नांव ठेवतांना
एका व्हिडीओमध्ये नुकत्याच जन्मलेल्या तीन गिनीपिग्जची नावे ठेवायला मदत करा असे त्यांची मालकिण सांगत होती आणि नावांचा पाउस कमेंट्समध्ये पडत होता. त्या एक दिवसाच्या पिल्लांकडे बघून कुणाला एक वाटत होते तर कुणाला दुसरेच. रंग, रूप, attitude, आकार आवाज असे सगळे पाहून मजेमजेशीर नावे समोर येत होती. नांवे काय ठरली ते नंतरच्या व्हिडीओत कळणार होते पण ती ठरवण्याची पध्दत मजेशीर होती. मग मनात आले, प्रत्येक गोष्टीला निदान एक नांव आहे. कसे ठेवले गेले ते? कुणी ठेवले? कां? आणि मुख्य म्हणजे तेच कां? अगदी लहानपणी प्रश्न पडतो.. टेबलाला टेबलच का म्हणायचे तसे. प्रत्येक शब्दाला, नावाला काहीतरी उगम असतो. कोणत्यातरी भाषेतले काहीतरी मुळ रूप असते बरा वाईट अर्थ असतो . प्रत्येक नावाची प्रचलित नावापर्यंत येवून पोचण्याची कथा वेगळीच असते. ती कळली की सगळे कोजे सुटल्यासारखे वाटते. नावात काय असे कितीही म्हटले तरी नावातच सगळे दडलेले असते. सिकंदर म्हटला की घोडाच डोळ्यापुढे येतो मांजर नाही. मांजराला ते नांव ठेवायला काही हरकत नाही पण एखादे सिकंदर मांजर भेटेपर्यंत डोळ्यापुढे मांजर काही येतच नाही. माणसांचेही असेच होत...