Posts

Showing posts from February, 2022

संततधार

Image
    मागच्या शुक्रवारी ख्वाबिदा लिहताना तीव्र उन्हाळा त्रास देत होता . घरी-दारी प्रत्येक जण ऊन कमी होण्याची वाट पाहत होते . सोमवार पर्यंत घामेजूननच सगळी कामे चालू होती . हवामान खात्याने भरपूर पाऊस सांगितलेलाही होता पण त्या दिवशी मात्र भरपूर काय याचा अंदाज अंधुकहि येत नव्हता . मंगळवार उजाडला आणि पावसाला सुरूवात झाली . आठवडा पुढे सरला आणि पाऊसही  . गुरुवारपासून तो संततधार झाला , जनजीवन विस्कळीत ,  मथळे बातम्यात आले . अजूनही रोजचे व्यवहार चालू होते व्यवस्थित . फक्त ओल्या कपड्यांची , बूट मोजे यांची , निथळणारा छत्र्यांची , आणि दारातल्या पाय पुसण्यावर चिखलाच्या ठशांची  संख्या वाढली होती . पाच मिनिटाचे अंतर रांगत्या ट्रॅफिक ने दहा-बारा मिनिटे केले होते . आता तीव्रता जाणवायला लागली होती . नद्यांचे, धरणाचे पाणी वाढल्याची नोटिफिकेशन्स   कॅन्टिन्यूअस झाली.   रस्ते बंद , पॉवर फेल्युअर , रस्ता वाहून गेला , हे टीव्ही आणि रेडिओवर धोक्याच्या   एकामागोमाग येणाऱ्या सूचनांमध्ये सारखे क ळत होते . रोजच्या वेळेला घरी परत येताना रस्त्यातले शॉपिंग सेंटरचे पार्किंग भरून वाहताना पाहिले आणि व

भविष्य

Image
  आज रोजच्यासारखे कॅाफी ब्रेकमधे गप्पा मारतानां एकीने ड्रॅावरमधून पाच सहा प्रकारचे tarot card set काढले. जे आवडेल ते घ्या म्हणून प्रत्येकाला दिले , कारण काय तर तीच्या आईने ते ओळखीच्यांना वाट म्हणून दिलेले. बोलतां बोलतां ती म्हणाली की तीची आई spiritual healer आहे. आणि पुढच्या दोन मिनिटात आजूबाजूच्यांचे कुतूहल वाढतच गेले. त्या दोन मिनिटा माझेही मन कुडमुड्या ज्योतिषापासून ते मोठे मोठे tv show करणार्यांपर्यंत फिरले. का एवढे महत्व पुढे काय होणार ते जाणून घ्यायला ? काय वाढून ठेवलेय ते पहायला ? भूतकाळाच्या आठवणित रमायला सगळ्यांनाच आवडते. वर्तमान त्रासदायक असेल तर संपण्याची घाई असते. भविष्यकाळात पोहचायचे आणि तिथे सगळे अलबेल आहे असे कोणीतरी सांगावे अशी तीव्र इच्छा असते. वर्तमान छान असेल तर ते संपूच नये. त्याला दुःखाची झालर लागू नये म्हणून खात्री देणारा कोणीतरी असावा असे वाटत असते. भविष्य , ग्रहतारे दशा , कुंडली , रत्ने , खडे , tarot हे खरे का खोटे या वादात मला स्वारस्य नाही. तो आपला विषयही नाही. मनाचे खेळ आणि भविष्य जाणून घ्यायचा प्रयत्न करतानां मेंदू आणि मन काय विचार करतात याचेच महत्व जा

स्वप्न

Image
  टोमॅटोच्या झाडाला फुले येऊ लागली आणि मला रोज छोटा टोमॅटो शोधायचे खूळ लागले . एक दिवस त्या पानांनी , फांद्यांनी , हिरव्यागार झालेल्या वाफ्यात दोन इटुकले टोमॅटो दिसले . म्हणजे मला एकटीलाच दिसले . ‘ आनंद पोटात माझ्यामाईना ’ या गतीने घरादाराला बातमी पोचली . दोन प्रेक्षक कुतूहलाने बागेत आले . छ्या ! ते टोमॅटो गुल . शोधाशोध झाली थोडीफार आणि निष्कर्ष निघाला , तुला स्वप्नात दिसले असणार . चोविस तास डोक्यात तेच चालू होते ना तुझ्या . टोमॅटो होते का नव्हते , तो भाग वेगळा . पण मी माझ्याच स्वप्नांकडे पुन्हा बघायला लागले . मानसशास्त्राचा अभ्यास शून्य . त्यामुळे माझे लॉजिक माझ्यापुरते लागू होणारे . विचारच जर स्वप्नात दिसत असतील तर फरक काय विचारात आणि स्वप्नात ? तसेही स्वप्नातले सत्यात आणि सत्यातले स्वप्नात आणायला विचारांचे माध्यम लागतेच . सर्वसाधारणपणे स्वप्न पडतातही कोणती ? जवळची माणसे , आवडत्या घटना , वस्तू , जागा किंवा याच सगळ्या गोष्टी , पण नावडत्या . कधी घाबरवणारी स्वप्ने तर कधी रडवणारी , कधी आठवुन नंतरही हसू उमटवणारी . कधी तुटक तर कधी लांबलचक , ब्लॅक अँड व्हाईट

फोटोतला आनंद

Image
  एखाद्या वर्किंग डे ला डब्यातले जेवण संपवून फोन उघडला की सोशल मीडियावर कोणी ना कोणी छान छान पदार्थांचे फोटो टाकलेले असतात , आणि पाच मिनिटात यातले काय काय करावे ? जमेल का ? कच्चे सामान आहे का ? असले सगळे प्रश्न डब्यात जर काही बोरिंग काही असेल तर ते विसरायला लावतात. काल असेच झाले. व्हाट्सअँपच्या ग्रुपवर कोणीतरी अप्पे , चटणी सांबार असा सुंदर दिसणारा ब्रेकफास्ट पोस्टला होता. फोटोतुनच पदार्थ झक्कास जमला हे   जाणवत होते. फोटोतून हातात येणार नसला तरी चित्रातल्या अप्प्याची चटणीत बुडवून खाल्लेली चव मेंदूने साठवलेली होतीच ती चटकन मनाला फॉरवर्ड झाली आणि तोंडाला पाणी सुटले. म्हणजेच जिभेने दाद दिली. झाले दोन मिनिटात पक्के ठरले , आता हा पदार्थ झालाच पाहिजे. पण... या अशा पदार्थाना पूर्वतयारी हवी ना. आले मनात वाढले ताटात कसे शक्य ? मग कोणीतरी सुचवले , इंस्टंटवाले कर ना , मी रेसिपि सांगते. कोणी म्हणाले रेडी बॅटर वापर. एकाने तर ऑर्डर करण्याचे ठिकाणही कळवले. हे ऑपशन्स काही वाईट नसतात. वेळेला सगळेच  का मा ला येते , पण आज नाही. फोटोने पद्धतशीरपणेच पदार्थ करायला भाग पडले होते. डाळ-तांदूळ भिजण्याचा ,