रांग
काल सिडनीच्या बोटॅनिकल गार्डन मध्ये Putricia ,the putrid corpse flower म्हणजे कुजलेल्या मांसा सारखा वास पसरवणारे पंधरा वर्षांनी फुलणारे फुल फुलले. चोविस तास जेमतेम टिकणारे ते फुल बघायला हजारो लोक विशेषतः छोटी मुले रांगा लावून जमले. यात भर म्हणजे या फुलाच्या फुलण्याचे एक आठवडा आधीपासून लाईव्ह स्ट्रीम चालू होते. हजारो लोक ते सारखे बघत होते, “फुल फुलले का नाही? “ ट्रेंडींग होते. लाईव्ह स्ट्रीम चेक करत राहणे हेही रांगेत उभे राहण्यासारखेच की. हे सगळे वाचताना ऐकताना डोळ्यापुढे कितीतरी रांगा आल्या. काही ताटकळत उभे राहून अनुभवलेल्या, काही टाळलेल्या तर काहींमध्ये उभे असण्याची मजा आजही आठवते अशा. आजच लॉंग वीकेंड सुरू होईल आणि मोटर वेवर गाड्यांच्या रांगा लागतील. मग त्या पुढे चालूच राहतील. प्रेक्षणीय स्थळे खाण्यापिण्याच्या ठिकाणी आणि सगळीकडे. शाळेत रांगेत बसणे आणि उभे राहणे यातून शिकलेली रांग नंतर कधीच पाठ सोडत नाही. फक्त रांगेत उभे राहतांना त्या रांगेचा शेवट होऊन आपल्या हाती काय पडणार यावर त्या आवडतात का नावडतात हे ठरते. मॅच, सिनेमा, नाटक, कॉन्सर्ट य...