निव्वळ वेडेपणा


ऊन - पाऊस - ढग - थंडी - वारा, चक्र चालूच आहे. या चक्रात मध्येच, एखादा सोनेरी क्षण येतो आणि मान वर  केली की आभाळभर पसरलेले इंद्रधनुष्य दिसायला लागतं.

 क्षणापूर्वी तर नव्हते इथे.

कधी, कसे, केव्हा, तयार झाले?

वाटत असतानाच जाणवते;  कायमच तयार इंद्रधनुष्य बघितले की.

हळूच एक, एक रंगाची पट्टी ओढली जाते या टोकापासून त्या टोकापर्यंत, अर्ध गोल ब्रश फिरतोय

झालेच नाही कधी असे! 

आकाश तयार होताना कधी पाहिलं?

गोधडीच्या रंगीबेरंगी तुकड्यांसारखे, ढगांचे, संधी प्रकाशाचे, चंद्र-ताऱ्यांचे तुकडे

कुणी जोडताना, उसवताना, शिवताना दिसले कधी?

जंगल, अगदी घनदाट तयार झालं कधीकिती झाडे, किती वेली, गवतापासून पार दगडावरचे शेवाळे

त्यात उगवले कधी?

मुंग्यांपासून गरुडापर्यंत सगळ्यांची घरटी बनली कधी?

दिसले, जाणवले तेव्हा पूर्णच होते चित्र

डोंगराने, एवढी उंची गाठलीच कशीटोक त्याचं धारदार बनलंच कधी?

तासले वाऱ्याने कडे कधी?

लक्षात आले तेव्हा तयार होते दृश्य छान

 कडाडणारी वीज, ढगामागून निघाली केव्हा?

आवाज आणि प्रकाश ल्याली केव्हाढगांचे आकार, रंग, त्यातले पाणी; जाणवले तेव्हा

आधीच होते आकाशात

 आता आठवतच नाही, त्यांच्याशिवाय दिसत होतेच कसे ते आभाळ?

पडणारा पाऊस,  साठलेले तळे,

चिखलात उगवलेले गवतफुल पिवळे;

जाणवते तेव्हा असतेच तिथे

त्याआधी बहुतेक मनातच दडलेले.

हे सगळे, सगळे रोजच दिसते

जाणवते मात्र कधी कधी 

मग मनात येते हे  सगळे 

तेव्हा मेंदू मारतो कोलांट्या

आणि करतो जाणिवांच्या करामती.

का करतो आपण असले वेडे विचार?स्वतःलाच पाहायला लावतो मग त्या जाणीवांच्या, क्षणांच्या आरपार!

 -श्रुतकीर्ती

२९/०७/२०२२



आम का पत्ता 

आम से झरता है

जाम का पत्ता 

जाम से झरता है

भाई, तू ऐसी कविता क्यों करता है?

-सुशील शुक्ल

Comments

  1. Being in the clouds of arbitrary thoughts makes you ख्वाबिदा!! हे शिर्षक समर्पक कसे के या लेखातून सिद्ध होतेय. 😊
    तू मन आणि बुद्धि यामधला जो विचारांचा प्रवाह असतो, तो खूप सुंदर रित्या वर्णन करू शकतेस श्रती. खूप दुर्मिळ आहे ही कला. ~ कल्याणी

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you Kalyani for your good words 💞

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान