निव्वळ वेडेपणा
ऊन - पाऊस - ढग - थंडी - वारा , चक्र चालूच आहे. या चक्रात मध्येच , एखादा सोनेरी क्षण येतो आणि मान वर केली की आभाळभर पसरलेले इंद्रधनुष्य दिसायला लागतं. क्षणापूर्वी तर नव्हते इथे. कधी , कसे , केव्हा , तयार झाले ? वाटत असतानाच जाणवते ; कायमच तयार इंद्रधनुष्य बघितले की. हळूच एक , एक रंगाची पट्टी ओढली जाते या टोकापासून त्या टोकापर्यंत, अर्ध गोल ब्रश फिरतोय झालेच नाही कधी असे! आकाश तयार होताना कधी पाहिलं ? गोधडीच्या रंगीबेरंगी तुकड्यांसारखे , ढगांचे , संधी प्रकाशाचे , चंद्र-ताऱ्यांचे तुकडे कुणी जोडताना , उसवताना , शिवताना दिसले कधी ? जंगल , अगदी घनदाट तयार झालं कधी ? किती झाडे , किती वेली , गवतापासून पार दगडावरचे शेवाळे त्यात उगवले कधी ? मुंग्यांपासून गरुडापर्यंत सगळ्यांची घरटी बनली कधी ? दिसले , जाणवले तेव्हा पूर्णच होते चित्र डोंगराने , एवढी उंची गाठलीच कशी ? टोक त्याचं धारदार बनलंच कधी ? तासले वाऱ्याने कडे कधी ? लक्षात आले तेव्हा तयार होते दृश्य छान कडाडणारी वीज , ढगामागून निघाली केव्हा ? आवाज आणि प्रका...