Posts

Showing posts from January, 2024

झाडे

Image
जानेवारी आला आणि ॲास्ट्रेलियन ओपन सुरू झाली. वय वाढले की, रुटिनमधे गुंतत गेले की आणि आपले आवडते प्लेअर रिटायर झाले की खेळातील रस कमी होतो तसेच या गेम्सकडे दुर्लक्ष झाले होते. अचानक काल बातम्यांमध्ये  जोकोविच च्या आवडत्या झाडाची बातमी झळकू लागली. मेलबर्नच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये त्याचे एक लाडके झाड आहे. त्याला भेटून , त्याच्याशी बोलून “ He keeps himself grounded “ हे ऐकतांनाही भारी वाटत होते. रोजच्या कामाच्या रस्त्यात खुप गर्द झाडी आहे. एक झाड जातानांची कितीही ही घाई  थांबवत एक क्षण तरी नजर फिरवायला भाग पाडतेच. जवळ जवळ शंभर एक वर्ष वयाची ती सगळी झाडे. चार सहा जणांनी हात पसरले तरी बुंधा मोठाच पडेल असे ते डेरेदार हिरवे झाड. गार्डनिंग ॲास्ट्रेलिया वाला कोस्टा जेंव्हा या रस्त्यावर आला होता, तेंव्हा या सगळ्या झाडांना त्याने मिठी मारली होती असे एका शो मध्ये म्हणाला होता. काय मिळत असेल या सगळ्यांना  या अशा बुढेबाबा बरगद   टाईप झडांशी बोलून? या झाडांच्या भोवती रेंगाळतांना जाणवते त्यांची समृध्दी, पानाफांद्यांमधून मिरवणारी श्रीमंती. जवळ गेले की वार्याच्या झुळकेने थरारणारी पाने आणि प्रेमाने जवळ ये

पाऊस पडतोय

Image
पाऊस पडतोय, पडतोच आहे केंव्हाचा आवाजात काय सापडतेय? शोध  चालूच आहे तेंव्हा पासूनचा असं म्हणतात; गाणार्याला ऐकू येते गाणे, कविला कविता आणि काहींना खळखळून हसणे  कान देवून ऐकतेय, डोळे मिटून ऐकतेय पावसाने कुजबुजत तरी म्हटले आहे कां गाणे? कधीतरी वाचलेले, कुठेतरी ऐकलेले पावसाने जे गायलेले आणि काळ्या काळ्या ढगांनी ते लिहलेले आज आजूनही पाऊस गातच नव्हता, धबाधबा कोसळतांना सुर होता विसरला कुठेतरी वाचलेले, कधीतरी ऐकलेले पाऊस गातो गाणे;   मग हळूच खोटे वाटू लागले पावसाला एकदा सांगितले, मनालाही समजावले विश्वास असा डगमगणार नाही माझा,  गाणाऱ्या पावसावरचा आणि आभाळाच्या लिहण्यावरचा मग ठरलेच, डोळे मिटले, कुशंकाना  हळूच दूर लोटले कानात प्राण का काहीसे, घट्ट गोळा केले कोसळणारा पाऊस आता कुजबुजत होता भिजलेल्या जमिनीवरून वाहत होता; काळ्या पांढर्या ढगांसोबत, माझेच गाणे गात होता… -श्रुतकिर्ती १३-०१-२०२४