Posts

Showing posts from November, 2020
Image
  पहिलीच्या वर्गातल्या wobbly tooth चर्चेने हळूहळू tooth fairy आणि Santa कडे मोर्चा वळवला. प्रत्येक गटात असतोच अश्या , एका धाडसी , confident   मुलाने “I know fairies don't exist and there is no Santa” असे म्हणताच सगळा गलका एकदम शांत झाला. एकीच्या डोळ्यात पाणी पण आले . एक छोट्याश्या मुलीने मात्र ठसक्यात , “I know they don't exist but I believe in them and their magic. ”   असे म्हटले आणि माझ्याजवळ येऊन  “ Do you believe in them, Mrs K? ”   असे म्हटले मात्र आणि विचारांचा एक मोठा गुंता मनात तयार झाला. तिने हे किती सोपे केले होते स्वतःसाठी , माहित आहे ते खरे नाहीत पण मी विश्वास ठेवते आहे त्यावर. आपणही हेच करतो कि , अनेक माहित असलेल्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवतोच कि फक्त तिचा पुढचा भाग , च्या जादूवर विश्वास असणे मोकळेपणाने मान्य करण्याचा , तो वयानुसार हरवत जातो. खरेतर अवतीभोवती किती जादू घडत असतात पण प्रत्येक घटनेचे विवेचन , एक्सप्लेनेशन , reasoning देऊन देऊन आपण त्यातली जादू घालवूनच टाकतो. सकाळी उठून झाडावरची नवी पाने फुले पाहणे यात मॅजिक आहेच कि. दही घुसळले कि ताक

वाट...

Image
  Turn right after  500   metres   असे GPS काकू शांतपणे सांगत होती आणि मीही वळायची तयारी करू लागले. ती सांगेल तिकडे जाण्यातला यांत्रिकपणा उजवीकडे वळल्यावर लक्खपणे जाणवला , डावीकडे वळल्यावर काय लागते हे चौकात बघायचेच राहून गेले होते. नकाशाने ठिकाण शोधणे सोपे केले पण निदान तो वाचताना दिशा चुकण्याची तरी शक्यता होती. नकाशा उलटा धरला म्हणून तरी वेगळे ठिकाण सापडत होते. इथे सगळे सरधोपट होते. चुकू म्हटले तरी हि  reroute करून योग्य ठिकाणीच नेणार होती. मनात आले रोजच्या जगण्याचा GPS नको असायला. कोणता मार्ग निवडू याचा विचार करायला , चुकायला , सल्ला मागायला वाव तर हवाच. या पाऊलवाटा , रानवाटा , रस्ते , हमरस्ते.... प्रत्येक प्रवाशाला त्यांचे आकर्षण असतेच. सगळ्यांनी चोखाळलेली चालून चालून गुळगुळीत झालेली वाट सोपी असली तरी मनातल्या भटक्याला अनवट वाटेवर जावे वाटतेच , पुढे जाऊन हा रस्ता ध्येयाला पोचणार का no through असणार हे जाणून घेण्याचे कुतूहल शिल्लक राहावे. समोर दोन वाट आल्या कि मनात संभ्रम निर्माण होतो. निवड कधीच सोपी वाटत नाही. 'The Road Not Taken' या कवितेत Robert Frost हा कव

रांगोळी

Image
दिवाळीच्या तयारीसाठी कपाट उघडले आणि कोपऱ्यात एका काचेच्या बरणीत पुण्याहून सांभाळून आणलेली पांढरी रांगोळी दिसली , मन बघताबघता कितीतरी विचारांना , आठवणींना स्पर्शून आले. रांगोळी या शब्दाबरोबर मनाला दिसतात ते आईने देवापुढे काढलेले शंख , चक्र , गदा , पद्म! कितीतरी वर्षे लोटली तरी त्याचे चित्र लक्खपणे डोळ्यापुढे उभे राहते. कुठल्याही बिल्डिंगचा जिना उतरताना एखाद्या दारापुढे रांगोळी दिसली की नजर एक क्षण ठरतच असे. नीटनेटकी ठिपक्यांची रांगोळी हे घर टापटिपीचे असेल असा भास उगाचच निर्माण करी. लहानपणी दिवाळीत पुढच्या मागच्या अंगणात रांगोळी काढणे हा एक मोठा कार्यक्रम. कागदाला उदबत्तीने भोके पाडून सरळ रेषेत ठिपके काढायला मोठे skill लागे. ताईच्या सुंदर रांगोळी शेजारी माझे फ्रीहँड तेवढ्याच दिमाखात सगळ्यांना दाखविणारे आईबाबा आजही आठवतात न्हवे जाणवतात. आपण वेडीवाकडी रांगोळी काढलीय हे कधी गावीही नसे , काढल्याचाच आनंद फार मोठा असे. पुराणापर्यंत इतिहास असणारी रांगोळी तिचा संस्कृत अर्थ ; कलेचा रंगाद्वारे अविष्कार ( a creative expression of art through colours) आपल्या विचारणा मोठा आयाम देऊन जाते. दा

एक होती परी...

Image
सुनिताबाई देशपांड्यानी ' आहे मनोहर तरी ' मध्ये पाखरांना सांगण्याच्या गोष्टीत , एक होती परी कि एक होती म्हातारी... एक होती परी आणि ती झाली म्हातारी असे म्हटलेले वाचले आणि आठवणीतल्या सगळ्या म्हाताऱ्या पऱ्या डोळ्यापुढे फेर धरून नाचू लागल्या. साधी पुरी करताना ती टम्म फुगली किंवा अगदीच फुगली नाही कि मला दुर्गाबाई भागवतांचा , करणारा फुगला म्हणजे चिडला नसला कि पोळी , पुरी फुगते हा संदर्भ हमखास आठवतो आणि उगीच हसू येऊन मनावर जादूची कांडी फिरते. टोपपदाराची साडी पाहिली कि शान्ताबाई शेळक्यांना अक्का म्हणणाऱ्या सरोजिनी बाबर आठवतात , तर अठराव्या शतकातली युरोपिअन चित्रे पहिली कि Jane Austin आठवते . या आणि अश्या कितीतरी छोटया छोटयाजादू करणाऱ्या पऱ्या अवती भोवती सदैव वावरतात आणि असंख्य जादुई क्षण देऊन जातात. रोजच्या कामात अगदी साधा सुरकुतलेला कपडा नीट झटकून वाळत घालताना किंवा अगदी साधी आमटीला फोडणी घालताना ते काम आईसारखे जसेच्या तसे जमले कि लहानपणापासून असंख्य जादू करणारी आपल्या आयुष्यातली हि आद्य परी आपल्या वाढत्या वयाबरोबर म्हातारी झाली याची प्रकर्षाने जाणीव होते. शाळेतल्या बाई , आव