Posts

Showing posts from January, 2021

को जागर्ति?

Image
अनेक दिवसांनी आम्ही चार पाच मैत्रिणी एकीकडे जमलो होतो. जेवण झाल्यावर गप्पा मारताना चला झोपूया उद्या मला लवकर निघायचंय, मला ट्रेन आहे,  ट्रॅफिक लागला कि मला एकाच्या जागी दोन तास लागतात. हे सगळे म्हणतानाही गप्पा काही थांबत न्हवत्या. घड्याळाचा काटा पाणी,कॉफी ,गप्पा  अशा चक्रात गोल गोल फिरत होता. पहाट झाली आणि थोडे पडूया म्हणत सगळ्या झोपल्या. सकाळी थोडीशीच झोप झालेल्या पण खूप फ्रेश चौघी आपापल्या घरी परतल्या  घरी येताना माझ्या मनात घोळत राहिल्या रात्रीच्या आठवणी आणि मनात आले का जागलो इतक्या?रात्रीच का रंगल्या या गप्पा?  रात्री मारलेल्या गप्पांची जादू मनावर टिकून राहते. रात्रीची शांतता,कामांमधून मिळालेली उसंत,कशाचीच नसलेली घाई या सगळ्याचा परिणाम म्हणून कि काय जागरणाला उत येत असावा वाटते.  मुळात गप्पा मारायला सुरवात झाली कि स्थळकाळाचे भान विसरणे हेच त्यातील यश आहे. चार जवळची माणसे आणि जिव्हाळ्याचा विषय. आणखी हवे तरी काय? निरर्थक,निरुद्देश गप्पानीच जगण्यातील मजा टिकून राहते. अशा रात्र रात्र जागूनच गप्पातून काहीतरी नवनिर्मितीही होते. Sharing is Caring हे लहानपणापासून माहित असूनही त्यासाठी ती मा
Image
     घड्याळाचा काटा उलटा फिरत नाही तसाच वजनाचा पण बऱ्याचदा. एकदा निघाला की निघालाच. सुरवात जरासे गाल गुबगुबीत होण्याने होते खरी , पण हळूहळू चांगले बाळसे धरते. मग सुरु होते मनाची आणि जीवाची कसरत. काय काय करावे तेवढे थोडे. शेकडो diets, हजारो exercise ,  सतराशे साठ lifestyle आणि गल्लीबोळात जिम. रोज काटा जरासा मागे जरासा पुढे पण तेवढाच. अगदी भिंगाखाली बघितले तरच फरक दाखविणारा.        चार जण (मुद्दाम जणी हा शब्दप्रयोग टाळलाय वजन कुठलाही भेदभाव करीत नाही.) भेटले कि हवापाणी , ट्रॅफिक नंतर एखादा बारीक झालेला/झालेली सगळ्यांना सापडते आणि मग टिप्स ची देवाणघेवाण , खात्रीलायक उपाय , guaranteed डाएट हे सगळे चवीचवीने चघळले जाते. घरी येऊन उरलेल्या वजनदार लोकांचे ठाम निश्चय होतात. जोशात सुरवात होते आणि दहातले आठ पुढच्या भेटीत अजून वजनदार झालेले सापडतात. नव्या वर्षाच्या सुरवातीला हा अनेकांचा पहिला गोल असतो. पण छान छान खाद्यपदार्थ , ते खाण्याच्या अमाप संधी , cheat days ची वाढणारी संख्या , कठोर परिश्रमांचा येणार कंटाळा हा गोल हळूच शेवटी ढकलतो आणि आपण शेवटी एकतीस डिसेंबरला गोलच राहतो.        सगळे

