वाढदिवस
या आठवड्यात ख्वाबिदा सुरू होवून एक वर्ष होतय. थोडक्यात ख्वाबिदाचा वाढदिवस आहे. जन्मदिवस नाही , कारण हे मनात येणारे विचार तेही random, haphazard… त्यांचा जन्म कधी झाला हे रूढार्थाने कळूच शकत नाही. पण हो वाढदिवस मात्र आहेच. आधी ते फक्त मनात असत , मग गेल्या वर्षभरात कागदावर आले. Random असले तरी कागदावर उमटतांना त्यांच्यांत काहीतरी सुसंगती यायचीच. मेंदू लिंक सोडत नाही कितीही फिरले तरी. कागदावरुन ते अनेकांच्या डोळ्याखालून गेले. कधी त्या विचारांनी हसवले , कधी माझ्या डोळ्यांची कड त्यावेळी पाणावली असणार याची जाणिव करून दिली. कधी आवडले , तर कधी हे काय काहीतरीच असेही वाटले असणार. पण दोन मिनिटे हे काय ? असा विचार नक्कीच मनात आला असणार. विचारांनी विचार करायला लावावे यातच मज्जा आहे. ख्वाबिदाचा उद्देशच स्वत्वाचा शोध घेणे. प्रत्येक विचारच्या कृतीच्या मागचा प्रवास बघणे , तोही शक्यतो तटस्थपणे , चुक बरोबर , रागलोभ बाजूला ठेवून. हाच होता आणि हाच आहे. विचारांना स्वप्नं बघायची सवय लागली की ती सवय सुटतच नाही. त्या प्रवासाला शेवट नाही. मजा प्रवासातच. त्यामुळे मन , मेंदू , विचार सगळे आहेत तोवर ख्वबि...