Posts

Showing posts from November, 2023

दिवाळीची पणती

Image
  कॅलेंडर आले की , सणवार आणि विकएंड हे गणित मांडायला सुरुवात होते.   पुण्यात असताना सुट्टी बुडाल्याचे होणारे दुःख , इथे आनंदात रूपांतरित कधी झाले   ते कळलेच नाही. यावर्षीही दिवाळीत शुक्रवार , शनिवार , रविवार आलेत आणि त्यातही भाकड दिवस आलाय म्हटल्यावर आनंदच आनंद.  मग साधारण जूनच्या आसपास मित्रमंडळीत यावर्षी आमच्याकडे दिवाळी असे एक जण ठरवते , आणि सगळे लोक त्या दिवसाची वाट पाहायला लागतात. मेनू प्लान होतो. ठेवणीतले कपडे बाहेर निघतात. गिफ्ट्स आणल्या जातात आणि ज्याच्या घरी कार्यक्रम ते तर दोन वीकेंड आधीपासून, घरदार आवरावरी ते घर सजवणे या सगळ्यात बिझी होऊन जातात. मेसेजेस ना पूर येतो आणि ठरलेल्या दिवशी नटून थटून सगळे वेळेत पोहोचतात. आठवणीने आणलेला फराळ , जेवायसाठी केलेले पदार्थ , दिवे , रांगोळ्या सगळ्याबरोबर उत्साहाने गप्पाच गप्पा रंगतात. खेळ होतात , टीम्स पडतात. लुटुपुटीची हार जीत होते. मेंदू खाजवत , चर्चा रंगत चहा पाण्यावर दिवसाची सांगता होते. घरी परततानाचा प्रवास मजेशीर असतो. दिवसभरातल्या गमती जमती रंगवून रंगवून एकमेकांना सांगितल्या जातात. फोटो बघताना ते क्षण परत जगले जातात. मन पोट

शॅापिंग कार्ट

Image
  ॲानलाईन शॅापिंगच्या चकव्यामध्ये फिरतांना मधूनच ध्यानीमनी नसलेले काहीतरी दिसते आणि मग वाया घालवलेला वेळ इतकाही  काही वाया गेला नाही असे वाटू लागते. असेच काल अचानक एका साईटवर किल्ल्यातले मावळे दिसले आणि काय भारी असे पटकन वाटले. ते प्रवास करून वेळेवर माझ्यापर्यंत पोहोचणार नाहीत , मिळाले तरी मी किल्ला कुठे करणार होते त्यांना मांडायला ? असे सगळे असूनही पाच मिनिटे मज्जा वाटलीच. किती विचित्रपणा मनाचा , कुंभारवाड्यातून असंख्यवेळा पाटीभर खेळणी आजूनही आज किती अप्रुप वाटले होते त्या मावळ्यांचे. मग छंदच लागला , अशा सगळ्या गोष्टी बघत बसण्याचा. काय नव्हते त्यात ? सगळी दिवाळी त्यात सामावलेली होती. जे जे मनात येत गेले ते कुठेतरी सापडतच होते. आणि जगाच्या पाठीवर कुठूनही कुठेही पोहचवणारे असंख्य होते. त्या पाचदहा मिनिटांच्यां ब्राउझिंगने गेल्या सगळ्या वर्षातल्या दिवाळ्या डोळ्यांपुढे नाचवल्या. आणलेले , केलेले आकाशदिवे , पणत्या , रांगोळ्या , रंग , तेल साबण उटणे….बरं नुसतं साबण दिसत नसतंच मनाला , ते आठवले की अगदी तालासुरात मोती साबणाची जहीरात हटकून आठवतेच. रांगोळीबरोबर, उदबत्तीने भोक पाडलेला कागद