शिवी
नेहमीच्या शॉपिंग सेंटरला दर शनिवार सकाळची नेहमीचीच गर्दी होती. गजबजाट होता , चेकआउटला रांगा होत्या . ट्रॉली , बास्केट्स कमी जास्त होत होत्या. मीही नेहमीप्रमाणेच त्या गजबजाटातल्या गर्दीचा भाग झाले आणि समोर बघून चालू लागले. आम्ही तीन माणसे एकाच घरातली असलो तरी दारातल्या गर्दीत जरा पुढे मागे झालोच होतो. दारापाशी बॅंका चेक करणारी मुलगी , तिथेच बास्केट ठेवणारे आणि उचलणारे यामुळे गर्दीचा वेग अधिकच मंदावला होता. तसाच तो माझाही कमी झालाच होता. पुढची व्यक्ती जरा थबकली आणि मी ही जागीच थांबले. एक पुरता क्षणही झाला नसेल याला आणि मागून “यु xxx इडियट! डोन्ट स्टॉप आय वॉन्ट टू वॅाक” अशी सणसणीत शेलकी शिवी आली. अनेकदा ऐकलेला शब्द पण मला उद्देशून कोणीतरी आकारण म्हणल्यानंतर काय रिएक्शन द्यावी हेही कळले नाही. थांबलेल्या मला आणि पुढच्या एक दोन जणांना बाजूला सारत तो माणूस आणि त्याच्याबरोबरची बाई काहीच न झाल्यासारखेच गप्पा मारत पुढे निघून गेले. मला मात्र सून्न करून गेले. चूक झाल्यावरही जे आपण कोणाला म्हणणार नाही ते तो अकारण मला बोलला आणि अंगावर पाल पडल्यासारखे वाटले. अशावेळी करायचे काय ? आपण ह...