पहिलीच्या वर्गातल्या wobbly tooth चर्चेने हळूहळू tooth fairy आणि Santa कडे मोर्चा वळवला. प्रत्येक गटात असतोच अश्या, एका धाडसी, confident  मुलाने “I know fairies don't exist and there is no Santa” असे म्हणताच सगळा गलका एकदम शांत झाला. एकीच्या डोळ्यात पाणी पण आले. एक छोट्याश्या मुलीने मात्र ठसक्यात, “I know they don't exist but I believe in them and their magic. असे म्हटले आणि माझ्याजवळ येऊन Do you believe in them, Mrs K? असे म्हटले मात्र आणि विचारांचा एक मोठा गुंता मनात तयार झाला.

तिने हे किती सोपे केले होते स्वतःसाठी, माहित आहे ते खरे नाहीत पण मी विश्वास ठेवते आहे त्यावर. आपणही हेच करतो कि, अनेक माहित असलेल्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवतोच कि फक्त तिचा पुढचा भाग, च्या जादूवर विश्वास असणे मोकळेपणाने मान्य करण्याचा, तो वयानुसार हरवत जातो. खरेतर अवतीभोवती किती जादू घडत असतात पण प्रत्येक घटनेचे विवेचन, एक्सप्लेनेशन, reasoning देऊन देऊन आपण त्यातली जादू घालवूनच टाकतो. सकाळी उठून झाडावरची नवी पाने फुले पाहणे यात मॅजिक आहेच कि. दही घुसळले कि ताकावर येणारा लोण्याचा गोळा जादूनेच आल्यासारखा एका क्षणात अवतरतो. वय वाढते तशी जादूची व्याख्या बदलते. सकाळी गजराच्या आधी जाग येणे, रात्री बांधलेल्या मटकीला सकाळी तरारून मोड येणे (हि जादू माझ्या ब्रिसबेनच्या मैत्रिणींना फार पटेल. इथल्या मटकीला मोड येणे हे जगातले आठवे आश्चर्य आहे.) सकाळच्या घाईतल्या एकाही पदार्थाची चव न बघता मीठ,तिखट बरोबर असणे आणि ते खाल्लेल्या एखाद्याने छान झाल्याची पावती देणे, या सगळ्या जादूच तर असतात.

सरळ सोप्पे सांगायचे तर अनपेक्षित गोष्ट घडणे हि  जादूच वाटते मला. ध्यानीमनी नसणारी घटना वेगळाच आनंद देते मनाला. माझ्यालेखी फक्त यातील जादुई क्षणाचा आनंद ना घेता,जादूवर विश्वास न ठेवता, त्या परिस्थितीचे परीक्षण करून सगळी मज्जाच घालवली, कि मग उरतो नुसता भकासपणा. हळुवारपणा, तरलता नसलेल्या रुक्ष मनाचा कोरडेपणा.

जादुई जगच नाही तर मग ते घडवणारा तो जादूगारही नाही. असे म्हणणारे आपण, रोज रात्री मन, बुद्धी सगळे शांत करून झोपतो आणि सकाळी कुणीतरी आधल्या दिवशी पर्यंतचे सगळे पुन्हा memory feed केल्यासारखे आठवत जागे होतो. समोरच्याकडे पाहून राग, लोभ निर्माण होतात आणि ते व्यक्त करणारे शब्दही सुचतात. तरीही हे सगळे 'मी' केले, 'माझ्या' मनात आले म्हणतो आणि त्या किमयाच नाकारतो. आपल्याला मन आहे आणि त्यात भावना आहेत हीच सगळ्यात मोठी जादू आहे आणि हो त्या जादूवर माझा अढळ विश्वास आहे!


- श्रुतकिर्ती 

२७/११/२०२०



"Those who don’t believe in magic will never find it."

-     Roald Dahl

Comments

  1. Nice co-relevance of magical fairy world and magical world of us adults after we accept the touch of divinity. Yes, even I believe in THAT magic. It is an enjoyable journey indeed full of inner joy and inner peace. Loved it 😇💜❤️💜😍

    ReplyDelete
    Replies
    1. Acceptance of the touch of divinity creates rather invokes that magic is my belief.

      Delete
  2. Nicely put across ..
    magical mind or mind magic ...is question ?

    ReplyDelete
  3. Kharay. Manal tar sagal aahe aani nahi mhantal tar kahich nahi. Its really sac that we miss out all these small magical moments due to our busy schedule.

    ReplyDelete
  4. Kharay. Manal tar sagal aahe aani nahi mhantal tar kahich nahi. Its really sac that we miss out all these small magical moments due to our busy schedule.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान