Missing Piece

 

नेमेची येतो मग पावसाळा, सारखी गणपती, दसर्यानंतर दिवाळी आली. जाहिराती ती जवळ आलीय हे विसरूच देत नाहीत. दिवाळीचे वेध लागायला लागले की भाजणी, पीठं, पोहे हे सगळे पाहीजे तस्से आणायचे तर इथे थोडी fielding लावावी लागते. stock संपायच्या आधी भाजणी, अनारस्याचे पीठ secure करावे लागते. घरी करायचे नसेल तर वेळेत order ही करावे लागतेच. तसे या वर्षीही हे सगळे उद्योग करून झाले. आता सगळी कच्ची तयारी करून झाल्यावर, पुढे काय याची सगळी योजना मनात तयार होती..

 पण मनातच तयार होती. चार मैत्रीणींच्या नादी लागून चकली,शेव तयार झाली. आणि बाकीचे पुढे ढकलले जायला लागले. काहीतरी missing होते. कळतय पण हात वळत नव्हते. आता बिना करंज्या अनारस्यांची ही दिवाळी जाते काय ही भिती घरातल्यांना वाटून गेली. आणि अगदी अचानक…Fedex चा msg आला. आज parcel delivery असण्याचा. काय घेतलेय याचा विचार करूनही उत्तर नकारार्थीच होते. दुपारी खोके आले. पुण्याहून पार्सल आले होते. घरून फराळ आला होता. सगळा कंटाळा एका क्षणात गेला. दिवाळी खरच सुरू झाली. मागच्या वर्षीसारखे विचित्र वर्ष आणि एक दोन दु:खद घटना वगळता घरून पार्सल आले नाही असे कधीच घडले नव्हते. या वर्षी post चालू बंद lockdowns या सगळ्यात हा विषय मनातही आला नव्हता.

 बहुतेक तो missing piece हाच होता. त्या चार गोष्टी बघुन दिवाळीच नाही तर पुढचा प्रत्येक दिवस आनंदात जाईल याची खात्रीच त्या खोक्याने दिली. आता सगळे normal होणार असे उगीचच वाटले. मधली दोन वर्ष मनातून पटकन पुसली गेली. गेले काही दिवस दोन गावांमधले, दोन देशांमधले physical distance जाणवायला लागले होते ते पुन्हा जाणवणार नाही असे वाटले. 

असे काय वेगळे होते त्या खोक्यात? पण खरतर काय नव्हते त्यात? इतक्या वर्षीच्या दिवाळीच्या आठवणी. आपण कुणाचे तरी आणि कोणीतरी आपले आहे याची जाणिव, आनंद वाटल्यानेच मिळतो याचे confirmation, काहीतरी मिळणे तेही अचानक ध्यानीमनी नसताना, याचा आयुष्याच्या, वयाच्या कोणत्याही phase मध्ये आनंदच होतो याची जाणिव, आनंदाचा एक क्षण बर्याच शंकाकुशंकानां क्षणात बाजूला सारतो याचे उदाहरण. 

चार फराळाच्या पदार्थानीं मला ढीगभर आनंद दिला होता. रोज उठून love you, miss you म्हणणार्यात न मोडणार्यांचा प्रेम काळजी व्यक्त करण्याचा हा सहज पण constantly अमंलात आणायला तितकाच अवघड मार्ग माझ्यातही उतरो, असाच आनंद वाटण्याची क्षमता मलाही मिळो, ही आणि अशीच आनंदच आनंद वाटणारी माणसे कायम अवतीभोवती राहोत, मी ज्यांच्या भोवताली वावरते त्यांना एखादा तरी आनंदाचा, खात्रीचा क्षण देण्यात माझाही वाटा असो. detachment जमावी, नश्वर जगातील भावभावनांच्या गुंत्यातून पाय मोकळा व्हावा ही इच्छा प्रकर्षाने साथ देत असतानां, माणसाच्या माणसांशी असणार्या नात्याच्या गुंत्यातून मात्र मला आणि माझ्यासारख्या सगळ्यांना कधीच मोकळे करू नको एवढेच मागणे ही दिवाळी उजळवणार्या त्या पणतीच्या ज्योतीकडे!

 एवढ्या आणि एवढ्या एकाच कारणासाठी, नात्यांसाठी, बोरकर म्हणतात ते मलाही पटतेय …

स्वर्ग नको सुरलोक नको, मज लोभस हो इहलोक हवा

तृप्ती नको मज मुक्ती नको पण येथील हर्ष नि शोक हवा


शुभ दिपावली! 

श्रुतकिर्ती

५/११/२०२१

Comments

  1. Welcome back Khwabida. Love your writing.
    आमचा सुद्धा "Missing Piece" होता हा. 💜🌷💟 ~ Kalyani

    ReplyDelete
    Replies
    1. Even writing Khwabida completes my weekly Jigsaw

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान