पाऊस पडतोय


पाऊस पडतोय, पडतोच आहे केंव्हाचा

आवाजात काय सापडतेय?

शोध  चालूच आहे तेंव्हा पासूनचा

असं म्हणतात;

गाणार्याला ऐकू येते गाणे,

कविला कविता आणि काहींना खळखळून हसणे

 कान देवून ऐकतेय, डोळे मिटून ऐकतेय

पावसाने कुजबुजत तरी म्हटले आहे कां गाणे?

कधीतरी वाचलेले, कुठेतरी ऐकलेले

पावसाने जे गायलेले आणि काळ्या काळ्या ढगांनी ते लिहलेले


आज आजूनही पाऊस गातच नव्हता,

धबाधबा कोसळतांना सुर होता विसरला

कुठेतरी वाचलेले, कधीतरी ऐकलेले

पाऊस गातो गाणे;  

मग हळूच खोटे वाटू लागले

पावसाला एकदा सांगितले, मनालाही समजावले

विश्वास असा डगमगणार नाही माझा, 

गाणाऱ्या पावसावरचा आणि आभाळाच्या लिहण्यावरचा


मग ठरलेच,

डोळे मिटले, कुशंकाना  हळूच दूर लोटले

कानात प्राण का काहीसे, घट्ट गोळा केले

कोसळणारा पाऊस आता कुजबुजत होता

भिजलेल्या जमिनीवरून वाहत होता;

काळ्या पांढर्या ढगांसोबत,

माझेच गाणे गात होता…


-श्रुतकिर्ती

१३-०१-२०२४




Comments

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान