Posts

Showing posts from January, 2022

कोण कुठले...

Image
  काल अनिल अवचट गेले आणि माझ्यासारख्या असंख्याना , ज्यांनी त्यांना नुसतेच चित्रात पहिले होते , पुस्तकात वाचले होते , खरंच मनापासून वाईट वाटले. कितीतरी जण असतात असे. कुठेतरी वाचून , ऐकून , बघून आपलेसे वाटायला लागलेले. जवळच्यां हु न ही जवळचे झालेले. ते कधी ओळखणारही नसतात. पण ती अपेक्षाही नसतेच ना. पहिल्यांदा कधीतरी त्यांचे लिहलेले , बोललेले वाचतो ऐकतो आणि भारावल्यासारखे सगळेच वाचायला ऐकायला लागतो. काही जणांच्या बाबतीत हे भारावलेपण क्षणिक असते तर काहींचे जन्मभर पुरते. कां एवढे भारून जातो ? अगदी फॅन क्लबचे मेंबर होतो ? बऱ्याचदा आवडणारे , करावेसे वाटणारे पण न जमणारे , न झेपणारे ते करत असतात. त्या वाटेवरचा एखादा तरी पाडाव चालायची इच्छा असते मग जमो किंवा न जमो. तर काही वेळा या सगळ्याच्या पलीकडे मनाला काहीतरी क्लिक झालेले असते जे मेंदूला उलगडून दाखवताही येत नाही. हे सगळे लोक काय खातात पितात ? कुठे राहतात ? रोज काय करतात ? घरच्यांशी कसे वागतात ? या सगळ्याशी काही देणे घेणे नसते. किंबहुना ते असूच नये. ते असेल तरच अनैसर्गिक. आपल्याला आवडतो तो एखादा गुण , एखादी कला. त्या क्षेत्रातले नाणे खणखणीत

चाफा फुलला

Image
  गेली चार-पाच वर्षे माझ्याकडे एक चाफ्याचे झाड आहे . मला भेट मिळालेले . त्यानंतरही झाडे लावली , त्याआधीही . पण हा चाफा काही फुलेना . आधी कुंडीत , मग मातीत . सगळे झाले . खत पाणी घाल , घालू नको , सल्ले मिळाले - ऐकले . दर उन्हाळ्यात फुलेल फुलेल करत त्याने ऐनवेळी घोटाळा केलाच . बागेतला एक छानसा कोपरा त्याने कधीचा आडवलाय , असे आता उगाचच मला वाटायला लागले . मनापासून आवडणारे ते झाड हळूहळू दुर्लक्षिले जायला लागले . त्यातच दुसऱ्या जेमतेम सहा महिन्याच्या रोपाला फुल आल्यावर मन जरा खट्टू झाले .   माझी एक मैत्रीण आहे फुलपान वेडी . तिच्या हातात जादू आहे . ग्रीन थंब नाहीतर अख्खा ग्रीन हॅन्डच आहे तिचा . बोलता बोलता माझा संपलेला पेशन्स तिला जाणवला . थांब थांब सांगूनही मी ते झाड काढणार असे वाटल्यावर तिने मी येईस्तोवर थांब , असा अल्टिमेटम दिला . आठ दहा दिवसांनी ती आली , तोवर मी त्या झाडाकडे साफ दुर्लक्ष केले होते . ती आली , अंगणात गेली आणि अगं येणार फुल त्याला , काढू नको , करतच परत आली . खरंच आठवड्यात कळी दिसली आणि फूल उमलले . काय जादू केली तिने काय माहित . नक्की   चाफ्या

पाळंमुळं

Image
  रवींद्रनाथ टागोरांचे साहित्य  गीतांजली आणि रवींद्रसंगीत डोळ्यापुढे येते आणि हे इतके अवघड कधी आणि कसे वाचायचे आणि समजायचे म्हणून बाजूला टाकले जाते. काही दिवसांपूर्वी एक कविता सापडली. काहीतरी वेगळेच शोधताना , ' आमोदेर छोटो नदी ' 'our little river' तिसरी चौथीला शिकविली जाणारी ही कविता उगीचच आवडली आणि विषय तिथेच संपला. त्यातली छोटीशी कोपोई नदी मात्र मनात मनात खोलवर दडून बसली. ब्रिस्बेन शहर ज्या नदी काठी वसलंय ती ब्रिस्बेन नदी ओलांडायची वेळ जवळजवळ रोजच येते. पण तिचा विचार करायची वेळ कधी आलीच न्हवती. कोपोई बद्दल जेव्हा रवींद्रनाथ सांगतात , एका खऱ्या जिवंत नदीचे रोजचे जगणे दाखवतात तेव्हा डोळ्यापुढे एक चित्र रेखाटले जात असते. सतत बडबड करीत अवखळपणे धावणारी कोपोई त्यांना संथाल कन्येची आठवण करून देते. आटलेली असताना त्यात खेळणारी मुले तर पाणी असताना त्यात वाढणारे धान. सगळे शब्द डोळ्यापुढे काहीतरी आणतात. रवींद्रनाथांच्या कवितांत , गोष्टीत नद्यांचं नद्या गंगा , पद्मा , यमुना , इच्छामती , साबरमती आणि त्यांची लाडकी कोपोई. वर्णन वाचताना जे मनात येत होते त्यात या नद्या कुठेच न्हवत्

विसर

Image
  दिवस संपत आला. उन्हाळ्यामुळे अंधार उशिराच झाला. विजेच्या दिव्याबरोबरच सवयीने देवापाशी दिवा लावला. अगदी सवयीने हात जोडले गेले. आणि रोजचीच रामरक्षा म्हणताना मेंदूची सुई अडकली. काही केल्या पुढचा शब्द आठवेना. हजारो शब्द , चित्र डोळ्यापुढे नाचत होती पण योग्य तो काही पुढे येईना. त्याचा पार विसर पडला होता. यथावकाश तो सापडला पण काही क्षणासाठी अगदी रोज वापरातला तो शब्द पार विसरला गेला होता. कारण काही नाही म्हणजे असेलही पण कळण्यापलीकडे आत्तातरी. सध्या सोप्या भाषेत मला आठवत न्हवते. विचार केला तर नुकसान काय झाले , काहीच नाही पण एखादी गोष्ट आठवत नाहीय यानेच ती आठवेपर्यंत मन कुरतडले होते. मनाला गोष्टी विसरायची सवय असते , न आवडणारे ते बरोबर विसरते सतरा आणि एकोणिसच्या पाढ्यासारखे. पण लक्षात ठेवायचे कामही ते तेवढ्याच तत्परतेने करते. शंभर वेळा हे विसर ते विसर सांगूनही खडा न खडा लक्षात ठेवते. गडबड होते मेंदू विसरायला लागला की. मध्ये कुठेतरी वाचले होते , नदीने कितीही वाटा बदलल्या तरी तिच्या जुन्या वाटा तिला पाठ असतात. ' Memories of rivers run deep.' आपलेही असेच असेल का ? वरवर खपली धरलेल्या