नीलमोहोराचे झाड

फुलांनी बहरलेलं नीलमोहोराचे झाड,

जाता येता हसतं

ओळखपाळख नसतांनाही,

दोन मिनिटे रस्त्यात थांबवतं

मी ही शिष्टासारखी, 

उगीच थोडीशी हसते

त्याचे फुललेले रूप डीपी वर चिकटवून,

ओळख साजरी करते

फुले गळली, फांद्या उरल्या

तरीही झाडाने रोजच, 

ओळखीच्या खुणा मिरवल्या

मीच आपल्या नादात, माझी रोजचीच घाई

उगीचच जातायेता एकदा

झाडाला बघून जाई

झाड तिथेच, तसेच उभे

शिशिरामुळे निष्पर्ण 

पण तितकेच देखणे

लांबूनच त्याला बघून,

मला उदासी जाणवली

झाडाने मात्र अजूनही,

ओळखीचीच हिरवी खुण दाखविली

ऋतू बदलले, झाड पुन्हा बहरले

भरभर चालणार्या माझे,

थोडे पाउल रेंगाळले

नीलमोहोर पुन्हा फुलला,

आता मात्र मी रस्ता बदललला

नीलमोहोराची फुले आता टपटप गळतात

झाडाखाली गप्प बसलेल्या माझ्याशी

खुप गप्पा मारतात…


-श्रुतकिर्ती

०२/०९/२०२३



Comments

  1. माझी प्रिय ख्वाबिदा श्रुती 😊, लेखिकेची कवयित्री होतेय वाटतं! कदाचित निसर्गाचा rhythm जाणवल्यावर हे आपोआप होतंय बहुधा, very happy for you 💜😇

    ReplyDelete
    Replies
    1. मनात येईल ते लिहणे एवढेच ख्वाबिदा मागचे उद्दीष्ट.. मग ते गद्य काय किंवा पद्य काय.. तुला आवडले हेच खुप छान वाटतेय💕

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान