Posts

Showing posts from March, 2022

बांध

Image
  पूर येऊन गेला आणि हा डॅम इतका भरला आणि तो तितका . आता पाणी सोडले पाहिजे . सोडलेले पाणी किती प्रदेश बुडवणार ? किती वेगात येणार ? हीच चर्चा . लिटरचा , फार तर मिलिलिटरचा हिशोब समजणारे आपण , ते क्यूसेक्स आणि घनमीटर वगैरे ऐकायला मिळत होते .   पाणीच ते , बांधून ठेवल्याने अस्वस्थ झालेले . अति झाले आणि सगळे बांध तुटून पहिल्या मिळालेल्या संधीला धावत सुटले . महत्वाच्या दिवशी सकाळपासूनच उशीर झाल्यावर पळत सुटायला लागते तसे .   पाण्याला पक्के ठाऊक असते कुठे जायचे ते . तशी एरवी त्याची गतीही ठरलेलीच असते . त्याला ज्या नदीत जाऊन मिसळायचे असते तिचा धर्मच असतो वाहणे . त्यामुळे तिच्यात मिसळायचे तर यालाही थांबून चालतच नाही . नदीत मिसळले की त्याची गती नदीचीच बनते . कधी सुळकन धावणारी , मग भरभर पुढे निघून जात मागचा काठ कोरडा ठेवणारी . किंवा शांत , विस्तीर्ण वाहतच राहणारी . कधीही खंड न पडणारी . ऐलतीर पैलतीर असणारी .   तळाच्या दगडांना कधीच सूर्यप्रकाशात उघडे न पाडणारी . पाणी ज्या नदीत मिसळते त्याच गतीने ते पुढे जात राहते .   योग्य कामासाठी , गरज म्हणून योग्य ठिकाणी बंधारा लागतो .

रंग

Image
 फोनवर बोलता बोलता मैत्रीण पटकन , “ अगं भिंतीच्या रंगाला मॅचिंग नॅपकिन घेतले .” असे म्हणाली आणि आम्ही दोघीही खूप हसलो . एखाद्या रंगाचे वेड लागले की असेच होते , जळी स्थळी काष्ठी पाषाणी , तो रंग सापडायला लागतो आणि सगळीकडे तो हवाही असतो .   तसेही   आपण रंगमय विश्वात वस्ती करून असतो . प्रकाशकिरणांचे विश्लेषण झाले की इंद्रधनुष्याचे सात रंग आपल्याला मिळतात , पण थोडेसे शास्त्रीय स्पष्टीकरण बाजूला ठेवले तर रंग ही प्रकाशा विषयीची संवेदनाच ना . अगदी ज्याला आपण पांढरा प्रकाश म्हणतो त्यातही विविध रंगाचे कण सामावलेले असतातच . पांढरा हा प्रकाशाचा पूर्ण प्रभाव , तर काळा म्हणजे अभाव . तरीही आपल्या सोयीसाठी तेही रंगच आणि या दोघांच्या मध्ये असते ती आपली रंगीबेरंगी दुनिया . असंख्य रंग , त्यांच्या असंख्य छटा . आपल्या डोळ्याला दिसतात तशाच दुसऱ्याच्या ही दिसतात , असे समजून त्यांना दिलेली काही कॉमन ; काही अगदीच विचित्र नावं .   ‘ तानापिहिनिपाजा ’ पाठ करताना लहानपणी पडलेले , ‘ पारवा ’ या रंगाचे कोडे : मोठे झाल्यावर ‘ रामा कलरची पैठणी ’ किंवा ‘ राणी कलरचा शालू ’ अशा कोड्यामध्ये अजून

मिसळणाचा डबा

Image
   पावसात घरात अडकून पडलं की , टीव्ही बघणे हा एकमेव सामुदायिक कार्यक्रम सुरू होतो . काल असेच SBS Food वर एक कार्यक्रम नजरेसमोर आला . कोणता तरी केक आणि काहीतरी तिखटमिठाचे शिकवणे चालू होते . मी आपली डोक्यात काहीही नोंद न घेता , डोळ्यांनी बघत होते . शेवटी कळले या सगळ्यात ते काही मसाल्याच्या पदार्थांचा वापर करणार होते , त्याबद्दलच माहिती सांगत होते . मेंदूने तेही रजिस्टर केलेच नाही . संपतांना शेफने बरोबरच्या गेस्टला त्याच्या , spice rack मध्ये असणाऱ्या आणि वारंवार संपणाऱ्या पाच मसाल्याच्या पदार्थांची नावे विचारली आणि मेंदू , कान टवकारले गेले . त्याच्या मीठ , मिरपुडीच्या बाटल्यांच्या जागी , मला माझा मिसळणाचा डबा दिसायला लागला . मनच ते , खेळ म्हणून मी स्वतःलाच विचारले माझे कोणते ते पाच मसाल्याचे पदार्थ ?   आता मात्र गोंधळ उडाला . ही संख्या चुकीची वाटायला लागली . मसाल्याचे पाळेच तर सात खाण्याचे . त्यातले सगळेच रोज लागणारे . त्याबरोबरच फोडणीला लागणार म्हणून शेजारी ठेवलेली हिंगाची डबी आली , बरं डब्यात जिरे असले तरी जिरेपूड वेगळी . काळा गोडा मसाला शेजारीच निघाला .