Posts

Showing posts from May, 2022

अंबाडीची भाजी.

Image
  रोज घरी मीही भाजी पोळीच खाते , तीही… ती नेहमी तशीच भाजी करते , आम्ही दोघी ही… तिच्याच सारखी. तीच्या हाताची चव , तशीच असते कायम आमची , कधी कधी . एरवी मात्र , आठवणी मनात जागवतात तीच चव न चुकता नेहमी. आताशा , बर्याच वर्षात तीने केलीच नाहीय भाजी पण आम्हा दोघीत भर पडलीय , एका तीसरीची ;   तीच्या चवीची आठवण काढत भाजी खाणारीची . तीनेच शिकवलीय , लक्षात ठेवून आवडी जपण्याची पध्दत. न सांगताच   शिकवलीय , त्याच बरोबर भाजीचीही आम्हा सगळ्यांच्या आवडीचीही पध्दत.   तीच्यामुळेच , वर्षभर दरवेळी , त्या सगळ्या भाज्यांकडे बघत आठवणी काढत , आनंदाने जेवताना आठवणींचा एक आवंढा हळूच गिळताना , पुढच्या फोन कॅालवर तीच ती भाजी निवांतपणे चर्चा करायला विषयतरी असतात , असे विषय नाही निघाले तर काही तरी गडबडलेय हे न सांगताच एकमेकानां सांगतात. कोणत्याही बाजारात जावो , भाजी दिसली की ती दिसतेच , निवडायचा , करायचा कितीही आळस आला तरी पिशवीत बसतेच. व्हिडीओ कॅाल करून पुन्हा कशी करू म्हणत म्हणत सगळी उजळणी करणेही आलेच. सगळे म्हणतात आठवणी काढू नयेत , फार मन कशात गुंतवूच नये पण काढायला आठ

बदल

Image
निघाल्या पासून, मन मेंदू ज्या कोणाकडे आठवणींचे department दिलय ते फक्त खुणाच शोधतेय. हे इथे नव्हते पुर्वी आणि इथे होतो ते गेले कुठे? सारखा मेंदू कुरतडून कुरतडून जुन्या images आत्ता दिसणार्या frame शी किती जुळतात हाच खेळ सतत चालूय. जिथे जे हवे होते, ते मिळाले, दिसले नाही की उगीचच अस्वस्थपणा… ते तीथे असण्याचा, नसण्याचा माझ्या रोजच्या आयुष्यावर काडीमात्र परिणाम होत नसतानांही. आता घर जवळ येतेय, सगळं डोळ्यांसमोर रोजच दिसणारे, विसरायचा प्रश्नच नसलेले. समोर बघताना मात्र अडीच वर्ष पुढे गेलेले.. जुळत नसलेले. राग, वैताग, हे का असे? असला वेडा विचार, पोचण्यातला आनंदच घालवतोय. कळतय बदल होणारच, बरेच काय बदललेय तेही माहीत आहे . तरीही शोध काही संपेना. वस्तू, ठिकाणे, रस्ते, दुकाने इथपर्यंत ठिक आहे, पण आता समोर येणारी माणसे, त्यांच्यातले बदल नकोसे झालेत. त्यांची वाढलेली वयं, सुरकुतलेले हात, मंदावलेली गती सगळं नकोसे झालंय. माहीत होते सगळे, मनाला बजावलेलेही होते सगळे पण तरीही, अपेक्षा सगळे पुर्वीसारखेच असण्याची. मी रोज बदलत होते पण यातल्या कुणालाही बदलण्याची परवानगी नव्हती, खिडकी समोरच्या झाडाने पानेही गा