Mirror Mirror on the Wall

    Snow White च्या सावत्र आईने वारंवार हा प्रश्न विचारला आणि नेहमीच तिच्या मनासारखे उत्तर मिळत गेले. ती सुंदर असणार हे तर नक्कीच आणि चांगली जादूगारीण देखिल, कारण एवढे खरे बोलणारा आरसा होता तिच्याकडे. एकदाच मनाविरुद्ध उत्तर मिळाले आणि तिच्यातली खलनायिका जागी झाली. आरस्याच्या जागी कोणी माणूस असता तर, कदाचित हो ला हो म्हणाला असता आणि गोष्ट वेगळी असती. पण नाही ना! आरसा खरा बोलणारा होता.

    आपल्या सगळ्यांकडेच हा आरसा असतोच, या ना त्या रूपात. पण वापरतो किती वेळा? त्यातही आपल्याला हवे ते उत्तर पाहिजे असतानाच जातो आपण त्याला प्रश्न विचारायला. 'सांग दर्पणा कशी मी दिसते?' विचारायच्या आधी माहित असते उत्तर सुंदर असणारच आहे. Bad Hair Day च्या दिवशी कोण विचारेल असला प्रश्न? खारट आमटी कशी झालीय हे विचारण्याचा मूर्खपणा मी तरी नाही करणार.

    मग माहित असताना विचारतोच कशाला आपण? तेही वारंवार? Endorsement हवी असते ना आपल्याला. Filter लावून सेल्फी काढण्याच्या जगात त्या आरस्याला खरा प्रश्न नाहीतर विचारणारच आहोत कशाला आपण? अगदी विचारलाच खरा प्रश्न आणि मिळालेच मनाविरुद्ध उत्तर तर?

    आरस्याचा राग येतो मग, माणसे आवडेनाशी होतात,आपले कोणी ऐकत नाहीय हि भावना डोके वर काढते. अपेक्षित नाही घडले कि नाराजी येणे स्वाभाविकच पण त्यावर मात नाही करता आली कि सुरवात होते नाकारात्मकतेला. मी कसा/ कशी बरोबर आहे याची स्वतःच्याही नकळत जाहिरात करायला. कळतेय पण वळत नाही या वागण्याला. मग वागणे स्वाभाविक उरतच नाही, प्रत्येक कृतीमागे गणिते असायला लागतात. मनासारखी उत्तरे देणारे आरसे शोधायची सुरवात होते. मनातल्या निरागसतेच्या नाशाची सुरवात असते हि बहुतेक. कां घडते हे? अपेक्षाभंगाने का अवास्तव अपेक्षेने? मनाप्रमाणे ना घडल्याने का सत्य पचवता ना आल्याने?

    आरस्याने सांगितलेले कान देऊन ना ऐकल्याने. त्यावर वेळीच उपाय ना केल्याने, हळूहळू आरसाही खोटे बोलायला शिकतो नाहीतर अबोलच होऊन जातो. तोंडापुरती स्तुती करतो आपणही आनंदून जातो पण याचवेळी आपण आपला खरा मित्र मात्र गमावतो. कायमचे नुकसान करून घेतो.
मग करावे तरी काय? झेपणार असेल तरच म्हणूया का 'Mirror Mirror on the Wall.'



कोण जगाचा पहिला शिक्षक
शिकवी नरा जो आत्मपरीक्षण
बुद्ध न, येशू न,व्यासमुनी नच ;
ओबढधोबड पहिला दर्पण!
- विंदा करंदीकर.


- श्रुतकिर्ती
१५/१/२०२१

Comments

  1. श्रुती, आत्म-परीक्षण / Introspection करण्याचे विचार शब्दात छान मांडले आहेस :) ~ कल्याणी

    ReplyDelete
  2. so true Shruti.... mi swataha hyatun khoopada geliye... khar sangav tar samorchyala nahi awadat satya... ani khoti khoti stuti hi nahi karata yet mag mi gappa rahanach pasant karate... ani apali khoti stuti keleli hi kalate aplyala mag lok khot ka boltat ha yaksh prashna asato nehamich mazya samor.
    I jsut love the way you express your feelings/ vichar in writing.

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you , खरय. Being politically correct is in trend which gives answers temporarily.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान