Posts

Showing posts from December, 2022

शेवटचा दिवस

Image
  शांत तरीही भरपूर गाज असणारा समुद्र किनारा. आजूबाजूला माझ्यासारखेच  एक दोन नमुने. लाटा येताहेत कधी फक्त जवळून तर कधी भिजवून पुन्हा गुडूप होताहेत. परत जाणारी लाट पायाखालची वाळू सरकवत असतानांच नवी लाट पाण्याचा आधार देत आहे. हे चक्र चालूच राहते. भरती, ओहोटी, खारे वारे- मतलई वारे, सगळे शिकून बरीच वर्ष झाली आहेत. तेंव्हाही ते गोंधळात टाकायचे तर आता आठवणे जरा अवघडच. पण समुद्रकाठी भर दुपारी टळटळीत उन्हात देखील जाणवणारा गारवा, फेसाळणार्या लाटा आणि ती गंभीर गाज. भूगोल इतिहास सगळ्याला दूर सारून तिथेच, त्या क्षणातच राहायला भाग पाडते. घड्याळातले काटे असूच नयेत वाटणारे हे क्षण तरीही त्यांच्या वेळेत संपतातच. पुढचा क्षण मला तो हवाय का नकोय हे विचारायला थोडीच थांबतोय. त्याला मी  तीथे आहे याची जाणिव देखील नाही. मला मात्र या सगळ्यांच्याच  असण्या नसण्याने फरक पडतो, खुप पडतो.  भान हरपून समुद्राकडे बघत राहण्यानेही आणि भानावर येत पुढचे plan अखण्यानेही. प्रत्येक क्षणाचे असणे मला आवडतेय मग त्याचे संपणे साजरे करावे तरी का वाटावे?  काहीतरी संपले तरच नवे सुरू होईल हे माहीत आहे म्हणून? चालू असणारी घटना, परिस्थित

पोहे

Image
वर्षभर वाट पाहिलेल्या सुट्ट्या लागल्या आणि काय काय करू आणि काय नको असे झालेय. सुट्टीत बाकी काहीही करा किंवा न करा , हे खायचेय - ते करून बघायचेय असले प्लॅन असतातच असतात. त्यासाठी किराणा भाजीपाला आणलेला असतो , रेसिपी सेव्ह केलेली असते. सुगरणीचे सल्ले ऐकलेले असतात. थोडक्यात सगळी तयारी झालेली असते वाट फक्त सुट्टी लागण्याची. पण.... सकाळ होते , तीही निवांत आणि आता कुठे प्रयोग वाटतानाच मनात येते चला आता पोहे करूया आणि मग इतर सगळ्या विचारांना सुट्टी मिळते. जगाच्या पाठीवर कुठेही जा , हवामान कोणतेही असू द्या , पोहे आणि ब्रेकफास्ट या समीकरणाला तोड नाही. सुट्टी आहे , पोटभर झोप झालीय , गुगल-रेडिओ कोणीतरी काहीतरी बरे वाजवतेय , आणि जिरे-मोहरी-कढीलिंब-मिरचीच्या फोडणीचा वास सगळीकडे पसरलाय , याहून सुख सुख ते काय असते ? पटकन होणार सोपा म्हणून करावा असा पदार्थ असला तरी सगळ्यांच्याच हाताचे पोहे खाण्यासारखे असतात असे नाही. पोहे भिजवणे ते शेंगदाणे खरपूस परतणे , कांदा कोथिंबीर छान चिरणे पासून फोडणी नीट करणे. प्रत्येक स्टेप सोपी पण तितकीच कौशल्याची. बटाटा घालणार्याचे एकसारखे खरपूस काप , कोवळे मटार , फ्लॉ

सोनचाफा

Image
काल सोनचाफ्याची भरपूर फुले वाहिलेल्या एका देवघराचा फोटो पहिला. ज्यांच्या घरचा होता त्यांच्याच अंगणातली फुले होती. फोटो पाहताच सुवास मनात दरवळला आणि भर दुपार प्रसन्न झाली. असेच थोड्यादिवसांपूर्वी अंगणात उगवलेली सूर्यफुले , दिवसाचा कोणताही क्षण हसरा करून टाकायची. या वर्षी उन्हाळा आलाय खरा पण थंडी , पाऊस गेलाच नाहीय. तरीही मधूनच तावणारे ऊन उन्हाळा आलाय हे अंगणातल्या मोगऱ्याला सगळ्यात आधी सांगते आणि तो हि बातमी खिडकी उघडताच वाऱ्याच्या झुळुकीबरोबर सगळ्यांना देतोय. कालच्या जोरदार पावसातही सिग्नलला , सगळ्या ग्रे वातावरणात गुलमोहोराचा शेंडा आणि सिग्नलचा लाल दिवा तेवढाच उठून दिसत होता. सदाफुली , कण्हेर , अबोली वर्षभर आपापल्या जागी राहून रंग उधळत असतात म्हणून त्यांच्याकडे जरा दुर्लक्ष होते हे खरे , पण पानगळीत जेव्हा एकाही झाडाला पानफूल नसते तेंव्हा याच सदाफुलीच्या सदा फुलण्याचे विशेष जाणवते. नखाएवढी , पेराएवढी इवलुशी इवलुशी हि फुले , पण रंग सुवासाचे भांडार असतात आणि एका दिवसाच्या आयुष्यात दोन्ही हातानी न्हवे तर असंख्य पाकळ्यांनी ते उधळून देतात. छान उमललेले फूल , कधी त्याचे चित्र तर कधी फोट