Left is Right!


 

आज जागतिक डावखुरा दिवस, पण त्याचा ख्वाबिदाशी काय संबंध? मी लिहिते तर उजव्या हाताने. पण... कहानीमे ट्विस्ट है, मी आहे डावरी. शाळेतल्या बालवाडी वाल्या बाईंनी रागे भरून लिहायला, पेन्सिल उजव्या हातात दिली. पण सुदैवाने आईवडिलांनी ते तिथेच थांबवले. परिणाम लिहणे,जेवणे उजवा हात आणि बाकी कामाला डावा हात पुढे यायचा आणि अजूनही येतो. त्यामुळे शंभर टक्के नसली तरी सेमी पेक्षा जास्त डावरी आहे मी. डावर्याना जरा वेगळी टट्रीटमेंट मिळतेच बऱ्याचदा. आरतीत डाव्याहाताने टाळ्या वाजवल्या, कुंकू लावायला डावा हात पुढे आला कि बर्याचजणांच्या भुवया वर होतात. पण सगळ्या डावर्याना ते अंगवळणी पडलेले असते. खरी मज्जा येते ती कात्री वापरताना. नेहमीची कात्री, सालं काढायचे सोलाणे नीट वापरताच येत नाही. आता left hand mouse, कात्री सगळे मिळते त्यामुळे असा त्रासही उरलेला नाही. मग कशाला बळेच उजवा हात वापरायचा. ज्या ज्या डावर्याना प्रयत्नपूर्वक उजवे करतात ते बहुदा दोन्ही हात वापरायला शिकत असावेत.

डावा हा उगाचच कमीपणा दर्शक शब्द करून टाकलाय आपण. चांगल्याला चांगले म्हणा, वाईटाला वाईट. हे उजवे डावे असले समानार्थी शब्द कशाला? बरं हे नुसते हातापुरते मर्यादित नव्हे, त्यात विचारसरणी पण घुसडल्यात. डावी, लेफ्टिस्ट आणि बरंच काही. असो तो आपला प्रांतच नाही.

जन्मतःच दोन हात असणारे आपण, काही जण उजवा वापरणार काही डावा. त्यात वेगळेपणा असण्याची गरजच काय? जागतिक उजवाखुरा दिवस असतो का?अल्पसंख्यांक समजून आधीच डावऱ्यांवर बंधने आणि तीनशे पासष्ठातल्या एका दिवशी ते कसें creative, कसे  हुशार, मग कोण कोण प्रसिद्ध डावरे याच्या याद्यांची जाहिरात. उरलेले तीनशे चौसष्ठ  डावा उजवा भेद चालूच. मुद्दाम लक्ष देण्याइतकी मोठी घटना आहे का ती?

मध्यंतरी एक रिसर्च वाचनात आला. आपण हाताने डावे असतो तसे डोळ्याने, कानाने पण असतो म्हणे. त्याच्या टेस्ट पण असतात. पण हे कुठे चार लोकात चवीने चघळलेले ऐकले नाही. चर्चा जास्त कुणाची? एखादा डाव्या हाताने लिहताना दिसला कि त्याचीच.

Left हा शब्द Lyft या दुबळा या अर्थी शब्दातून आलाय. त्याचा विरुद्धार्थी शब्द Dexter  आणि त्याचा अर्थ कौशल्य. त्यामुळे या नावापासूनच कमी लेखले जाण्याची सुरवात झाली असावी. डाव्यांना मारून मुटकून उजवे करतांना कधीतरी उजव्यांनीही डाव्याहाताने कामे करून बघावीत की. एकदा खरंच लिहून बघा mirror image येईल नक्की. जसे डावे तसे उजवे. भले १०% माणसेच डावी असली तरी. Majority wins हा नियम लावायचाच कशाला? कोणता हात वापरतोय पेक्षा कसा ते महत्वाचे ठरू द्या की.

डावर्याना बरे वाटावे म्हणून असा दिवस असण्यापेक्षा डावखुरे वेगळे आहेत हेच विसरलो तर एक दिवस वेगळा काढायची गरजही संपेल पण तूर्तास तरी Left is Right!



 

-श्रुतकिर्ती

१३/०८/२०२१

 

Comments

  1. Left is Right is right! 😆.
    तसेही म्हणतात ना, "There is nothing Right or Wrong, it's all subject to circumstances and perceptions". असो, यावरून ख्वाबिदाला अजून एक लेख सुचेल.

    लहानपणी मी सुद्धा कदाचित डावरी असावी असे काहिसे अंधुकसे आठवते ज्यावरून डावा हात मला तेवढा डावा नाही वाटत 😃.

    हा लेख वाचून आठवले, Leonardo Da Vinci हा दोन्ही हाताने चित्रे काढायचा. त्याच्याकडे इतरही बरेच असामान्य गुण होते. त्याला इतिहासात super human असे म्हटले गेलेय.

    श्रुती, तू आमची super woman 👍😃❤️ ~ CK

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you, तुला डावा हात फारसा डावा वाटत नाही हे छान😊yes everything is subjective..

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान