शेवटचा दिवस

शांत तरीही भरपूर गाज असणारा समुद्र किनारा. आजूबाजूला माझ्यासारखेच एक दोन नमुने. लाटा येताहेत कधी फक्त जवळून तर कधी भिजवून पुन्हा गुडूप होताहेत. परत जाणारी लाट पायाखालची वाळू सरकवत असतानांच नवी लाट पाण्याचा आधार देत आहे. हे चक्र चालूच राहते. भरती, ओहोटी, खारे वारे- मतलई वारे, सगळे शिकून बरीच वर्ष झाली आहेत. तेंव्हाही ते गोंधळात टाकायचे तर आता आठवणे जरा अवघडच. पण समुद्रकाठी भर दुपारी टळटळीत उन्हात देखील जाणवणारा गारवा, फेसाळणार्या लाटा आणि ती गंभीर गाज. भूगोल इतिहास सगळ्याला दूर सारून तिथेच, त्या क्षणातच राहायला भाग पाडते. घड्याळातले काटे असूच नयेत वाटणारे हे क्षण तरीही त्यांच्या वेळेत संपतातच. पुढचा क्षण मला तो हवाय का नकोय हे विचारायला थोडीच थांबतोय. त्याला मी तीथे आहे याची जाणिव देखील नाही. मला मात्र या सगळ्यांच्याच असण्या नसण्याने फरक पडतो, खुप पडतो. भान हरपून समुद्राकडे बघत राहण्यानेही आणि भानावर येत पुढचे plan अखण्यानेही. प्रत्येक क्षणाचे असणे मला आवडतेय मग त्याचे संपणे साजरे करावे तरी का वाटावे? काहीतरी संपले तरच नवे सुरू होईल हे माहीत आहे म्हणू...