Posts

Showing posts from October, 2022

दिवाळी

Image
नेहमीप्रमाणे दिवाळी आली. छ्या… हे वाक्य लिहिताना पण विचित्र वाटते. दिवाळी नेहमीसारखी कधीच नसते. दरवर्षी ती वेगळीच असते. आठवणीत जितक्या मागे जाता येईल तेवढ्या वेळी त्या त्यावर्षीचे काहीतरी वेगळे असतेच.  वर वर पाहता फराळ, फटाके,आकाशकंदील, रांगोळी, दिवाळीअंक, नवे कपडे असे परम्युटेशन असले तरी त्याचे कॉम्बिनेशन दरवेळी वेगवेगळे असते. एक फॅक्टर कॉन्स्टंट असतो. त्यात असणारी माणसे. पण तीही काळाप्रमाणे बदलतात किंवा त्यांचे रोल बदलतात. वय, जागा, परिस्थिती बदलते तसे यातल्या प्रत्येक आठवणीचे संदर्भ बदलतात.  प्रत्येकाच्या आठवणीत फराळ असतोच पण त्याला जोडून येणारी चव, घरभर पसरलेला तळणीचा वास, तो करणारे हात हे वेगवेगळे. त्यामुळे मनात येणारा भावही नक्कीच वेगवेगळा. माझ्याही गेल्या  अनेक दिवाळ्या चार चौघांसारख्याच. पण मागे वळून पाहिले की उरणार्या आठवणी फक्त माझ्या पुरत्याच.  शाळेत असताना दादा बरोबर बांधलेला किल्ला मला जसा आठवतो तसाच त्यालाही नाही आठवणार. त्याच्या डोक्यातला किल्ला त्यात मी असूनही त्याचा त्याचा वेगळाच असणार. ताईच्या सुंदर रांगोळी शेजारी काढलेली माझी रांगोळी छानच असायची हा माझा गैरसमज दूर व्

विरजण, टोस्का, इकेबाना आणि बरेच काही…

Image
  मातृभाषा न कळणारे रोज आजूबाजूला भरपूर असतात. छोट्या छोट्या गप्पा मारता मारता , काहीतरी तुझे माझे शेअर केले जाते. आणि इथे सगळे गडबडते. साधे साधे प्रश्न असतात पण उत्तर उगीचच अवघड होऊन जाते. काय सांगायचे यापेक्षा कसे सांगायचे यातच हरवायला होते. तिकडच्या बाजूच्यांचेही असेच होत असावे बहुतेक. ओढून ताणून ,   माहीत असणाऱ्या किंवा समोरच्याला माहीत असतील असे वाटणाऱ्या शब्दांचा , चवींचा , भावनांचा , घटनांचा आधार घेत घेत संभाषणाची गाडी चालू ठेवावी लागते.   नाहीतर ‘ स्मॉल टॅाक्स’ पुरतीच मर्यादित राहते. संध्याकाळी बागेत भेटलेल्या आजीशी बोलताना ,   त्यांचे शब्द कळतात. अर्थ कळतात. कारण भाषा कळते. पण त्या एखाद्या वस्तूचे , घटनेचे वर्णन करत असतानांचे चमकलेले डोळे दिसले तरी कारण उमजत नाहीच. रेडिओवर ,   अखंड चाललेल्या गप्पांच्या मधली गाणी ऐकू तर येतात पण लॉंग ड्राईव्हच्या प्ले लिस्ट मध्ये ती कधी सिलेक्ट होत नाहीत.   हौस म्हणून चव बदल म्हणून जगभरचे पदार्थ ताटात हजेरी लावतात पण दमून भागून घरी आल्यावर किंवा चार दिवसांच्या आजारपणानंतर त्यांची चव लागत नाही. भाषांतर जमूनही ,   लॉस्ट इन ट्रान्सलेशन का ?

दमलेली मी/ती

Image
काळजी करून करून दमलेलेच होते , म्हणून शेवटी एकदाचे ठरलेच   शांतता ती ही मनाचीच परत मिळवायचीच काय चूक ? काय बरोबर ? विचार करून करून दमलेलेच होते म्हणून शेवटी एकदाचे ठरवलेच , आता कंबर कसून कामालाच लागावे कोणत्या ? मलाच येणाऱ्या आणि मलाच आवडणाऱ्या   माहित नाही , माहित नाही म्हणून दमलेलेच होते   म्हणून मग शेवटी एकदाचे ठरले , आता शोधायचेच शोधले आणि सापडले-   मीच ,   माझ्या जवळचे   सगळे ते पार नकोसे वाटणारे माझ्या दूर दूर चे सगळे   दुष्टावा , वाईटपणा बघून बघून दमलेलेच होते म्हणून शेवटी शोधलाच माझ्याच मनातला नंदनवनातला तो कोपरा , ज्यात सामावला गेला रोजचा सगळा दिवस माझा सगळ्यातला गुंता सोडवण्यात , त्यात गुंतण्यात दमलेलेच होते   म्हणून मग शेवटी ठरवलेच , सोडवलाच नाही तो गुंता   सरळ पडलेच बाहेर गुंत्यातून बघू लागले लांबूनच त्याच्याकडे दमलेल्या मला/ तिला बघून बघूनच दमून गेले मग मात्र ठरवलेच , दमलेच होते कशाने ?   दमलेल्या मलाच , दमलेली बघण्याने! - श्रुतकिर्ती ३०/०९/२०२२