Posts

Showing posts from October, 2021

वाढदिवस

Image
  या आठवड्यात ख्वाबिदा सुरू होवून एक वर्ष होतय. थोडक्यात ख्वाबिदाचा वाढदिवस आहे. जन्मदिवस नाही , कारण हे मनात येणारे विचार तेही random, haphazard… त्यांचा जन्म कधी झाला हे रूढार्थाने कळूच शकत नाही. पण हो वाढदिवस मात्र आहेच. आधी ते फक्त मनात असत , मग गेल्या वर्षभरात कागदावर आले. Random असले तरी कागदावर उमटतांना त्यांच्यांत काहीतरी सुसंगती यायचीच. मेंदू लिंक सोडत नाही कितीही फिरले तरी. कागदावरुन ते अनेकांच्या डोळ्याखालून गेले. कधी त्या विचारांनी हसवले , कधी माझ्या डोळ्यांची कड त्यावेळी पाणावली असणार याची जाणिव करून दिली. कधी आवडले , तर कधी हे काय काहीतरीच असेही वाटले असणार. पण दोन मिनिटे हे काय ? असा विचार नक्कीच मनात आला असणार. विचारांनी विचार करायला लावावे यातच मज्जा आहे. ख्वाबिदाचा उद्देशच स्वत्वाचा शोध घेणे. प्रत्येक विचारच्या कृतीच्या मागचा प्रवास बघणे , तोही शक्यतो तटस्थपणे , चुक बरोबर , रागलोभ बाजूला ठेवून. हाच होता आणि हाच आहे. विचारांना स्वप्नं बघायची सवय लागली की ती सवय सुटतच नाही. त्या प्रवासाला शेवट नाही. मजा प्रवासातच. त्यामुळे मन , मेंदू , विचार सगळे आहेत तोवर ख्वबिदा अ

छोटी सी आशा!

Image
    उन्हाळा सुरू व्हायला लागला कि , चाफ्याची पाने गळतात. निष्पर्ण चाफा सुंदरच दिसतो. पण त्याला पाने यावीत. असे मनापासून वाटत राहते. रोज सकाळी सकाळी पान आलं का , बघून नाही आले , यांचे   वाईट वाटत होते. पाणी , माती , खत सगळे होते. पान येणार तेंव्हाच येणार होतं. पण छोटीशी इच्छा होतीच ना , पान येऊ दे अशी. अशा किती गोष्टी असतात , ना स्वार्थ ना काही फायदा. पण वाटते असे व्हावे आणि तसे व्हावे.   या छोट्याशा इच्छा , तशाही आपल्या कंट्रोल मध्ये असतातच कुठे ? पण मनावर तरी कंट्रोल असतो कुठे ? शेवटची ओव्हर ,   पंधरा-सोळा रन लास्ट पेयर बॅटिंगला. तरी चमत्काराची अपेक्षा करतोच ना , आपल्या टीम च्या बाजूने. केक , कुकीज , ढोकळा फुगू दे म्हणून फिंगर्स क्रॉस्ड असतातच ना ? वेदर मनासारखे असू दे , ट्राफिक नसू दे , विमानात , गाडीत खिडकीची सीट मिळू दे. छोट्या छोट्या इच्छांची यादी मारुतीच्या शेपटासारखी लांबच लांब. छोट्या छोट्या म्हणत किती इच्छा असतात. डोळे उघडताच सुरू होतात मनात यायला आणि   दिवस मिटताना स्वप्नात बरोबरच येतात.   काही पूर्ण व्हायला थोडीशी मेहनत पुरते ,   काहींना जीवतोड पण बऱ्याचशा सोडूनच द्याव