Posts

Showing posts from August, 2021

मन वढाय वढाय

Image
  भीती या शब्दांचीच कधी कधी भीती वाटायला लागते. भीती , एन्झायटी या शब्दांकडे बाहेरून त्रयस्थ म्हणून बघणे आणि स्वत: त्यातून जाणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. डोळ्यात टचकन पाणी येणाऱ्याला इमोशनल म्हणून हिणवणे , भित्र्यभागूबाईची उपमा देणे फार कॉमन आहे. स्वतः त्या ठिकाणी नसताना सल्ला देणेही फारच सोपे आहे नाही. कां पण हे सगळे वाटले आज ? चार-पाच आठवड्यांपूर्वी ठरले कि एक ठराविक वीकेंड एकीकडे. सकाळी लवकर जमून परतण्याची घाई न असण्याचा. भेटण्याच्या ओढीने तयाऱ्या सुरु झाल्या. उत्साहाच्या भरात एका अगदी छोटयागोष्टीकडे माझे जरा दुर्लक्षच झाले. मैत्रिणीच्या घराचा पोस्टल ऍड्रेस आता बदललाय. जिपीएस शिवाय तिच्या घरी जायला यायला आत्ता कुठे जमायला लागले आणि ताईंनी घरच बदलले. झाले! डाव्या उजव्याचा घोळ घालणारी मी गूगल काकूंनी टर्न लेफ्ट म्हटले कि तीन लेन बदलत बरोबर उजवीकडे टर्न घेते. त्यामुळे हे लक्षात आल्यावर आदल्यादिवशी पासून मोर्चे बांधणी सुरु झाली. तीनचार महत्वाची वळणे बघून ठेवली. मनाला जे होईल ते होईल वगैरे समजावत दुसरा दिवस उजाडला. आणि गूगल मॅप्स ला गम्मत करायचा मूड आला. आणखीनच भलता रस्ता तिने पकडल

Learning to unlearn.

Image
  गेला अक्खा आठवडाच मजेशीर होता. सोमवारी मी काहीजणांबरोबर भगवदगीता वाचत होते , वाचता वाचता मधेच फेमस , ' यदा यदा ही धर्मस्य... ' वाला श्लोक आला. आणि नीट तालासुरात गीता वाचणारा माझा मेंदू बी. आर. चोप्रांच्या सुप्रसिद्ध ट्यून ला कधी ट्यून झाला ते कळलेच नाही. कधी काळी लहानपणी डोक्यात फिट झालेली ती चाल विसरता आलीच न्हवती. मेंदूने नवी चाल शिकून सुद्धा. इतकी छोटीशी गोष्ट सुद्धा मेंदूला unlearn करायला जमत न्हवती , त्या चालीशी असलेले कनेक्शन विसरता येत न्हवते ; काहीतरी आठवणी जोडलेल्या होत्या त्याच्याशी म्हणून असेल का कदाचित ? त्याच दिवशी अफगाणिस्तानच्या बातम्या येऊ लागल्या. विडिओ पाहायला मिळाले. स्वतःचे घर दार , चालू असलेले आयुष्य एका क्षणात सोडून , जमेल तसे स्वतःच्या देशाच्या बाहेर जायला निघालेले शेकडो लोक दिसले. त्यांना त्यांचा वर्तमानकाळ सोडून जायचे होते. भूतकाळातल्या बर्याचश्या आठवणी पुढे येणाऱ्या भविष्यकाळाचा विचार करून पुसून टाकायच्या होत्या. कसे जमणार होते त्यांना ? पूर्ण पुसता येत नसतातच पण निदान तात्पुरत्या तरी बाजूला सारायच्या होत्या. काहींना ते जमेलही पण तात्पुरते , कधी

Left is Right!

Image
  आज जागतिक डावखुरा दिवस , पण त्याचा ख्वाबिदाशी काय संबंध ? मी लिहिते तर उजव्या हाताने. पण... कहानीमे ट्विस्ट है , मी आहे डावरी. शाळेतल्या बालवाडी वाल्या बाईंनी रागे भरून लिहायला , पेन्सिल उजव्या हातात दिली. पण सुदैवाने आईवडिलांनी ते तिथेच थांबवले. परिणाम लिहणे , जेवणे उजवा हात आणि बाकी कामाला डावा हात पुढे यायचा आणि अजूनही येतो. त्यामुळे शंभर टक्के नसली तरी सेमी पेक्षा जास्त डावरी आहे मी. डावर्याना जरा वेगळी टट्रीटमेंट मिळतेच बऱ्याचदा. आरतीत डाव्याहाताने टाळ्या वाजवल्या , कुंकू लावायला डावा हात पुढे आला कि बर्याचजणांच्या भुवया वर होतात. पण सगळ्या डावर्याना ते अंगवळणी पडलेले असते. खरी मज्जा येते ती कात्री वापरताना. नेहमीची कात्री , सालं काढायचे सोलाणे नीट वापरताच येत नाही. आता left hand mouse, कात्री सगळे मिळते त्यामुळे असा त्रासही उरलेला नाही. मग कशाला बळेच उजवा हात वापरायचा. ज्या ज्या डावर्याना प्रयत्नपूर्वक उजवे करतात ते बहुदा दोन्ही हात वापरायला शिकत असावेत. डावा हा उगाचच कमीपणा दर्शक शब्द करून टाकलाय आपण. चांगल्याला चांगले म्हणा , वाईटाला वाईट. हे उजवे डावे असले समानार्थी शब

यादी

Image
  " बडीशेप संपायला आलीय!" या डायलॉग वर "यादीत लिही" हा इन्स्टंट रिप्लाय आला. फ्रिजवर तीन-चार प्रकारच्या याद्या विविध रंगात ठाण मांडून बसल्या होत्या. बडीशेप तिच्या तिच्या यादीत गेली आणि मनात आले किती उपद्व्याप करतो आपण. वाणसामानाची , इतर खरेदीची , ठरवलेल्या कामांची , घेतलेल्या अपॉइन्टमेन्टची , मारुतीच्या शेपटासारखी  याद्यांची यादी वाढतच होती. काम सोपे जावे म्हणून , हाताखालून गेले कि लक्षात राहते , दुसऱ्याला फार सूचना द्याव्या लागत नाहीत अशी असंख्य कारणे  देत मी याद्या करतच राहते. Being Organised या मेंदूच्या एका कप्प्याच्या गरजेसाठीही हे कधी कधी आवश्यक असते. काही वेळा याद्यांमध्ये स्वतःला बांधून घेणे सोपे जाते म्हणूनही असेल. प्लॅनरमध्ये to do list लिहणे , विविध हायलायटर्स वापरून , बाजूला चित्रे काढून रंगीबेरंगी याद्या तयार करायला, खरेतर मज्जा येते हे मुख्य कारण असावे. लहानपणीच्या किराणावाल्याच्या वहीचे ग्लोरिफाइड व्हर्जन हे. कुठून आल्यात या याद्या ? यादीचा इतिहास म्हटले की एक गमतीशीर चित्र डोळ्यापुढे येते. पौराणिक मालिका , चांदोबा , अमरचित्रकथा या सगळ्याचे कॉम्