Posts

Showing posts from August, 2022

कहानी पोटली बाबा की!

Image
  गेल्या आठवड्यात माझ्या ओळखीच्या एका शिकाऊ ड्रायव्हरला सिग्नल ला शांतपणे उभे असताना मागून येऊन एकाने धडक दिली. सुदैवाने कोणालाही काही झाले नाही. गाड्यांचे नुकसानही झाले नाही. हे सगळे ऐकल्यावर “ चला बरे झाले काही वाईट झाले नाही”  असे आपसूकच तोंडून निघाले. पण शिकवू ड्रायव्हर पटकन म्हणाला " Now I have a car crash story to share, my first crash story" फार मजा वाटली. खरच किती गोष्टी वेल्हाळ आहोत आपण . सगळ्याची   एक गोष्ट असते.   लहानपणी चिऊ काऊ करत सुरू झालेल्या गोष्टी अशा रोजच्या अनुभवांपर्यंत येऊन पोहोचतात. मनोरंजनाचे पहिले साधन जे आपल्याला कळते तेच असते गोष्ट ऐकणे आणि गोष्ट सांगणे.   नुसत्या कल्पना , मग त्या कल्पनांमध्ये अनुभव ,   कधी एखादा सहज न पचनी पडणार सल्ला. या सगळ्याचे मिश्रण करून तयार होणाऱ्या गोष्टी तर महत्त्वाच्याच पण त्याहीपेक्षा रंजकदार पद्धतीने त्या सांगणारा महत्त्वाचा.   सांगणारा गोष्टीची मजा वाढवतो किंवा घालवतो.   आई बाबा ,   आजी आजोबा यांच्या मांडीवर डोके ठेवून गोष्ट ऐकताना गोष्टी इतकेच त्या सांगणाऱ्याच्या आवाजाने ,   अविर्भावांनी खिळवून   ठेवलेले असते.   नुस

गोपाळकाला

Image
  फिरून फिरून भोपळे चौकात झालेय मेंदूचे , मनाचे.   प्रत्येक कामाच्या सुरुवातीला किंवा शेवटी कुठेतरी खाणे , जेवण , अन्न याचा रेफरन्स जोडलेला असतोच. अगदी आजची जन्माष्टमी सुद्धा कृष्णाबरोबरच , अगदी त्या क्षणातच गोपाळकाल्याचा विचार मनात ,   डोळ्यापुढे चित्र आणि जिभेवर चव घेऊनच आली. काही काही पदार्थ कशाच्या तरी जोडीने येतात तेव्हाच छान वाटतात. उगीचच खायला गोपाळकाला केला आहे , हे शक्य असले तरी कानाला जरा जडच जाते. पण गोकुळाष्टमीला जोडून ते एका लयीत येते. मला स्वतःला अंदाज पंचे धागोदरसे वाले पदार्थ आवडतात. इतके ग्रॅम ,   तितके मिलिलिटर , ठराविक टेंपरेचर म्हटले की उगीचच फसणार चे लाल निशाण आधीच फडकायला लागते.   त्या बॅकग्राऊंड वर गोपाळकाला हा पदार्थ यादीत भेळेबरोबरच   अव्वल स्थानावर आहे. चुकायची काळजी नाही. न आवडायचा प्रश्न नाही. कुणाला फारच आवडला तर रेसिपी द्यायची भानगड नाही. जे आहे ते मनोभावे मिसळा , तयार. एवढे सांगितले आणि स्वतःला समजले की पुरे असते. न आवडणाऱ्या ने प्रसाद म्हणून खावा आणि माझ्यासारख्यांनी कृष्णाला आवडतो च्या नावाखाली पोटभर खावा , हेच खरे. वर वर विचार केला तर अगदी सरळ ,

ब्लॅक अँड व्हाईट कहाण्या

Image
  साधारण जुलै-ऑगस्ट मध्ये सगळीकडे सणवार , प्रथा-परंपरा , त्या चूक का बरोबर , त्या त्या दिवसाचे स्पेशल पदार्थ , वाणाच्या वस्तू , साड्या , दागिने याबरोबर आणखीन एक गोष्ट व्हायरल होते. हो गोष्टच , पण त्या त्या सणाची. त्या त्या दिवसाची. श्रावणातल्या कथा , मग कधी त्या आधुनिक साज लेवून   तर कधी अगदी परंपरागत रूपात. प्रत्येक दिवसाला , प्रत्येक सणाला छानशी कथा. आटपाट नगराने सुरू होणा ऱ्या  आणि “उतू नका मातू नका , घेतला वसा टाकू नका” सांगत  ‘सुफळ संपूर्ण’  होणाऱ्या या कथा सांगोवांगीच्याच.  कुठे कधी सुरुवात झाली याचा इतिहास अज्ञातच.   सगळ्या कहाण्या तशा अगदी ब्लॅक अँड व्हाईट. सरळ साध्या. राजा असेल तर , आवडती नावडती राणी. एक   गुणी तर दुसरी अगदी विरुद्ध.   कहाणी ऐकतानाच एकीचा राग यावा आणि एकीचे दुःख कधी संपते याची वाट पहावी , इतका विरोधाभास. नावडती कितीही त्रास झाला तरी चांगलीच वागणार आणि आवडती वाईटच. एक जण वसा चालवणार तर एक जण घेतला वसा टाकणार. सरळ सोट मार्गाने चालणारी कथा. सांगितलेले व्रत   केले की अपेक्षित फळ मिळणारच. देव देवता प्रसन्न होऊन वर देणारच आणि शेवटी सगळ्यांचे भले होणार याच वळणा