Mirror Mirror on the Wall

Image
     Snow White च्या सावत्र आईने वारंवार हा प्रश्न विचारला आणि नेहमीच तिच्या मनासारखे उत्तर मिळत गेले. ती सुंदर असणार हे तर नक्कीच आणि चांगली जादूगारीण देखिल , कारण एवढे खरे बोलणारा आरसा होता तिच्याकडे. एकदाच मनाविरुद्ध उत्तर मिळाले आणि तिच्यातली खलनायिका जागी झाली. आरस्याच्या जागी कोणी माणूस असता तर , कदाचित हो ला हो म्हणाला असता आणि गोष्ट वेगळी असती. पण नाही ना! आरसा खरा बोलणारा होता.      आपल्या सगळ्यांकडेच हा आरसा असतोच , या ना त्या रूपात. पण वापरतो किती वेळा ? त्यातही आपल्याला हवे ते उत्तर पाहिजे असतानाच जातो आपण त्याला प्रश्न विचारायला. ' सांग दर्पणा कशी मी दिसते ?' विचारायच्या आधी माहित असते उत्तर सुंदर असणारच आहे. Bad Hair Day च्या दिवशी कोण विचारेल असला प्रश्न ? खारट आमटी कशी झालीय हे विचारण्याचा मूर्खपणा मी तरी नाही करणार.      मग माहित असताना विचारतोच कशाला आपण ? तेही वारंवार ? Endorsement हवी असते ना आपल्याला. Filter लावून सेल्फी काढण्याच्या जगात त्या आरस्याला खरा प्रश्न नाहीतर विचारणारच आहोत कशाला आपण ? अगदी विचारलाच खरा प्रश्न आणि मिळालेच मनाविरुद्ध उत्तर तर

आठवण.

Image
" मला आठवण कर ग जातांना हे घेवून जायची" , " आठवणीने ने हं" , " मला आठवण आहे न्यायची" हे संवाद दिवसभरातून पन्नासवेळा घडून ही मैत्रीण घरी गेल्यावर मी फ्रीज उघडला आणि कारली आवासून माझ्याकडे बघत होती. शेवटी आम्ही दोघीही विसरलोच. लक्षात काही राहीले नाही. आमच्या दोघींच्याही so called तल्लख मेमरी ने ' भरवशाचा म्हशीला टोणगा! ' हे पुन्हा prove केलेच होते. दिवसभरातल्याच नव्हे तर मागच्या असंख्य वर्षातल्या आठवणी आम्ही तेवढ्या वेळात उगाळल्या होत्या पण लक्षात ठेवण्याची एक practical गोष्ट पार विसरलो. आता हा ही क्षण आमच्या कायमचा आठवणींचा भाग झाला होता. ' मागच्या वेळेस विसरलो होतो ' हे आम्ही नक्की लक्षात ठेवणार होतो. क्षणांच्या आठवणी अशाच होतात कां ? ' मला आठवतय ' असे म्हणतांना आपल्या बंद डोळ्यांपुढे एक इस्टमन कलर मुव्ही चालत असतो. भले बुरे साठवून ठेवलेले पडद्यावर आणत राहतो. रम्य आठवणी म्हणता म्हणता काही आठवणी पिच्छा सोडत नाहीत.

Nurturing Soul

Image
डिसेंबर म्हटला की सुट्ट्या आणि सुट्ट्यांमध्ये टीव्ही चे binge watching हे एकत्रितच येते. फूड चॅनल बघणे हा माझा आवडता छंद. एक दिवस एक इटालियन शेफ वाफल्स ची रेसिपि दाखवत होती. ते करण्याकरिता तिच्याकडे एक पारंपरिक वाफल आयर्न होती. लांब लोखंडी दांडा असलेली. तिने त्यात कोरलेले नाव दाखवले तिच्या ग्रेट आंटचे. तिला ती तिच्या बारशाला मिळाली होती आणि त्यात हि वाफल्स करून मुलीला खाऊ घालणार होती , म्हणजे चार पिढ्या त्याच्याशी जोडल्या गेलेल्या होत्या. ते करताना तिचे म्हणणे होते कि हे dessert पोटापेक्षा मनाला जास्त आनंद देते."इट विल नर्चर माय  सोल" मला जाणवले खरंच असे खूप काही आहे जे आपल्या मनाला कळतनकळत समृद्ध कर ते , nurture कर ते . मन समृद्ध होत गेले तरच जगणे monotonous नाही होणार , नाहीतर २०२० काय किंवा २०२१ काय! काल हे वर्ष संपले आणि बरेच देवून आणि घेऊनही गेले. एकनाथांनी म्हटलेय मनाचेही एक मन असते त्याची काळजी घ्यायची असते. या जाणिवेतूनच लक्षात आले आपल्याभोवती घडणाऱ्या असंख्य घटना , गोष्टी , माणसे वस्तू आपल्यासाठी हे nurturing of soul बिनबोभाट करताहेत. माझी एक मैत्रीण आहे ,