Posts

Showing posts from March, 2021

वाचू आनंदे

Image
परवा   लायब्ररीत   लहान   मुलांच्या  section  मध्ये   Ruskin Bond   यांचे   The Road To Bazaar   हे   पुस्तक   दिसले   आणि   अक्षरश : memories flooded back!   देहरा   गावच्या   बाजारातील   सगळ्या   गोष्टी आठवू   लागल्या .  कोकी ,  मुकेश ,  सुरज   शेजारी   पाजारीच   वावरत   असल्यासारखे   वाटले .  खरे   पाहता   हे   पुस्तक   शेवटचे   वाचले   त्याला१५ - २०   वर्ष   तर   नक्कीच   झाली ,  पण   ते   जसेच्या   तसे   लक्षात   राहण्याची   जादू   त्या   पुस्तकात ,  लिखाणात   होती . असे   वाचतानां   बर्याचदा   होते ,  आपण   जणू   त्या   कथेचा   भागच   होतो .  नाकतोड्यांची   शर्यत   लावणार्‍या   या   मुलांचे   आपणही   एक   सवंगडी   आहोत   असे   वाटायला   लागते .  जेन   ॲास्टीनच्या   कादंबर्‍या   वाचताना   आपण   त्या   अठराव्या   शतकातल्या   इंग्लंडचा   भाग   होतो .  मिस .  वुडहाउस   किंवा   एखादी   मार्गारेट ,  ॲन   गप्पा   मारत   असलेल्या   बागेत   मागच्या   बाकावरच   बसलो   आहोत   जणू   असे   वाटते . बाबासाहेब   पुरंदर्‍यांनी   वर्णिलेल्या   लढाया   वाचताना   एखादा   मावळा   व्हायला   होत

पूर्णब्रह्म

Image
  फूड शोज बघणे हा माझा आवडता विरंगुळा आहे. ते नुसत्या रेसिपी सांगणारे , एक चमचा हे , एक चमचा ते वाले नाही तर इतरही बरेच काही न सांगताच सांगणारे. संजीव कपूरचा झी टीव्ही वरचा ' खाना खजाना ' जेव्हा सुरु झाला तेव्हा त्याचे रिपीट टेलिकास्ट सुद्धा मनलावून मीच नाहीतर अनेकांनी बघितलेत. अतिशय गोड शुद्ध हिंदी बोलणाऱ्या संजीव कपूरच्या रेसिपीपेक्षा कितीतरी नवे इंग्रेडिएंट्स ,  त्यांची हिंदी इंग्रजी नावे , वापरली जाणारी क्रोकरी , कटलरी कायम लक्षात राहिली. मग Karen Anand यांनी पुण्यात एक ' गुड फूड मॅगझीन ' काढलेले , मी आणि ताईने त्याचे दोन वर्षाचे subscription   घेतलेले. खजिनाच मिळाला त्यात , कधी न पाहिलेले , ऐकलेले पदार्थ , असंख्य प्रकारचे चीज , ब्रेड , exotic फळे आणि भाज्या , फोर्क स्पून नाईफ वापरण्याच्या तर्हा ; अनोखे जग होते ते. Remember it was १९९६! तेव्हा हे सगळॆ नवीन , नवखेच होते. मग मिळतच गेले असे बरेच बघायला , वाचायला. शांघायच्या खाद्यसंस्कृतीतल्या वैविध्याने तर सर्वार्थाने डोळे उघडले. जिवंत प्राणी , पक्षी , भाज्या , फळे शेजारी शेजारी बघून बघून हे कोणाचे तरी अन्न आहे त्य

कृतज्ञ

Image
  माझ्याकडे माझ्या बाबांचे एक आवडते पुस्तक आहे. ' ख्वाबिदा ' ची सुरवात जे चाळताना झाली तेच. ऋग्वेदातल्या सुंदर ऋचांचा अत्यंत सुंदर इंग्रजीत गेय अर्थ आणि त्याला समर्पक निसर्गातले चित्र. कॉम्बिनेशन खूप गुंगवून टाकते. आज त्यातली एक ऋचा वाचली , विचार कसेही भटकतात याबद्दलची. कोणाला कधी काय वाटेल आणि कोण कधी कसे वागेल. थोडीशी गंमतशीर होती. पण शेवट मात्र एकदम गंभीर... For the sake of spirit , O mind, Let go of all these wondering thoughts! विचार केला तर ख्वाबिदा म्हणजे Wandering thoughts च मग तेच सोडून दिले तर अस्तित्वच उरणार नाही. कधीतरी नक्कीच पण आज नाही. पण मग आज या विचारांना निदान भटकू द्यायचे नाही. त्यांना कोडी घालून सोडवत बसायची हि नाहीत. मग करायचे तरी काय त्यांनी ? तर फक्त असायचे कृतज्ञ !कशासाठी ? आजच्या दिवसासाठी , या पूर्वीच्या जगलेल्या प्रत्येक क्षणासाठी. तो प्रत्येकक्षण जसा होता त्याच्या तशाच असण्यासाठी. आपल्या भोवतीच्या छोट्याशा वर्तुळातल्या प्रत्येक माणसाच्या असण्या आणि नसण्यासाठी. त्यांनी दिलेल्या अनुभवांसाठी. या अनुभवांना , माणसांना बरेवाईट , भलेबुरे म्हणून डागा

चकवा

Image
अशाच एका ब्लॉगवर एक रहस्यकथा वाचायला मिळाली. कोकणच्या पार्श्वभूमीवर माणसांबरोबर भुताखेतांचा यथेच्छ वावर होता. एका भागात कथेचा नायक अमावास्येला का पौर्णिमेला जंगलात फिरत बसतो. रस्ता चुकतो आणि बरेच काही. तो वारंवार त्याच ठिकाणी येत होता , त्याला म्हणे चकवा म्हणतात. ते वाचले आणि सहज जाणवले ; हा चकवा खरा का खोटा देव जाणे पण रोज शेकडो चकवे आपल्याला भुरळ घालतात आणि त्यातल्या कितीतरी चकव्यात आपण हमखास फसतोच. आपला स्वभाव , मन , विचार ह्यांना इतक्या dimensions आहेत ना कि त्यांनी विणलेल्या जाळ्यात आपलाच पुढचा विचार कधी अडकेल आणि फिरत बसेल हे आपल्यालाच उमजत नाही. षडरीपूंची देणगी असलेल्या माणसाच्या मनाला चकवा, भुरळ पडणार नाहीत तरच नवल. एखाद्या सकाळी सकाळी सुब्बालक्ष्मींचे ' कौसल्या सुप्रजा रामा ' डोक्यात घोळत राहते तर अगदी दुसऱ्याच दिवशी रेडिओवर लागलेले ' टन टणाटण टणटण टारा ' दिवसभर वैताग आणत राहते. मनाची रेकॉर्ड अडकायला काहीही पुरते. मनात आलेला चांगला विचार कामाच्या गर्दीत बाजूला पडतो पण शंका , वाईट विचार फिरून फिरून घोळत राहतात. मनात आलेलं एखाद्यावेळी बोलायला , सांगायला नाही जम