दमलेली मी/ती


काळजी करून करून दमलेलेच होते, म्हणून शेवटी एकदाचे ठरलेच

 शांतता ती ही मनाचीच परत मिळवायचीच

काय चूक? काय बरोबर? विचार करून करून दमलेलेच होते

म्हणून शेवटी एकदाचे ठरवलेच, आता कंबर कसून कामालाच लागावे

कोणत्या?

मलाच येणाऱ्या आणि मलाच आवडणाऱ्या

 माहित नाही, माहित नाही म्हणून दमलेलेच होते

 म्हणून मग शेवटी एकदाचे ठरले, आता शोधायचेच

शोधले आणि सापडले-  मीच,

 माझ्या जवळचे  सगळे ते पार नकोसे वाटणारे माझ्या दूर दूर चे सगळे

 दुष्टावा, वाईटपणा बघून बघून दमलेलेच होते

म्हणून शेवटी शोधलाच माझ्याच मनातला नंदनवनातला तो कोपरा, ज्यात सामावला गेला रोजचा सगळा दिवस माझा

सगळ्यातला गुंता सोडवण्यात, त्यात गुंतण्यात दमलेलेच होते

 म्हणून मग शेवटी ठरवलेच,

सोडवलाच नाही तो गुंता

 सरळ पडलेच बाहेर गुंत्यातून

बघू लागले लांबूनच त्याच्याकडे

दमलेल्या मला/ तिला बघून बघूनच दमून गेले

मग मात्र ठरवलेच, दमलेच होते कशाने?

 दमलेल्या मलाच, दमलेली बघण्याने!

- श्रुतकिर्ती

३०/०९/२०२२



Comments

  1. असे बरेच क्षण आणि काळ असतात बहुदा…… प्रत्येकाच्या जीवनात . तू शब्दात मांडलेस आणि कळले नक्की मनाची मरगळ असते ती कशाची?! ते. ~ सप्रेम , कल्याणी

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान