फुले गळली, फांद्या उरल्या तरीही झाडाने रोजच,  ओळखीच्या खुणा मिरवल्या मीच आपल्या नादात, माझी रोजचीच घाई उगीचच जातायेता एकदा झाडाला बघून जाई झाड तिथेच, तसेच उभे शिशिरामुळे निष्पर्ण  पण तितकेच देखणे लांबूनच त्याला बघून, मला उदासी जाणवली झाडाने मात्र अजूनही, ओळखीचीच हिरवी खुण दाखविली ऋतू बदलले, झाड पुन्हा बहरले भरभर चालणार्या माझे, थोडे पाउल रेंगाळले नीलमोहोर पुन्हा फुलला, आता मात्र मी रस्ता बदललला नीलमोहोराची फुले आता टपटप गळतात झाडाखाली गप्प बसलेल्या माझ्याशी खुप गप्पा मारतात… -श्रुतकिर्ती ०२/०९/२०२३