वाचू आनंदे

परवा लायब्ररीत लहान मुलांच्या section मध्ये Ruskin Bond यांचे The Road To Bazaar हे पुस्तक दिसले आणि अक्षरश: memories flooded back! देहरा गावच्या बाजारातील सगळ्या गोष्टी

आठवू लागल्याकोकीमुकेशसुरज शेजारी पाजारीच वावरत असल्यासारखे वाटलेखरे पाहता हे पुस्तक शेवटचे वाचले त्याला१५ - २० वर्ष तर नक्कीच झालीपण ते जसेच्या तसे लक्षात राहण्याची जादू त्या पुस्तकातलिखाणात होती.

असे वाचतानां बर्याचदा होतेआपण जणू त्या कथेचा भागच होतोनाकतोड्यांची शर्यत लावणार्‍या या मुलांचे आपणही एक सवंगडी आहोत असे वाटायला लागतेजेन ॲास्टीनच्या कादंबर्‍या वाचताना आपण त्या अठराव्या शतकातल्या इंग्लंडचा भाग होतोमिसवुडहाउस किंवा एखादी मार्गारेटॲन गप्पा मारत असलेल्या बागेत मागच्या बाकावरच बसलो आहोत जणू असे वाटते.

बाबासाहेब पुरंदर्‍यांनी वर्णिलेल्या लढाया वाचताना एखादा मावळा व्हायला होते आणि त्यांनी सांगितलले शिवाजी महाराज हुबेहुब तसेच्या तसे समोर उभे ठाकतात.

मग मनात येते कां एवढे एकरूप होवू शकतो आपण त्या कथानकांमध्येभाषेमुळेमराठी पुस्तके वाचतानां ती मातृभाषा असते विचारही करावा लागत नाही मेंदूला समजून घेतांना पण मग इंग्रजी पुस्तकांचे कायकित्येकदा dictionary लागलीय मला समजून पुढे जायलामगविषय आवडीचा असतो म्हणूनतर नाही कित्येकदा हे आवडले नाही म्हणतानांही लक्षात ठेवलेलेच असते की.

नक्की होते काय काही काही पुस्तकांच्या बाबतीतइथे मेंदूपेक्षा मन जास्त काम करतेमेंदू लक्षात ठेवतोवेळ प्रसंगी reference ही देतोपण मनभावना आपल्याला तो प्रसंग नकळत जगवतातआणि मग तो आयुष्यभर मनात कोरला जातो.

आनंद यादवांच्या झोंबीतली भाषा चौथी पाचवीत असताना मुळीच कळली नव्हती विषय तर अवघडच होता पण त्यात काहीतरी बघून ‘मले तो हुली येते’ म्हटल्यावर त्या व्यक्तीला जाणवलेली घृणा तेंव्हाही शब्दार्थ  बघतां कळलीच होती कीअशी असंख्य उदाहरणे शोधली की सापडतील.

या सगळ्याचे कारण बहुदा त्या content शी आपण मनापासून जोडले गेलो हे असावे.

कितीतरी कविता आपल्याला समोर बसून लिहल्यात असेच वाटते भलेही आपल्या मनात जो अर्थ आहे तो कविला अपेक्षितही नसेलमगही जादूच वाटायला लागते.ती आवडायलाही लागते.

एक दिवस ज्ञानेश्वरीतती कशी वाचावी हे सांगताना एक उदाहरण म्हणून ज्ञानेश्वर माउली सांगतात, ‘इंद्रिया नेणिता भोगिजे’ हे वाचले आणि मग हे कोडेच सुटलेशब्द मागे पडलेमात्रा, गण, वृत्त, व्याकरण सगळेच विसरले गेलेआणि मला शाळेत घालून लिहायलावाचायला शिकवले याचे फार फार बरे वाटले!



हे शब्देविण संवादिजे।

 इंद्रियां नेणता भोगिजे।

 बोलाआदि झोंबिजे।

 प्रमेयासी।

..ओवी ५८

             

- श्रुतकिर्ती

२६//२१

 

Comments

  1. श्रुती, तुझ्या अशा छोट्या छोट्या लेखांमुळे, मला तू जे जे काही वाचले आहेस, ते तुझ्या मागच्या बेंचवर बसुन वाचल्यासारखे वाटते. सुझ्या संवेदना तू शब्दांत मांडू शकतेस, हा मोठा आशिर्वाद आहे तुझ्या पाठीशी.

    संवेदना शब्दांत मांडीजे |
    तींस श्रुतकिर्ती म्हणीजे |
    मानसी जी अंकुरिजे |
    सद्भावनासी || २६.०३.२०२१ || ~ CK 😇🙏

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you Kalyani, मी नुसत्या शब्दातच मांडू शकते, तुम्ही वाचता आणि त्याला भावना जोडल्या जातात. Indeed feeling blessed my dear friend🙏

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान