रेशो!

 


सणावारांचे दिवस चालू आहेत. सगळीकडे पुरणपोळी आणि मोदक यांची चर्चा आणि तयारी. मधेच कोणाशी तरी बोलताना उकड काढायला पाण्याचे प्रमाण काय घेतलं या ऐवजी ती पाण्याचा पिठीशी रेशोकाय ग? असे म्हणाली आणि मनातल्या मनात हसूच आलं. इतका छान शब्द वापरण्याचं कौतुकही वाटलं. बरोबरच होतं तीचं उकडीत पाण्यालाही महत्त्व होतच त्यामुळे दोन्ही जिनसांचे हिस्से किती हे महत्त्वाचे वाटले तिला. सगळ्या गोष्टीं मध्ये रेशो, फ्रॅक्शन असतात नाही का? जिथे दोन वस्तू, व्यक्ती. घटना, भावना आल्या तिथे त्यांचे कमी अधिक प्रमाण आणि ते दाखवायला रेशो! दोन घटकांची तुलना करण्यासाठी वापरले जाणारे परिमाण हे प्रत्येक ठिकाणीच असते. कुठलीही घटना, प्रसंग, नाते दोन घटकांचे. त्यात एकतर्फी काहीच नसते कमी-जास्त पन्नास-पन्नास अगदी एक-नव्याणव असा काहीही असला तरी रेशो हा असतोच. शंभर/शून्य असे कधी नसते. हक्क,अधिकार, अपेक्षा, कर्तव्य, राग, लोभ सगळ्यांचेच कमी-जास्त प्रमाण झाले की  नव नव्या भावना तयार होतात आणि त्यातून उभा राहतो मानवी मनाचा व्यापार. त्यातल्या एका भागात असताना, दुसर्‍या भागाकडे बघता येते का? आपली बाजू बरोबर, योग्य-अयोग्य याचा विचारही करायचा आधी याच घटनेला दुसरी बाजू आहे. याच भावनेला दुसरा अर्थ आहे. याच नात्यात दुसरी ही व्यक्ती आहे. हे लक्षात येते का ? मग त्यातले प्रमाण काहीही असो. अगदी आरशात बघितले, तरी दिसते आपलेच प्रतिबिंब. आपल्या अस्तित्वाचा दुसरा भाग. सारखाच असला तरी उजवा डावा, कण भर कमी, कण भर जास्त. प्रमाण वाढवायचे, कमी करायचे असले की रेशो नीट कळावाच लागतो. सगळेच, प्रमाणात कमी किंवा जास्त करावे लागते. समतोल ढळला की चित्र बिघडतं. रेशो काढायला जमायची गरज म्हणून तर असते. राग लोभाचे असे बेमालूम मिश्रण झाले ही स्वभाव बनतो. त्याचा रेशो बिघडला की मनाचा तोल जातो. पुन्हा समतोल साधायला, काय कमी करायचे ते करावेच लागते. दर वेळी राग नाही, तर कधीकधी लोभही कमी करावाच लागतो, इक्विलिब्रियम साधायला. गणित शिकून काही फायदा होत नाही म्हणणार यांचा रेशो प्रपोर्शन चा रोजचा वापर भरपूर असतोच की. मनाचे, स्वभावाचे, भावनांचे, नात्यांचे कितीही तुकडे केले तरी, प्रत्येक भागाचे गुणोत्तर एकसारखे राखण्याचा सराव जमला की जगण्याचे: तेही छान जगण्याचे गणित सहज सुटते. फक्त त्यातल्या प्रत्येक भागातल्या खरेपणा ला सामोरे जाता आले पाहिजे आरश्यातल्या प्रत्येक तुकड्यातल्या चित्रासारखे.

-श्रुतकिर्ती

-०२/०९/२०२१



Comments

  1. Ratio : नेहमी प्रमाणेच अंतर्मुख करायला लावणारा लेख.
    Equilibrium हा शब्द आवडला. तोच तर सांभाळायचा प्रयत्न असतो प्रत्येकाचा..... जिथे तिथे / ज्यात त्यात
    / जेव्हा तेव्हा.
    Balanced life : Quality of life.
    Ratio???? 🤔😌

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you, Balanced life: Quality of life
      यातला ratio बहूधा परिस्थितीजन्य असतो बदलत राहतो पण proportionate असतो😁

      Delete
  2. Thanks श्रुती, original message मध्ये sign करायचे राहिले ~ CK

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान