Are you a local?

 
हा प्रश्न मुळ गाव सोडल्यानंतर फार वेळा समोर येतोमन नक्की त्याजागेत कधी रमतेहाच तो क्षण असे pin point करता येते कां?
 Electricity च्या बीलावर नांव आले कीमतदार यादीत आलात कीघरदार झाले की?  नक्की कधी?
Office मधले सहकारी पहिल्या नावाने ओळखू लागले कीनेहमीचा कॉफीवाला न मागता order तयार करू लागला कीराहता तिथले प्रश्न आपलेसे वाटले की?
देश बदलला असेल तर भाषा, अन्न आपलेसे केले की?
हे सगळे घडूनही मन आपल्या मुळ गावाची देशाची ओढ धरून असतेच.
मग नक्की काय घडते आणि हा प्रवास सुरू होतो?

माझ्या रोजच्या रस्त्यावर एक bottle brush tree आहेएक गुलमोहोरही आहे. पुर्वी हा गुलमोहोर पाहीला की मला पुण्याचा मे महीना आठवायचामन उन्हाळ्यात फेरफटका मारून यायचे आणि आठवणीत रमायचे.... या वर्षी वसंतात bottle brush अचानक फुललेला दिसला आणि मी गुलमोहराची आणि पर्यायाने उन्हाळ्याची वाट पाहू लागले. मनाने दक्षिण उत्तर गोलार्धाचेउन्हाळी महीन्यांचे बंध तोडले होतेमे महीना आणि उन्हाळा हे समीकरण मोडून फुलाचा बहर आणि उन्हाळा जोडले गेले... मग मी या इथल्या निसर्गाची लोकलच झालेकी...
आत्ताच्या गावात लहानपणचे जग शोधतांना, सुट्टीत त्या जगात पोचल्यावर हे आत्ताचे जग आठवू लागले आणि लोकलपणा जाणवू लागला.
एक मैत्रीण सहजच म्हणून गेली, भारतीयांचा रूपाया डॉलर conversions चा हिशेब बदलला की झाला तो लोकल... खरेच वाटले त्याक्षणी ते.
मंडई ते farmer’s market हा अनुभव उलटा झाला की झालाच बदल.
मात्र नुसत्या रोज good morning करणार्या समोरच्या घरातल्या आजीबांईंमधे काहीही साम्य नसतानां आईकाकू, मावशी दिसू लागली की formation complete चे शिक्कामोर्तब झाल्या सारखे खरच वाटले आणि मग स्थानिक आणि परकीय असण्याचा भेदच मालवला....

- श्रुतकिर्ती
३०/१०/२०२०

 

Comments

  1. Mast Shruti... tuze lekhan chan vicharat gheun jate... atta pan maza shodh chalu zala kharach mi ahe la local ki trishanku? Na ithali na tithali🤔

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्याला माहीत असते कधी आपण कुठले ते... फक्त मान्य करणे अवघड जाते😊

      Delete
  2. OGHAVTI BHASHA ANI SAHAJ LEKHANACHE UTTAM UDAHARAN👍🏻👍🏻 APRATIM👌🏻👌🏻

    ReplyDelete
  3. khoop chan ga Shruti.. vichar karayala lavanara vishay

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान