Posts

Showing posts from May, 2021

त्याला तयारी पाहिजे!

Image
  सध्या रोजच्या बातम्या पहिल्या , ऐकल्या , वाचल्या कि कुठेतरी संकट , अडचणी आजूबाजूला वावरताहेत याची जाणीव होते. मग ते वादळ असो , बुशफायर असो , किंवा   गेल्या वर्ष दीडवर्षातला जीवघेणा अनुभव असो. पण संकटाशिवाय   जगण्याला मजा ती काय ? एकदम self-help पुस्तकातला किंवा motivational quotes मधला dialogue वाटतो ना वाचायला. पण येणारच आहेत हि छोटीमोठी वादळे हे माहित असतेच कि रोज सकाळ झाल्यावर. नव्याने दिवसाची सुरवात केल्यावर , फरक एवढाच कधी वाघोबा म्हणावे लागते तर कधी वाघ्या. मग विचार करताना मनात आले ; आपल्या प्रत्येकाचा संकटाला फार काय छोट्यामोठ्या अडचणीला तोंड देण्याचा , react होण्याचा algorithm वेगवेगळा असतो. पद्धत वेगळी असते. कधी रणछोडदास बनणे पसंत करतो तर कधी आ बैल मुझे मार! तर कधी calculated risk. अडचण वेगळी , परिस्थिती वेगळी , माणूस वेगळा , प्रतिक्रिया वेगळी. ' आई ' ' बाबा ' असे मोठे भोकाड पसरण्यात दादा , ताई , मित्रमैत्रिणी अशी भर पडत पडत एक दिवस आपण एकटेच या सगळ्याला सामोरे जायला तयार होतो , आणि मग नंतर कुणाच्या तरी अशाच हाकेला ओ देण्याचा प्रवास सुरु होतो. आस्तिकांन

Expecting the Unexpected!

Image
  शुक्रवार संध्याकाळ, खूप थंडी पडलीय आणि नेटफ्लिक्सवर सस्पेन्स मूवी चालू होता. सुरवात तर एकदम भारी झाली, काय चालूय याचा थांगपत्ता लागत न्हवता. आमच्या तिघांचेही तर्क कुतर्क चालू होते. मधेच काहीतरी घडले आणि सगळे कोडे उलगडल्यासारखे वाटले. पुढची दहा मिनिटे step by step मिस्टरी सोडवण्यात गेली आणि मग...   मग काय सिनेमा बघण्यातला रसच गेला. एकेकाने काढता पाय घेतला. जोवर शेवट कळात न्हवता तोवरच मज्जा होती. बऱ्याच गोष्टींचे असे होते नाही कां? एकतर्फी मॅच कधी बघावीच वाटत नाही. भले आपण जिंकणार्याच्या बाजूचे असलो तरी. अटीतटीने, शेवटच्या क्षणापर्यंत हारजितीचे पारडे वरखाली करणारी मॅचच लक्षात राहते. निवडणूकांचे निकालही exit poll प्रमाणेच आले तर चर्चेतही येत नाहीत. न्युज न टिकता ब्रेकिंग न्यूज मोठी होण्याचे कारणही हेच असावे बहुतेक. कहानी में ट्विस्ट नसेल तर काय मजा असेच झालेय. वॅनिला, स्ट्रॉबेरी आईस्क्रिमचे नाव काढताच जिभेवर चव जाणवते आणि मग तोचतोचपणा घालवायला चिली आईस्क्रिम, पुरणपोळी आईस्क्रिम हे असे मेंदूला आणि जिभेला गोंधळात टाकणारे फ्लेवर ट्राय केले जातात.  थोडक्यात काय अपेक्षित न घडल्याचा आनंद जास्

व्यंगचित्रे

Image
  पा च मे ला National Cartoonist Day झाला. असे काही असते हे माहीतच न्हवते मुळी पण त्या दिवशी चिंटू त्याच्या मित्रांची स्केचेस काढतोय असे चित्र बघायला मिळाले आणि खूप काही आठवले. कार्टून बघायला , त्याचा आनंद घ्यायला लहान असायची गरज नसते हे सगळ्यात भारी. म्हणून तर कार्टून नेटवर्क , ABC किड्स , पोगो असले बघून फार फार मज्जा येते. आजही शॉन द शीप बघताना हसू येतेच आणि टॉम अँड जेरी बघून सगळा कंटाळा  जातो.  किती तरी , नावे घ्यायला लागले तर वर्ड लिमिट क्रॉस होईल एवढे शो मला मनापासून आवडतात. पण हि झाली टीव्ही वर बघायची. सगळ्यात जवळची वाटतात ती व्यंगचित्रे पेपरातली आणि मासिकातली. रोज महाराष्ट्र टाइम्स हातात पडला कि R. K. Laxman यांचे ' कसं बोललात ' वाचायला मिळे. राजकारण , समाजकारण याची ओळख त्यातूनच तर झाली. ब्रश स्ट्रोक्स मध्ये किती अफाट ताकद असते ते त्यांच्या caricatures वरूनच कळले. त्या व्यंगचित्रात कोणता नेता आहे ते शोधून बाबांना सांगायचे हा आवडता उद्योग होता त्या काळातला. इंदिरा गांधींचे केस आणि साडी , गांधीजींचा चष्मा , जयललितांच्या साडीची केप आणि या सगळ्यावर वरताण प्रत्येक ठिकाण