पद्धत
घरोघरी ख्रिसमस ट्री सजवले जावू लागले की मला एक घटना कायम आठवते. बऱ्याच वर्षांपूर्वी कामाच्या ठिकाणी नोव्हेंबर आल्यावर ; सुट्ट्या , ख्रिसमस , सेलिब्रेशन हे नेहमीच यशस्वी विषय चर्चेत चालू होते. एक जण तिच्या , विविध प्रकारच्या काचेच्या , लाकडी , कापडी ऑर्नामेंट्सने नटलेल्या भरगच्च झाडाचे फोटो दाखवत होती. झाड सुंदर दिसत होते आणि शेजारीच फोटोत मोठ्या दोन बॉक्सेस आणि सगळी ऑर्नामेंट्स जपून ठेवायला लागणारे पॅकिंगचे सामान दिसत होते. मेहनत खूप लागत असणार हे कळून येत होते. सहजच किती छान आहे हे सगळे. कसे जमवले ? हे विचारल्यावर लकाकलेल्या डोळ्यांनी ती म्हणाली , “ हा ख्रिसमस ट्री माझ्या मोठ्या मुलीच्या पहिल्या ख्रिसमसला घेतलाय आणि दरवर्षी मी घरातल्या प्रत्येकाच्या नावाने एक डेकोरेशन घेते ही आमच्या घरची मी सुरू केलेली ट्रॅडिशन आहे. I will pass this to my daughters and they can add something new every year to make it their own.” इतका वेळ भारी वाटणारे फिलिंग , मी पुढे हे कुणाला तरी देणार चालू ठेवायला इथे येऊन ठेचकाळले. तिला काहीतरी स्वतःसाठी करावे वाटले , सजवणे खरेदी करणे नंतर...