Posts

Showing posts from September, 2022

पोर्ट की

Image
थंडीने हळूहळू काढता पाय घ्यायला सुरुवात केलीय आणि उबदार ऊन जाणवायला लागलेय. हे भल्या पहाटे दुलईत गुरफटणाऱ्या आपल्यापेक्षा झाडापानांना आधी  कळते. थंडीने मरगळलेले करडे , राखाडी झालेले त्यांचे जग , पोपटी-हिरवे होता होताच सगळीकडे फुलांचे बहर दिसायला लागलेही. काही काही फुलांचे वास आधी जाणवतात तर काही माझ्याकडे न पाहता पुढेच कसे जाल ? हे सांगायला पानोपानी फुलून अस्तित्व दाखवून देतात. या सगळ्यातून स्प्रिंग आलाय , उन्हाळा आता दूर नाही हे कळलेले असतेच. माझ्या रोजच्या जाण्याच्या रस्त्यावर , भले थोरले चार माणसांना मिळूनही कवेत न घेता येण्यासारखे अनेक हिरवेगार वृक्ष आहेत. तिथून जाताना काल अचानक वार्याच्या झुळुकीबरोबर एक मंद सुवास आला. आणि मान वर करायचे कष्टही न घेता त्या चार-पाच झाडातले आंब्याचे झाड कोणते हे कळले होते. ते पानोपानी मोहरले होते. उन्हाळा आला , कैर्या , पन्हे , लोणचे , रस आम्रखंड   आंबा बर्फी , आईस्क्रीम , मस्तानी… क्षणार्धात तीनशेसाठ डिग्री चा प्रवास जिभेने केला. पुढची पाच सात मिनिटे , आंबा या एका शब्दाने जुन्या नव्या आठवणींच्या जगात भिरीभिरी फिरवून आणले.   किती ताकद होती त्य

धडपडणे…

Image
कपाट उघडून कप्प्यातून काहीतरी काढले आणि डोके वर केले मात्र , ठण्ण्… वरच्या कपाटाचे दार उघडेच ठेवले होते. चांगलेच डोके आपटले. विचार केला तर गेल्या आठवड्यात दोन-तीनदा डोकेच आपट ,   ठेचच लाग असं झालेले होतेच आणि जाणवले आपण बर्याचदा धडपडतोय.   वरचे कपाट उघडले आहे माहीत असूनही डोके वर केलेच कसे जाते ?   हे कोडे काही सुटेना.   रोज ज्या   दारातून शंभर वेळा जातो त्याच्यात पाय अडखळतोच कसा ? दाराला हँडल असताना वेगळीकडेच धरून हात चेमटतोच कसा ? बरंही आपटापटी होवून भागत नाही. मग सुरू होते कसे झाले ? काय झाले ? ची कथा. जखम टेंगूळ   दिसणारे असले   की मग तर विचारू नका. भेटणारा प्रत्येक जण विचारणारच आणि मग त्यावर , “ हळूच काम करत जा” , “ लक्ष कुठे असते ?” “ एकावेळी एकच गोष्ट करावी” असे समोरच्याच्या नात्यावर आणि स्वभावावर अवलंबून असलेले रिप्लाय वजा सल्ले , अर्थात चांगलेच पण येतात मात्र खरे. कुठून आपटलो असे वाटयला लावतातही ते. त्यातच एखादा वयाने आणि अधिकाराने मोठा आवाज “वेंधळेपणा नको करत जाऊ” म्हणतो मात्र… आणि डोक्यात चक्र फिरायला लागते नक्की काय होते ?   माहित तर असतेच की दार , ड्रॉवर , भिंत कु

गणपती आला न्…

Image
  नव्या वर्षाच्या नव्या कॅलेंडर मध्ये , भराभरा पाने उलटत गणेश चतुर्थी , दसरा आणि दिवाळीची तारीख बघायचीच असते. जोडून सुट्टी आली आहे कां ? दहा दिवसांचा का अकरा दिवसांचा गणपती आहे हे बघताना , गणपतीचे वेध लागलेले असतात.   यावर्षीही असंच झालं आणि यथावकाश वाजत गाजत गणपती आले. ‘पहिले नमन ‘ म्हणत ज्याच्यामुळे सगळ्याची सुरुवात होते त्याच्या पूजेची , सजावटीची , प्रसादाची तयारीही उत्साहात चालूच होती . आजूबाजूचे वातावरणही अगदी नेहमीसारखेच गणपतीमय झाले होते. उत्साहात ,   धामधुमीत सुरू झालेला हा सोहळा एक दिवसाचा , दीड दिवसाचा , पाच दिवसाचा असे करत करत अनंतचतुर्दशीला येऊन पोहोचला. आला आला म्हणताना , गणपती विसर्जनाचा सोहळा पार पडला.   मागची आवरावरी करताना डोळ्यापुढे मनात बरंच काही येत राहीले.   यावर्षी डेकोरेशन काय करायचे याच्या डायनिंग टेबलवर घडणाऱ्या चर्चा.   रंगसंगती , नक्षी यावरचे लुटुपुटूचे वाद , त्यानंतर रोजची कामे आटोपल्यावरची छोटी छोटी तयारी.   खरेदी , आवराआवरी आमंत्रणे , एक ना दोन. एक सण साजरा करण्यामागे कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी. मग सगळ्याचा शेवट विसर्जन. आणि नंतर राहणाऱ्या आठवणी.