भान
आजूबाजूला बघतांना कळतं;
खंबीर बनायचंच असतं,
थोडं अवघड असतांनाही सगळं छानंच असतं
मृदू , कोमल ,हळूवार ;
मन जपायला शिकलेलंच असतं,
कारण आधीचं गिरमिटलेलं सगळं पुसायचं पण असतं
मेहनत, काम , कष्ट ;
गरजेला सगळं करायचंच असतं,
पण स्वप्न पाहातांना मात्र दिवस न् रात्रीचं गणितंच नसतं
धटाशी धट आणि खटाशी खट ,
जगराहाटीला धरून वागायचं
असतं,
स्वतःसाठी मात्र स्वतःच ताठ
कण्याने उभं रहायचंही असतं
चुकलं की सुधरवायचं असतं;
हरलं की पुन्हा नव्याने खेळायचं असतं,
कुठेतरी कधीतरी विश्वास ठेवून बघायचंही असतं
प्रयत्नात कमी पडायचंच नसतं;
हरवलेलं शोधायचही नसतं,
पण पुन्हापुन्हा गमावेल असं काही करायचंही नसतं
विचार करून, मनाशी बोलून
शहाण्यासारखं वागायचं असतं;
पण तरीही प्रत्येकक्षण जगणं सोडायचंही नसतं
मनापासून जगण्याचं भान कधी सोडायचंच नसतं….
-श्रुतकिर्ती
२७/१०/२०२३
Very crucial point , very hard to follow — मनापासून जगण्याचं भान कधी सोडायचंच नसतं….
ReplyDeleteThank you
Delete