छोटी सी आशा!

 

 उन्हाळा सुरू व्हायला लागला कि, चाफ्याची पाने गळतात. निष्पर्ण चाफा सुंदरच दिसतो. पण त्याला पाने यावीत. असे मनापासून वाटत राहते. रोज सकाळी सकाळी पान आलं का, बघून नाही आले, यांचे  वाईट वाटत होते. पाणी,माती, खत सगळे होते. पान येणार तेंव्हाच येणार होतं. पण छोटीशी इच्छा होतीच ना, पान येऊ दे अशी.

अशा किती गोष्टी असतात, ना स्वार्थ ना काही फायदा. पण वाटते असे व्हावे आणि तसे व्हावे.

 या छोट्याशा इच्छा, तशाही आपल्या कंट्रोल मध्ये असतातच कुठे? पण मनावर तरी कंट्रोल असतो कुठे? शेवटची ओव्हर,  पंधरा-सोळा रन लास्ट पेयर बॅटिंगला. तरी चमत्काराची अपेक्षा करतोच ना, आपल्या टीम च्या बाजूने. केक, कुकीज , ढोकळा फुगू दे म्हणून फिंगर्स क्रॉस्ड असतातच ना?वेदर मनासारखे असू दे, ट्राफिक नसू दे, विमानात, गाडीत खिडकीची सीट मिळू दे. छोट्या छोट्या इच्छांची यादी मारुतीच्या शेपटासारखी लांबच लांब. छोट्या छोट्या म्हणत किती इच्छा असतात. डोळे उघडताच सुरू होतात मनात यायला आणि  दिवस मिटताना स्वप्नात बरोबरच येतात.  काही पूर्ण व्हायला थोडीशी मेहनत पुरते,  काहींना जीवतोड पण बऱ्याचशा सोडूनच द्याव्या लागतात. हातात आहे ते सगळे केल्यावर.  मग पूर्ण झाल्या की होणारा आनंद मोठा असतो. बऱ्याचदा  आपली इच्छा  पुर्ण होणे दुसर्या  कुणाच्या तरी सहभागावर, मदतीवर, इच्छेवर अवलंबून असते. मग काय करायचे? जास्ती लावून धरले तर हट्टी, हेकट,  स्वार्थी असले लेबल.  सोडून दिले तर आणखीन जास्त शिक्के. सुवर्णमध्य तो कोणता?

काही इच्छा तर पूर्ण होणे अशक्य,  हे इच्छा मनात येतानाच माहित असते. पण ती मनात येतेच आणि काहीतरी करायला मन धडपडतेच. कितीवेळा घडून गेलेला एखादा क्षण परत मागितलेला असतो आपण. परत जगायला, वेगळ्या प्रकारे किंवा अगदी तसाच पुन्हा अनुभवायला. आत्ता हे लिहिताना देखील कितीतरी गोष्टी यादी करून समोर उभ्या आहेत. जरा विचार केला, तरी एवढेसे ते आयुष्य. त्यात एवढासा आजचा दिवस. त्यात करावयाच्या गोष्टी कितीतरी.  प्रायॉरिटी ठरवू तरी कशी?

मेंदूला त्याच्याच इच्छा बरोबर वाटतात. आणि मनाला चूक-बरोबर कळत नाही. प्रत्येक इच्छा सगळ्यात महत्त्वाची त्याच्या दृष्टीने. वयानुसार जबाबदारी नुसार इच्छा बदलत जातात का?  हो पण आणि नाही पण. रस्त्यावर काढलेले होपस्कॉच पॅटर्न बघितल्यावर उडी मारावी वाटतेच आणि झोका बघितल्यावर बसावे ही वाटतेच. फक्त बऱ्याचदा ते राहते मनातल्या मनात.  इतक्या छोट्याश्या त्या इच्छा. कोणाचेही नुकसानही न करणाऱ्या.  पण बऱ्याचदा त्या फक्त मनातल्या मनातच पूर्ण होतात. कधीकधी आपल्यालाच काही इच्छा वस्तुस्थिती परिस्थिती बघून मनात आणणे चुकीचे वाटते. लॅानला पाणी घालायला टाइमर वाले स्प्रिंकलर बसवायची इच्छा होताच, दहा दहा किलोमीटर चालून कळशीभर पाणी आणणारे आहेत हे आठवले की स्वतःची क्षणभर लाज वाटते. पण ही इच्छा मनात आणणे चुक तरी कुठे? चूक बरोबर चक्रात अडकले कि आनंदाला बंधन लागलेच.

 पण इच्छा आहेत, त्याही हजारो आहेत म्हणून तर मज्जा आहे. वाट पाहण्याची , उद्या उजाडण्याची. नाहीतर आज काय उद्या काय सारखे सगळे. कोणाची तरी छोटीशी इच्छा, छोटेसे स्वप्न सगळ्या जगावर चांगला वाईट परिणाम करून जाते आणि मग त्याचे महत्त्व पटते. दोन मिनिटे डोळे मिटले तरी डोळ्यापुढे किती छोट्या छोट्या इच्छा दिसतात.  हाव नाही, त्या इच्छाच. त्या पूर्ण झाल्या तर आनंद. नाही तर फरक पडतच नाही. पूर्ण करायचा आटापिटा, अट्टाहास नाही. माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे का नाही ते माहीत नाही. इथे तो विषयही नाही. पण कधी कधी वाटते यातल्या काही इच्छा मागच्या जन्मात पूर्ण झाल्या असतील आणि काही पूर्ण करायला पुढचा जन्म लागेल. पण सध्या जेवढ्या आहेत त्यांच्या पूर्णतेचा आनंदही काही छोटा नाही.

 

-श्रुतकिर्ती

१/१०/२०२१



हज़ारों ख्वाहिशें ऐसी के हर ख्वाहिश पे दम निकले

बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले

-ग़ालिब

Comments

  1. Replies
    1. "इच्छा आहेत म्हणून मज्जा आहे" हे वाक्य आवडले. ज्या इच्छा छोट्या छोट्या आहेत त्यात मजा मजा जास्त आहेत, आणि या इच्छा luckily आपल्या "हातातल्या" आहेत हे समीकरण समजुन maintain होत असले, की best.
      यावरून एक छोटी इच्छा आणि मोठ्ठी मज्जा आठवली!
      On a morning like this,
      घरी घोटून केलेली Coffee, आणि ती प्यायला मैत्रिणीची company. और का चाही??! 😃♥️

      Delete
    2. "इच्छा आहेत म्हणून मज्जा आहे" हे वाक्य आवडले. ज्या इच्छा छोट्या छोट्या आहेत त्यात मजा मजा जास्त आहेत, आणि या इच्छा luckily आपल्या "हातातल्या" आहेत हे समीकरण समजुन maintain होत असले, की best.
      यावरून एक छोटी इच्छा आणि मोठ्ठी मज्जा आठवली!
      On a morning like this,
      घरी घोटून केलेली Coffee, आणि ती प्यायला मैत्रिणीची company. और का चाही??! 😃♥️ ~ Kalyani

      Delete
    3. छोट्या इच्छांचीच मजा मोठी…
      कॅाफी, सकाळ आणि मैत्रीणी अजून काय पाहीजे

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान