ऋग्वेद संहितेचे पुस्तक चाळत असताना त्यातील ऋचांपेक्षा फोटोंमध्येच मन जास्त रेंगाळत होते, अर्थ, शब्द फक्त नजरेखालून जात होते. त्यातच एके ठिकाणी;

When you find the self, the goal of all desiring - you leave both birth and death behind.

हे वाचनात आले आणि मनांतल्या ख्वाबिदाचा प्रवास सुरु झाला.

काय असते हे finding yourself? कधी कसे आणि केव्हा, नक्की जाणीव तरी होते का कळल्याची. स्वत्व, आत्मभान कसे कळते? सोहं कोहं चे प्रश्न पडतात तरी कधी? कोण देते ही उत्तरे? ही उत्तरे शोधणे हाच प्रवास जन्म ते मृत्यू अखंड चालू असतो ना?

मग हा प्रवास संपतो, उत्तर सापडते असे घडते कां? म्हणजे नक्की होते तरी काय? प्रश्नांची उत्तरे मिळणे हे ही नवे प्रश्नच.

मनात आले कुठेतरी शोधून हे उत्तर नक्कीच सापडणार नाही. याला कोणतेही guide, २१, Dummies नाही, कारणमिमांसा करून थोडक्यात शब्दांचा किस पाडून हाती काही लागणारही नाही. कुणाकडून शिकण्यासारखे copy paste करण्यासारखे तर नाहीच नाही.

या मनाला हा आरसा दाखवण्याचे काम हे स्वत्वच करेल.

Self will reveal itself!

प्रवासाला तर या निघालेच पाहिजे. मनाची strength, stability आणि inner freedom जसे जसे वाढत जाईल तसे तसे आत्मभान जागृत होईल पण त्यासाठी स्वतःचा भोवताल, भूतकाळ, आणि वर्तमानकाळ त्रयस्थाच्या भूमिकेतून मांडता आला पाहिजे.

स्वत्वाची जाणीव झाली कि सुज्ञाला समाधानाची प्राप्ती होईल आणि हे चक्र पूर्ण होईल. इच्छा आकांक्षा पासून दूर द्वैतभावाच्या अभावाने Oneness - at one with everything ही भावना येईल आणि तिथेच हा ख्वाबिदाचा प्रवास थांबेल!

- श्रुतकिर्ती     
११/१०/२०२०

Comments

  1. Hi Shruti,
    This is amazing - keep writing !
    Maghawan

    ReplyDelete
  2. Hi shruti, very nice beginning. My best wishes.

    ReplyDelete
  3. श्रुती ताई, खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा ख्वाबिदा साठी! सत्व आणि सुज्ञ हा प्रवास सुरू झाला आता!

    ReplyDelete
  4. Very excited and eager to read more....

    ReplyDelete
  5. Opening blog post is awesome Shruti.
    विचार करायला लावणारी कि आपण कोण आणि कशासाठी आहोत.ब्लॉग ची शेवटची line एकदम सुंदर पण मनाला चुटपुट लावून जाणारी. ह्या ख्वाबिदा ला तुझा प्रवास असाच चालू राहूदे असं म्हणावं तर तुझ्या प्रश्नाचे अखेरचं उत्तर नाही मिळणार आणि सफल होवो असं म्हटलं तर आम्ही आनंदाला मुकणार. खुप खुप शुभेच्छा तुला नि ख्वाबिदा ला.

    ReplyDelete
    Replies
    1. प्रवासातच आनंद मिळेल आपल्याला नकोच destination चा विचार करायला.😊

      Delete
  6. My dear श्रुती, this is incredible. So pleased to see your blog. All the best of everything for ख्वबिदा. I am very much sure about 3 things. तुला स्वत्वाची जाणीव आहे, तू सूज्ञ आहेस आणि तुझा प्रवास आत्मतत्त्वाच्या जाणीवेसहीत सुरू झालाय. Feeling very blessed to know in this lifetime ❤️💜😇🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान