Posts

Showing posts from October, 2020

Are you a local?

Image
  हा प्रश्न मुळ गाव सोडल्यानंतर फार वेळा समोर येतो ,  मन नक्की त्याजागेत कधी रमते ?  हाच तो क्षण असे   pin point   करता येते कां ?   Electricity   च्या बीलावर नांव आले की ?  मतदार यादीत आलात की ?  घरदार झाले की ?   नक्की कधी ? Office   मधले सहकारी पहिल्या नावाने ओळखू लागले की ?  नेहमीचा कॉफीवाला न मागता   order   तयार करू लागला की ?  राहता तिथले प्रश्न आपलेसे वाटले की ? देश बदलला असेल तर भाषा ,   अन्न आपलेसे केले की ? हे सगळे घडूनही मन आपल्या मुळ गावाची देशाची ओढ धरून असतेच. मग नक्की काय घडते आणि हा प्रवास सुरू होतो ? माझ्या रोजच्या रस्त्यावर एक   bottle brush tree   आहे ,  एक गुलमोहोरही आहे. पुर्वी हा गुलमोहोर पाहीला की मला पुण्याचा मे महीना आठवायचा ,  मन उन्हाळ्यात फेरफटका मारून यायचे आणि आठवणीत रमायचे.... या वर्षी वसंतात   bottle brush   अचानक फुललेला दिसला   आणि मी गुलमोहराची आणि पर्यायाने उन्हाळ्याची वाट पाहू लागले. मनाने दक्षिण उत्तर गोलार्धाचे ,  उन्हाळी महीन्यांचे बंध तोडले होते ,  मे महीना आणि उन्हाळा हे समीकरण मोडून फुलाचा बहर आणि उन्हाळा जोडले गेले... मग मी या इथल्या निसर्गा
Image
  ही कहाणी आहे एका थोरलीची आणि दोन धाकट्यांची. (वयाने मोठ्या छोट्या म्हणून थोरल्या धाकट्या बरंका ! ) थोरली मुलांच्या , स्वतःच्या वेळा जुळवता याव्यात म्हणून नोकरी बदलते आणि तिथे तिला भेटते धाकटी .  ती  तिच्यासारखीच , शिक्षण वेगळे घेऊनही वेगळीच नोकरी करणारी. शांत , जरा अबोलच , नाजुकशी! हि मात्र अगदी उलट , सदैव गप्पाटप्पा , धांगडधिंगा. पण कसे कोण जाणे सूत जुळले. थोरलीला धाकटीच्या शांत स्वभावामागचा उत्साहाचा झरा सापडला तर धाकटीला बडबडीपलीकडची शांतता. थोरली धाकटीला सांभाळून घेते या पब्लिक फेस मागे अगदीच उलट चित्र प्रत्यक्षात असे. धाकटीच्या गंभीर पण ठाम स्वभावाचा निर्णयात मोठा role असे. वर्षामागून वर्षे गेली आता एकमेकांशिवाय आयुष्य शक्यच न्हवते आणि थोरलीने गाव बदलले. धाकटीचे कसे होणार हि चिंता आजूबाजूच्या साळकाया माळकायांना पडली. पण मुळातली खंबीर धाकटी अधिकच खंबीर झाली आणि थोरलीशिवायच्या रूटीनला लागली. मोठी मात्र दुसऱ्या मातीत रुजली नाही. धाकटीशिवाय रोजचे आयुष्य एन्जॉय करू शकली नाही. आणि एक दिवस एक गम्मत झाली तिला एक नवी धाकटी मिळाली खूप वेगळी अगदी उलट स्वभावाची , बावचाळलेल्या confu
Image
तिसरीतली ती नवा कोरा गुलाबी फ्रॉक घालून गाण्याच्या क्लास ला चालली होती. चार घरे सोडून क्लास , तरी नव्या फ्रॉकमुळे घर पट्ट्कन आले. बेल वाजताच काकूंनी दार उघडले , ' नवा फ्रॉक वाटते! ' स्वारी खूषच झाली , त्या नादात पेटीचा बॉक्स पटकन उघडला गेला , दत्ताच्या फोटोला नमस्कार करून सरांची वाट पाहणे सुरु झाले. नेहमी गप्पा मारणारे सर आज आल्याआल्या शिकवायलाच लागले.आत्ता विचारतील मग विचारतील पण नाहीच. क्लासही संपला. निघताना सरांचे " ताईचा फ्रॉक वाटतं" हे शब्द ऐकले आणि हे सर आहेत हे विसरून नाकावरच्या रागाने " मी ताईचे कपडे नाही घालत हा माझाय." असे जोरदार उत्तर आले. स्वतःच्या वस्तूंवर जीवापाड प्रेम असण्याचे वय सर काय सांगताहेत हे ऐकूच शकले नाही. सर जितके प्रेमळ तितकेच रागीट , बहिणीचे कपडे घालण्यात काय कमीपणा यावरून मस्त कानउघडणी झाली आणि हिरमुसला गडी घरी परतला.   वर्षामागून वर्षे गेली. फ्रॉक गेला , क्लास गेला , सर गेले , छोट्या मुलीचे तर ते गावही सुटले. आता annual vacation ला भारतात घरी येताना मागच्यावर्षी ताईबरोबरच खरेदी केलेले वर्षभर पुरवून वापरलेले , फॅशन बदल
Image
ऋग्वेद संहितेचे पुस्तक चाळत असताना त्यातील ऋचांपेक्षा फोटोंमध्येच मन जास्त रेंगाळत होते , अर्थ , शब्द फक्त नजरेखालून जात होते . त्यातच एके ठिकाणी ; When you find the self, the goal of all desiring - you leave both birth and death behind. हे वाचनात आले आणि मनांतल्या ख्वाबिदाचा प्रवास सुरु झाला. काय असते हे finding yourself? कधी कसे आणि केव्हा , नक्की जाणीव तरी होते का कळल्याची.  स्वत्व , आत्मभान कसे कळते ? सोहं कोहं चे प्रश्न पडतात तरी कधी ? कोण देते ही उत्तरे ? ही उत्तरे शोधणे हाच प्रवास जन्म ते मृत्यू अखंड चालू असतो ना ? मग हा प्रवास संपतो , उत्तर सापडते असे घडते कां ? म्हणजे नक्की होते तरी काय ? प्रश्नांची उत्तरे मिळणे हे ही नवे प्रश्नच. मनात आले कुठेतरी शोधून हे उत्तर नक्कीच सापडणार नाही. याला कोणतेही guide, २१ , Dummies नाही , कारणमिमांसा करून थोडक्यात शब्दांचा किस पाडून हाती काही लागणारही नाही. कुणाकडून शिकण्यासारखे copy paste करण्यासारखे तर नाहीच नाही. या   मनाला हा आरसा दाखवण्याचे काम हे स्वत्वच करेल . Self will reveal itself! प्रवासाला तर या निघालेच पाहिजे. मनाची strength, sta