अंबाडीची भाजी.
रोज घरी मीही भाजी पोळीच खाते , तीही… ती नेहमी तशीच भाजी करते , आम्ही दोघी ही… तिच्याच सारखी. तीच्या हाताची चव , तशीच असते कायम आमची , कधी कधी . एरवी मात्र , आठवणी मनात जागवतात तीच चव न चुकता नेहमी. आताशा , बर्याच वर्षात तीने केलीच नाहीय भाजी पण आम्हा दोघीत भर पडलीय , एका तीसरीची ; तीच्या चवीची आठवण काढत भाजी खाणारीची . तीनेच शिकवलीय , लक्षात ठेवून आवडी जपण्याची पध्दत. न सांगताच शिकवलीय , त्याच बरोबर भाजीचीही आम्हा सगळ्यांच्या आवडीचीही पध्दत. तीच्यामुळेच , वर्षभर दरवेळी , त्या सगळ्या भाज्यांकडे बघत आठवणी काढत , आनंदाने जेवताना आठवणींचा एक आवंढा हळूच गिळताना , पुढच्या फोन कॅालवर तीच ती भाजी निवांतपणे चर्चा करायला विषयतरी असतात , असे विषय नाही निघाले तर काही तरी गडबडलेय हे न सांगताच एकमेकानां सांगतात. कोणत्याही बाजारात जावो , भाजी दिसली की ती दिसतेच , निवडायचा , करायचा कितीही आळस आला तरी पिशवीत बसतेच. व्हिडीओ कॅाल करून पुन्हा कशी करू म्हणत म्हणत सगळी उजळणी करणेही आलेच. सगळे म्हणतात आठवणी काढू नयेत , फार मन कशात गुंतवूच ...