Posts

Showing posts from September, 2021

चल रे भोपळ्या टुणूक टुणूक

Image
  क धीतरी कचऱ्यातून पडलेल्या बिया तून एक छोटासा वेल आला.पाने कशा सारखी वाटतात , याच्या चर्चेमध्ये भोपळ्याला बहुमत मिळाले. आणि डोळ्यासमोर आली , टुणुक टुणुक उड्या मारत भोपळ्यात बसून जाणारी म्हातारी. हुशार , चतुर आणि   आश्वासनाच्या बळावर संकटांना थोपवणारी. आमिष दाखवून त्यांना टाळणारी. वेळ मारून नेणारी. मुलीच्या घरी जायच्या ओढीने ,   संकटे पार करणारी. का सांगतात असली तात्पर्य असणाऱ्या रूपककथा ? त्याही अगदी लहानपणी. ताटातली भाजी ओळखण्याच्या आधी हा गोष्टीतला भोपळा माहीत होतो लहान मुलांना. तेव्हा त्या म्हातारीशी वाघ कसा बोलला ? ती भोपळ्यात कशी बसली ?   असले आचरट प्रश्न ही पडत नाहीत. गुण्यागोविंदाने गोष्ट ऐकत पिढ्यान पिढ्या झोपी जातात.   हळूहळू या कथांतून मन मेंदू बाहेर पडतो.   जग कळायला लागतं. अशाच कोणत्या तरी कारणाने , या गोष्टी वेगळ्या अर्थाने , रूपाने , समोर उभ्या राहतात. नकळत तेव्हा न कळलेला अर्थ आज उमजायला लागतो.   म्हातारी सारखे आपणही कितीदा तरी वागतो ,   हे आठवते आणि हसूही येते. चार दिवसांनी परत येते या आशेवर , आपणही म्हातारी सारखे किती जणांना आणि किती कामांना टांगून ठेवले आहे आणि चार

पुनरागमनायच!

Image
  गेला महिनाभर गौरीगणपती विचारात, मनात सगळीकडेच ठाण मांडून आहेत. छोट्याशा आयुष्यात दर वर्षी इतके महत्त्व का आहे त्यांना ?   यानिमित्ताने खूप प्रश्न पडतात. खरंच इतकी श्रद्धा आहे ? का प्रथा-परंपरा , समारंभाची हौस ? सवय लागली म्हणून ? न केल्यावर चुकल्या चुकल्यासारखे वाटते म्हणून ? मुर्तिपूजा हा अस्तिकतेचा पुरावा आहे म्हणून ?   कारण तरी काय आटापिट्या मागचे ? पाच दिवसाच्या सणासाठी , सगळ्या घरादाराला त्यात गुंतवण्याचे ? नेहमीसारखी गडबड , लगबग सगळ्या सगट त्या गौराया आल्या , जेवल्या. संध्याकाळ आप्तेष्टांच्या सृहृदांच्या हास्याने भरून गेली. आणि रात्री समईत तेल घालताना शांततेत यातल्या सगळ्या नाही , पण बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे मिळाली.त्या शांत उजेडात अगदी खऱ्या भासल्या. माझ्या जवळच्या प्रत्येकी सारख्या. मुखवटे घडवणार्याची कमाल , असे जरी मेंदू मागून टोकत होता तरी मन मात्र आपल्या मनात जे आहे तेच डोळे बघतात. मनाला सांगतात   याची जाणीव करून देत होते.   ज्येष्ठा कनिष्ठा माझ्या अवतीभवती वावरणाऱ्या , आयुष्यात येऊन गेलेल्या किती जणींची आठवण   क्षणात करून देऊन गेल्या. आणि मला माझे उत्तर मिळाले.त्यां

गणपती '२१

Image
  गौरी गणपती जवळ आले की नॉर्मली ,  विचारात तोच विषय घोळत असतो. त्यामुळे ख्वाबिदाचा विचार करतानाही प्रयत्नपूर्वक सुद्धा दुसरे काही सुचुच  शकले नाही. आस्तिकता- नास्तिकता , मूर्तिपूजा , प्रथा-परंपरा , सोवळे -ओवळे या सगळ्या बद्दलचे कोणतेही विचार , धारणा असल्या तरी गणपती आपलासा वाटतो.हातात ब्रश घेणाऱ्या प्रत्येकाने तो रेखाटला आहे. सगळ्या संतांनी त्याला प्रथम वंदनाचा मान देऊन काव्य रचले. बहुदा आपली विचारसरणी तयार व्हायच्या आधीच हा सण आपल्याला एकतर आवडायला किंवा नावडायला लागतो. आजूबाजूला इतके वातावरण तयारच असते , की त्यातून बाहेर पडणे शक्य नसते. मग त्या बद्दल प्रेम किंवा निर्विकारपणा नाहीतर टोकाचा राग काहीतरी तर येणारच. पण हे वातावरण आनंद देते ,  उत्साह देते एवढे मात्र खरे.प्रत्येक वेळी आठवणीत वेगळे काहीतरी लक्षात राहणारे निघते.कधी जमलेले तर फसलेले मोदक. कधी सजावट   तर कधी गणपतीची मिरवणूक. काहीना काही आठवण्यासारखे असतेच वेगळ्या वेगळ्या वर्षी वेगवेगळ्या मनस्थिती प्रमाणे लक्षात राहणारी वेगवेगळी आठवण.हे वेगळे वेगळे म्हणताना आठवले , ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी ची सुरुवात गणेश वंदनेने केली.

रेशो!

Image
  सणावारांचे दिवस चालू आहेत . सगळीकडे पुरणपोळी आणि मोदक यांची चर्चा आणि तयारी . मधेच कोणाशी तरी बोलताना उकड काढायला पाण्याचे प्रमाण काय घेतलं या ऐवजी ती पाण्याचा पिठीशी ‘ रेशो ’ काय ग ? असे म्हणाली आणि मनातल्या मनात हसूच आलं . इतका छान शब्द वापरण्याचं कौतुकही वाटलं . बरोबरच होतं तीचं उकडीत पाण्यालाही महत्त्व होतच त्यामुळे दोन्ही जिनसांचे हिस्से किती हे महत्त्वाचे वाटले तिला . सगळ्या गोष्टीं मध्ये रेशो , फ्रॅक्शन असतात नाही का ? जिथे दोन वस्तू , व्यक्ती . घटना , भावना आल्या तिथे त्यांचे कमी अधिक प्रमाण आणि ते दाखवायला रेशो ! दोन घटकांची तुलना करण्यासाठी वापरले जाणारे परिमाण हे प्रत्येक ठिकाणीच असते . कुठलीही घटना , प्रसंग , नाते दोन घटकांचे . त्यात एकतर्फी काहीच नसते कमी-जास्त पन्नास-पन्नास अगदी एक-नव्याणव असा काहीही असला तरी रेशो हा असतोच . शंभर / शून्य असे कधी नसते . हक्क , अधिकार , अपेक्षा , कर्तव्य , राग , लोभ सगळ्यांचेच कमी-जास्त प्रमाण झाले की  नव नव्या भावना तयार होतात आणि त्यातून उभा राहतो मानवी मनाचा व्यापार . त्यातल्या एका भागात असताना , दुसर्‍या भ