झाडे
जानेवारी आला आणि ॲास्ट्रेलियन ओपन सुरू झाली. वय वाढले की, रुटिनमधे गुंतत गेले की आणि आपले आवडते प्लेअर रिटायर झाले की खेळातील रस कमी होतो तसेच या गेम्सकडे दुर्लक्ष झाले होते. अचानक काल बातम्यांमध्ये जोकोविच च्या आवडत्या झाडाची बातमी झळकू लागली. मेलबर्नच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये त्याचे एक लाडके झाड आहे. त्याला भेटून , त्याच्याशी बोलून “ He keeps himself grounded “ हे ऐकतांनाही भारी वाटत होते. रोजच्या कामाच्या रस्त्यात खुप गर्द झाडी आहे. एक झाड जातानांची कितीही ही घाई थांबवत एक क्षण तरी नजर फिरवायला भाग पाडतेच. जवळ जवळ शंभर एक वर्ष वयाची ती सगळी झाडे. चार सहा जणांनी हात पसरले तरी बुंधा मोठाच पडेल असे ते डेरेदार हिरवे झाड. गार्डनिंग ॲास्ट्रेलिया वाला कोस्टा जेंव्हा या रस्त्यावर आला होता, तेंव्हा या सगळ्या झाडांना त्याने मिठी मारली होती असे एका शो मध्ये म्हणाला होता. काय मिळत असेल या सगळ्यांना या अशा बुढेबाबा बरगद टाईप झडांशी बोलून? या झाडांच्या भोवती रेंगाळतांना जाणवते त्यांची समृध्दी, पानाफांद्यांमधून मिरवणारी श्रीमंती. जवळ गेले की वार्याच्या झुळकेने थरारणारी ...